वाबी साबी

 परफेक्टली इनपरफेक्ट व्हा...

कुणीही परफेक्ट नसतं, तरीही परफेक्ट व्हायला सर्वांना आवडते, मग त्यासाठी आपली धडपड सुरू असते. अपयश आले की माणूस खचून जातो. हेवा वाटतो परफेक्ट लोकांचा. पण खरच समोरचा परफेक्ट असतो का? त्यालाही त्या परफेक्टपणासाठी किती कष्ट पडले असतील. कदाचित तो अजूनही परफेक्ट नसेल. कदाचित त्याने त्याची पडकी बाजू उचलून त्याला यशाचा मार्गी उपयोगी आणली असले. पण अश्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपली धाव असते परफेक्टपणाकडे.
कमतरता सर्वांमध्ये असते. जगी असा कुणीच परफेक्ट जन्माला येत नाही. इकडे जपानी लोकांसोबत काम करून एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली आहे. इथे लोकं परफेक्ट नाहीत. ते फक्त त्यांचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतात एवढंच, यशस्वी होतात आणि मग त्यांच्यातला कमीपणा झाकल्या जातो. आपल्याकडे सगळे ऑल राउंडर आहेत, आपल्याकडे सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहित असतात पण पूर्ण माहित नसतात. इकडे भारतीय लोकांच्या ऑल राउंडरपणाचे खूप कौतुक होते. काही गोष्टी नक्कीच आपल्याकडून जपानी लोकांनी शिकाव्या, नाहीका! पण तरीही सर्वच क्षेत्रात परफेक्ट बनण्याचा प्रयत्न कितीसा उत्तम हे तुमचं तुम्ही ठरावा, कारण सगळेच शिखर आपण पादाक्रांत करू शकत नाही.
असो, वाबी साबी जपान मधल्या लोकांच्या जीवन शैलीचा अविभाज्य अंग आहे. इथल्या लोकांनी जणू कुणीच ह्या विश्वात स्थायी नाही, परिपूर्ण नाही हे सत्य स्वीकारले आहे. आता सर्वच विचारांचे लोकं सर्वी कडे असतात. पण इथला इतिहास इथल्या लोकांचे रहाणीमान आपल्याला लोकांच्या जीवनात वाबी साबीचे तत्त्वज्ञान डोकावत आहे हे मानायला भाग पाडते. आता वाबी साबी म्हणजे जपानी शब्द, ज्याचा अर्थ होतो अपूर्णतेमध्ये परिपूर्णता शोधणे. अर्थात आपल्यात काय अपूर्ण आहे त्याचा पाठपुरावा घेऊन त्या अपूर्णतेला यशाचा मार्ग बनवणे, त्या कमतरतेचा स्वीकार करून , त्या कमतरतेलाच आपली जमेची बाजू बनवणे म्हणजे वाबी साबी. एखाद्या जुन्या, पडक्या, मोडक्या वास्तु वस्तू मध्ये सौंदर्य शोधणे त्याला जपणे इथे कायम आयुष्याचा भाग दिसते.
ह्या विश्वात काहीच स्थिर नाही, कुणीही परिपक्व नाही. कुठलीही परिस्थिती अथवा व्यक्ती, वस्तू , वास्तु सार काही नश्वर आहे. मग त्याचा लोभ कशाला? खरं तर हे बुद्ध धम्मांचे तत्त्वज्ञान आहे. तसा जपान बुद्ध धम्मांचे पालन करणारा शांतप्रिय देश आहे. म्हणूनच काय ते वाबी साबीच्या फिलोसॉफीने जपानला कही क्षेत्रात जग विजेते ठरवले आहे.
इकडे लोकं मला हे येते, ते येते असे सहज बोलत नाहीत, अर्थात बाता करत नाहीत तर करून दाखवतात, त्यांच्या मनात असलेला इनपरफेक्टपणा त्यांना त्याच कामाला सतत करून परफेक्ट कधी करतो आणि समोरच्याला त्यांच्या कामाच्या मोहात पाडतो हे समजतही नाही... म्हणून कदाचित इकडे लोकं परफेक्टली इनपरफेक्ट होण्याचा प्रयत्न करतात.
वाबी साबी.... to be continues….

बदल स्वीकारावा.... #जपान #वाबीसाबी
जपानी लोकांना इंग्रजी अजूनही फाडफाड बोलता येत नाही पण त्याने त्याचं काय अडलं? आज टेक्नॉलॉजीच्या जगात जपानला कोण मागे टाकू शकते. इंग्रजी येत नाही म्हणून जपान थांबला नाही, त्यांची ही कमकुवत बाजू सांभाळण्यासाठी आणि स्वतःला अंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठी त्यांनी जग भरातील इग्रजी भाषिकांना नौकरीची संधी दिली. विदेशी लोकांना जपानी भाषा शिकवण्यासाठी मेहनत घेतली. आता विदेशी वेगवेगळ्या संस्कृतीचे लोकं जर ह्या भूमीवर आले तर जपान मध्ये बदल दिसणे साहजिक होते. भारत, चीन, पिलीपिन सारख्या देशात अनेक लोकं जपानमध्ये रोजगारासाठी येतात, ते जपानसाठी काम करतात, इथला टेक्स भरतात मग इथल्या सोयी त्यांना मिळणे जशी विदेशी लोकांची गरज आहे तशीच ती जपानची सुद्धा. गरज, कमतरता आणि त्याला यशाच्या मार्गाने सोबत नेताना बदल घडत जाणार हे नक्कीच. आणि ते काळानुसार होणारे बदल स्वीकारणे म्हणजे साबी ताबीचे पालन.
वाबी साबी.... ह्याचा नेमका अर्थ ज्याचे ज्याचा तसा घ्यावा असं इकडे मानतात. पण जेवढं मी जाणलं आहे त्यानुसार तर आपल्या कमतरतेवर मात करणे असेच मला जाणवले. पण त्यापुढेही जाऊन त्याचे अनेक अर्थ आहेत.
वाबीचा अर्थ गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन. आणि साबी म्हणजे त्या गोष्टीला त्या वेळेनुसार परिस्थितीनुसार बघणे. अर्थ समजला असेलच, म्हणजे, कुठल्याही गोष्टीला त्या वेळेनुसार समजणे. आणि हेच असायला हवे आयुष्यात. एखादी गोष्टी घडण्यामागे वेळ, काळ, ती परिस्थिती महत्वाची असते. एखादा निर्णय घेताना हे सर्व आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे असते. नाहीतर समज गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त.
प्रत्येक गोष्टीची सुरवात असते, ती फलित होते, वाढते, तशी ती नष्ट होण्याच्या मार्गीही काळानुसार लागते. ह्या सर्व गोष्टीतून जात असताना सुरवातीपासून तर अंतापर्यंत बदल घडत असतो. ह्याच नेचुरल साइकिलला वाबी साबीची फिलोसोपी स्वीकार करायला सांगते.
वाबी साबी हा ब्रोड कॅन्सेप्ट आहे. मी अजूनही हा समजण्याच्या प्रयत्नात आहे. पण इथे ही फिलोसोपी अगदीच इथल्या रोजच्या जीवनात त्यांच्या रहाणीमानातला आत्मा म्हणून दिसते. इथे लोकांनी काळानुसार होणार बदल सहज स्वीकारला आहे त्यात त्यांनी त्याचं स्वतःच कदापिही सोडलेलं नाही. ते अजूनही त्यांच्या संस्कृतीला जपतात. म्हणूनच काय तर त्यांनी इथले काही ट्रेडिशन जग भरात प्रसिद्ध केले आहे. जसे टी सेरेमोनी, आता तुम्ही म्हणाल, हे काय, आपल्याकडे तर चहा पिणे अगदीच कॉमन आहे. त्याला का सेरेमोनी म्हणून मोठं करायचं. पण इथे ही एक सेरेमोनी आहे. पुढल्या येणाऱ्या भागात आपण वाचणार आहोतच ह्याबद्दल.
असो...
वाबी साबीह्या फिलोसोलीचा उदेशः समजून घेतला तर लक्षात येते की नैसर्गिक गोष्टीला सन्मान देणे. अर्थात आपल्यात कमतरता आहे तर मग ती स्वीकारणे, त्यावर त्याच्याच मदतीने मात करणे. गोष्टीला काळानुसार समजून घेणे. नैसर्गिक बदल स्वीकारणे... आता अर्थ वेगळे वेगळे असू शकतात पण उदेशः मात्र एकच....
वाबी साबी.... to be continues….

वाबी साबी.... #जपान
वाबी साबी न कळता सुद्धा इथे लोकं त्यांचे पालन सहज करताना बघितले की वाटते खूप शिकण्यासारखे आहे जपानी लोकांकडून. जुनं सोडून न देता नवीन सहज स्वीकारणे आणि त्याला आत्मसात करत जुन्याचं जतन करणे ह्या लोकांना भलीभाती उमगले आहे. जपान जगातल्या प्रगत देशात मोडतो, टोक्यो जगातील महाग शहराच्या गणनेत येते. हे सगळे बघितले तर वाटते किती प्रगत लोकं असतील इकडे. मग प्रगतचा अर्थ तरी काय! आपणही प्रगत आहोत, सारे विश्व प्रगतीच्या मार्गावर निघाले आहे. पण इथे असे नेमके काय जे ह्यांना सर्वांमध्ये वेगळं करते. खरं तर खूप साध रहाणीमान आहे इथल्या लोकांच पण आचरण अगदीच नवीन विचाराचं आणि जुन्या अनुभवाचं आहे. इथे आजही लोकं पहाटे उठतात आणि दहाच्या आत झोपी जातात. संध्याकाळची सहा सातची वेळ म्हणजे रात्रीच्या जेवणाची वेळ आहे ह्यांची. पार्टी आउटिंग सगळं काही ते दहाच्या आत आटोपतात. तसे नियम आहेत इकडे. सहा नंतर तर इथे सध्या पार्क मध्ये कुणी नसते. आता दहा नंतरही जगणारे आहेतच पण मोजके. खरा जपान तर दहाच्या आता झोपी जातो आणि पहाटे उठून कामाला लागतो.
इथे लोकं सहसा गर्भपात करत नाहीत. कायद्यानेही तो इथे करता येत नाही, अर्थात वैद्यकीय कारणाने करवा लागत असेल तर मग काही पर्याय नाही. जन्माला येणारे बाळ कसेही असेल तरी याचा सांभाळ करायला आतुर असतात इकडे पालक.... आयुष्यात एवढा मोठं बदल स्वीकारायला तयार आहेत इकडे लोकं. म्हणूनच काय तर इकडे तृतीयपंथी मानाने जगतात. सामान्य लोकांत राहतात. त्यांच्याकडे बोट दाखवल्या जात नाही. कधी अश्या लोकांशी अचानक माझी भेट झाली तरी सुद्धा मी त्यांना ओळखले नसणार हे नक्की. आणि ओळखले असले तरी मनात त्यांच्या शेजारी वावरणाऱ्या लोकांबद्दल नवल नक्की वाटले. ते सहज असतात म्हणून ते सहज त्यांच्यात सामावले जातात.
क्षेत्र कुठलंही असुदेत, सगळीकडे परिस्थिती ही कायम सारखी असणार. समस्या कुठेच सहज सुटत नसतात, त्या सोडवाव्या लागतात. आपले ध्येय जेवढे मोठे, त्याला गाठण्यासाठी परिश्रम तेवढेच घ्यावे लागतात. ह्या जगात कुणालाच यश सहज मिळत नाही. आपल्यात आशेचे किरण असले तेव्हाच प्रकाश आपल्यात शिरणार ना? मग आपल्यात असलेली कमतरतेचे भेग हेच तर कार्य करते. आपल्याला प्रकाश मान करण्याचे... बघा पटलं तर...
वाबी साबी.... to be continues….

स्वत:चा स्वीकार...
आयुष्याच्या वळणार येणारे आव्हाने निश्चितच आपल्याला थकवतात. आपल्यालाच का त्रासाला सामोरे जावे लागते, मलाच का संघर्ष करावा लागतो. माझ्या वाटेलाच हे का असे अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत असतात. कधी कधी तर आपण आयुष्याच्या सर्व बाजूने नुसता संघर्ष करत असतो. मनाला अडचणी नको असतात, किंतु आयुष्य कधीही अडचणींशिवाय नसते.
आनंदमयी असे शांत जीवन हे आपल्या सर्वांचे अंतिम ध्येय आहे. ‘वाबी-साबी तत्त्वज्ञान’ अंगिकारून आपण ह्याला साध्य करू शकतो असे जपानी लोकांचे मत आहे. पण हे तत्त्वज्ञान काय आहे? आपण मागच्या काही भागात ह्याबद्दल वाचले असेल, त्यातलीच एक व्याख्या म्हणजे स्वीकार.
आपल्या दु:खाचे मूळ कारण आपला स्वीकार हेच असते, आपण स्वत:लाच स्वीकारत नाही अर्थात मानवी स्वभाव आहे हा, प्रगतीच्या मार्गात स्वत:ला जसे आहे तसे स्वीकारणे म्हणजे काहीही न करणे असा आपण अर्थ काढू शकतो. पण तसे नाही.... स्वत:च्या प्रगतीसाठी माणसाने स्वत:ला जसे आहे तसे कदाचित स्वीकारू नये. स्वत:ला अपडेट करत राहावे हेच खरे आहे. स्वत:च्या उत्तम वर्जन साठी सतत कार्यरत राहणे अतिशय गरजेचे आहे. मग हे वाबी साबीचे तत्त्वज्ञान’ जीवनात वापरायचे कसे?
आयुष्य जगताना कुणाचेही अनुसरण करू नये, प्रत्येकाला आयुष्य आहे, शिवाय प्रत्येकाच्या प्राथमिकता वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणूनच काय तर आयुष्य जगतात आपल्याला कॉपी करून आयुष्यात यशस्वी होता येत नाही. त्यासाठी स्वत:चा स्वीकारा महत्त्वाचा असतो. आपले आयुष्य जसे आहे तसे स्वीकारून स्वत:ला सुधारण्याचे तत्त्वज्ञान’ म्हणजे वाबी साबी. आपल्या आयुष्यातील कुरूपता, कमतरता, कमीपणा स्वीकारून त्यावर मात करणे, आणि ह्यातच आयुष्याचे सुख , सौंदर्य, समाधान शोधणे हेच वाबी साबी सांगते. ज्यात माणसाने स्वत:ला बांबू सारखे लवचिक ठेवावे जे आयुष्यातील येणाऱ्या वादळाने तर हलेल परंतु तुटणार नाही. कधी कधी स्वत:बद्दल मनात असलेला न्यूनगंड माणसाच्या प्रगतीत मोठा बाधा असतो, आणि आपण नुसते कारण देत सुटत असतो. दुसर्यांवर अपयशाचे खापर फोडणे आपल्याला सहज सोपे वाटते पण आपल्या अपयशासाठी आपण स्वत: जवाबदार असतो हे आपण सहज स्वीकारत नाही.
वाबी साबी एक विचार धारणा आहे, जी जीवनशैलीत वापरली तरी आयुष्य सुख मय होईल किंवा व्यवसायात वापरली तर भरभराट.
वाचूया नवीन काही पुढील भागात...

Post a Comment

0 Comments