जोडीदार... प्रवास तुझा माझा... भाग ३३
राणे पॅलेस
“मॉम फ्लाइट इज ऑन
टाइम! वी हॅव टु गो ऑन टाइम!”
जसीकाने लॅपटॉपवर
फ्लाइटच स्टेट्स बघितलं आणि ती ओरडली.
तसा घरात गोंधळ
उडाला. सगळे आपल्या आपल्या खोलीतून बाहेर आले आणि गाड्या काढण्या साठी निघाले. आज
परत सर्व सानू सुमंत आणि श्रीला घेण्यासाठी विमातळाकडे निघणार होते. पहिल्यांदा
जेव्हा ते गेले होते तेव्हा मनात नुसता परकेपणा होता पण आज मनातून सर्व तयार झाले
होते. सर्वांना उत्सुकता होती श्रीला भेटण्याची. सानूशी बोलण्याची. सुमंतच्या
आगमनाची. गाड्या विमानतळाकडे रवाना झाल्या होत्या.
फ्लाइटमध्ये
लॅंडींगची घोषणा झाली आणि सुमंत म्हणाला,
“सानू मला गेल्या
गेल्या ऑफिसला जायला लागले, मी घरी जास्त वेळ देवू शकत नाही. काम खोळंबली आहेत.”
“काम काय रे नेहमी
असतात. आता घरी गेल्यावर काय काय झालंय हे आधी बघाव लागेल रे.”
“तसं सगळं रुडावर
आलंय अशी वार्ता आहे ना.”
“हो पण गृहीत धरून
चालणार नाही सुमंत. आपल्याला जातीने सर्वांचं ऐकून घ्यावं लागेल.”
“तू आहेस ना
त्यासाठी.”
“तू त्यांचा आहेस
हे लक्षात ठेव.”
“पण तू त्यांना
ओळखलं ना, मी कमी पडलो तिथे.”
“ते महत्त्वाच
नाही, तू असायला हवा माझ्या सोबत.”
“ठीक आहे, मी
बघतो.”
“बघतो चालणार नाही,
आधी घर नावाचं प्रोजेक्ट पूर्ण व्हायला आलाय ते पूर्ण करा मग बाहेर बघा. श्री सुद्धा
आहे आज आपल्यासोबत.”
“ठीक आहे
राणीसरकार, घे श्रीला उठवं, बघ म्हणा बाहेर.”
सानूने श्रीला
उठवलं, दोघही खिडकीतून शिकागो सिटी बघत होते. विमान लँड झालं आणि सुमंतने त्याच्या
ड्राईव्हर फोन करण्यासाठी फोन सुरू केला.
तोच मासाहेबांचा फोन आला,
“सुमंत बाहेर ये,
आम्ही आलोय गाडी घेवून.”
सुमंतला आश्चर्य
झालं, त्याने ट्रॉली घेतली, सानूने श्रीचा हात पकडला आणि सर्व गेटकडे आले, समोर
सर्व राणे कुटुंब उभं होतं. आज मिडिया नव्हती कारण कुणाला नाटक करायचं नव्हतं.
सगळे मनाने हजर होते. सानू श्रीला घेवून पुढे आली, मासाहेबांचा आशीर्वाद घेतला,
श्रीला घ्यायला लावला.
सानूला सारंगीने
येवून मिठी मारली, आज पहिल्यांदा सारंगी सानूच्या जवळ उभी झाली,
“वहिनी, चला
निघूया. श्रीपण थकला असले ना.”
सारंगही आज पुढे
आला आणि वहिनीला अलगद वाकून नमस्कार केला त्याने, ट्रॉलीतून सामान आज त्याने गाडीत
ठेवलं. सानुच्या हातातली ट्रोली त्याने आग्रहाने धरली.
जरा वेळ गप्पा
करून, श्रीची सर्वांना ओळख करवून झाली होती. आणि सगळे घराकडे निघाले. आज घरातल्या प्रत्येकाच्या
मनात ओढ होती. घरी सगळे पोहचले, आणि हॉलमध्ये बसले होते. बराच वेळ झालेला तरी
कुणीही त्यांच्या खोलीत जात नव्हतं. मुलं श्रीशी बोलण्यात गुंग होते. जया आणि
सारंगी आज मारियासोबत स्वयंपाक घरात होत्या. सानू आणि सुमंत प्रवासाने थकले होते,
स्वत:च आवरत होते. सानू जरा तयार होवून हॉलमध्ये आली, तेव्हा तिला जरा आश्चर्य
वाटलं,
“मारिया आज काय
केलंय जेवणाला ग, व्हॉट द मेनू टूडे?”
“मॅडम, चिकन
बिर्याणी आणि दही मसाला.”
“व्हा, हू टोट यू.”
“नो, मी नाही
केलाय. सारंगी ताईने केली आहे बिर्याणी. “
अजूनही सारंगी काही
सानूशी बोलली नव्हती, मनात तिच्याही बोलायच होतं पण मन अवघडत होतं. सानूने तिच्या
आणि जयाच्या नजरा ओळखल्या होत्या. तिने सुमंतला आवाज दिला,
“सुमंत चल खाली ये
लवकर, जेवायच आहे ना.“
सुमंत लगेच फोनवर
बोलतच खाली आला, आल्या आल्या तो मुलांकडे गेला,
“श्री, सुमित
शशांक, जसीका चला हात धुवून घ्या, जेवायला बसा आधी. वेळ होतो आहे.”
जसीका, ”मामा
श्रीने मस्त गिफ्ट आणली आहेत सर्वांसाठी, त्याला कसं माहीत आमच्या सर्वांच्या आवडी
निवडी...”
“तुझी मामी आहे ना
त्यासाठी...”
“अरे हो, मामीला
सगळं समजतंय ना. शी हॅज सुपर पॉवर, मला मामी सारखं व्हायच आहे. वादळ शुशु.... उडवून नेणारं, पण वाईट गोष्टी...”
“असं, मग ह्या वेळी
क्लास मध्ये फर्स्ट येशील ना.”
“आय विल ट्राय
मामा.”
सुमंत मुलांना
घेवून बेसिनकडे गेला आणि सर्वांचे हात त्याने धुवून दिले.
सगळे डायनिग टेबलवर
बसले होते. सानू तेवढ्या वेळात मासाहेबांच्या खोलीत जावून त्यांना घेवून आली होती.
मारियाने सर्वांना बिर्याणी वाढली. सर्व मिळून आज दुपारी जेवण करत होते.
जेवणापुरता विषय सुरू होता. हळूहळू बोलणं सुरू झालं, त्यात सुमंतने सानूच्या
बाबांना फोन लावला, सानू तिथूनच त्यांच्या सोबत बोलली, आणि परत जेवणाच्या टेबलवर
बोलायला विषय मिळाला. सानूच्या घरच्या
मंडळीबद्दल आज सर्वांना माहीत झालं होतं. जेवण आटोपली जरा हळुवार संवाद वाढत होता.
सानू तिच्या खोलीत आली होती, भारतातून आणलेलं काय काय ती लावत होती. थकलीही होती.
सुमंत श्रीला घेवून खोलीत आला.
श्री, “ममा ही
शेजारची खोली माझी आहे ना ग, मस्त आहे.”
सानू काम करतच
म्हणाली, “हो रे बाळा, आता ती बॅग तुझ्या खोलीत घेवून जा, मी येते मग लावून देते
सगळं.”
श्रीने बॅग ओढत
खोलीत नेली, सुमंत बेडवर पडून सानूला बघत होता, पडल्या पडल्या म्हणाला,
“काय जादू आहे काय
ग तुझ्यात, तू आलीस आणि घराला घरपण आलं. आज किती समाधान वाटलं मला सर्वांसोबत जेवताना.”
“असं, मग येणा इकडे
जरा ह्या बॅग्स कर खाली.”
“ये थकलो मी “
“आळशी कुठला.”
“कुठला ते तुला
माहित आहे.”
“सुमंत काही बोलला
काय सारंग?”
“सारंगला माझ्याशी
काही बोलायचं आहे म्हणे. “
“बोल त्याच्याशी
काय मदत हवी ते सगळी करायची आपण.”
“असं कर ना तुचं
बोल त्याच्याशी, आता कर्ता धर्ता तू आहेस मग मला का मध्ये आणतेस.”
“मग काय, तू मोठा
भाऊ आहेस त्याचा आणि त्याला तुझ्याशी बोलायचं आहे.”
“हुम्म, असं का, मी
नवरा पण आहे तुझा, मग?”
“मग ये काम कर
माझ्यासोबत, लाव जरा हे सामान.”
“राहू दे ग, उद्या
मारिया आणि डॉलीला सांग करायला. उगाच करू नकोस, मालकीण आहेस ह्या घरची.”
“ह्या घरची मालकीण
आहे मी, पण ह्या खोलीत मीचं सगळं काही आहे, त्या दोघीने लावलेलं सामान मला दिसायचं
नाही. इथे ह्या खोलीत मी बायको आणि प्रियसी असते. मालकीण ह्या खोलीच्या बाहेर...”
“मग ते काम कर ना,
ये इकडे.”
तेवढ्यात परत श्री
खोलीत आला,
“ममा, माझे घरी
घालायचे कपडे तुझ्या बॅगमध्ये ठेवले होते ग तू, त्या बॅगमध्ये नाही आहेत.”
“श्री त्या
बॅगमध्ये सगळं तुझं कामाचं सामान आहे. बसं तिकडे, पपा काढून देतात.”
सुमंत आता उठला,
त्याने सानुच्या सांगण्यांनुसार बॅगमधून श्रीचे कपडे काढले. श्रीला दिले, श्री
त्याच्या खोलीत निघून गेला. सुमंत आता सानूकडे आला, तिच्या हातातलं पाकीट त्याने
फेकलं, तिला उचललं आणि पलंगावर टाकलं,
“शु शु, अजिबात
बोलायचं नाही, झोप गुमान,
किती वेळेची बोलत आहेस.
आधी आराम कर. मग तू जे म्हणशील ना मी ते करतो.”
आणि तोही पलंगावर
आला, परत म्हणाला,
“श्रीच्या खोलीत मी
जातो आणि त्याला आराम करायला सांगतो. तू झोप आधी.”
सानूचा सुमंतच्या
कुशीत काही वेळात डोळा लागला.
अख्खी दुपार ओसरली
होती शिकागोची. जया आणि सारंग सुमंत आणि सानूची वाट बघत होते.
“अहो, कधी बोलायचं
दादासोबत.”
“मी बोलतो ग पण जरा
त्यांना आराम तर करू देत.”
“अहो पण काय ते
लवकर कळायला नको.”
“दादा नाही बोलणार
नाहीच.”
“पण ताई म्हणाली
तर...”
“मला नाही वाटत
वहिनी काही बोलेल म्हणून. “
जया आणि सारंग वाट
बघून त्यांच्या रिसर्चच्या केंद्रात निघून गेले.
सुमंत संध्याकाळी
पाच वाजता खाली आला, स्टुडिमध्ये बसून तो काही बील्स बघत होता, तोच सुमित आणि
शशांक खोलीत डोकावत आत आले,
“मोठे बाबा, श्री
दादा अजून झोपला आहे?”
“हो, पण जा ना
तुम्ही दोघे त्याच्या खोलीत, उठवा त्याला आणि खेळा तिकडे.”
“चालेल का मोठ्या
मॉमला?”
“हो रे जा.”
दोघेही पळत
श्रीच्या खोलीकडे गेले, नंतर सारंगी खोलीत आली.
“दादा, कसा आहेस?”
“अ.. अ मी ठीक आहे
ग, तू कशी आहेस, किती दिवसाने विचारात आहेस मला. कशी आहेस ग, कुठे हरवली होतीस.”
“शोधलंय ना तुझ्या
बायकोने मला... “ ती हसायला लागली.
“किती गोड दिसतेस हसताना,
अशीच राहा, तू रागात मुळीच चांगली दिसत नाहीस आणि किती दिवसाने आज तू मला आवडणारी
बिर्याणी केली होतीस. कितीतरी वर्ष मी मागे गेलो होतो खाताना. तुला आठवते आपण दोघे
बनवत असायचो, किती घाणेरडं करून ठेवत असायचो किचन, मग मा रागवत असायची.”
“हो आज मी जयाला
तेच बोलत होती. खूप दिवसांनी आज मनापासून बनवली तुझ्यासाठी! “
“काय बोलायला आली
होतीस, बिजनेस दीमाखाची आहेस, तुझी बिर्याणी खाताना वाटलं होतंच मला.”
“दादा काय रे, तसं
नाही, धन्यवाद बोलायचे होते.”
“मग तू चुकीच्या
माणसापुढे उभी आहेस. “
“दादा जरा वेळ
लागेल ना मला, वहिनीशी मोकळं बोलायला.”
“का? ती काही कधी
तुला बोलली?”
“कधीच नाही, तिने
तर न बोलता सारं काही बोलतं केलं.“
“मग, आताही तू
काहीही बोलली नाहीस तरी तुला बोलतं करेल ती. “
“कुठून शोधलस रे
वहिनीला...”
“मग... तपश्चर्या होती माझी!”
दोघेही हसले.
“दादा... जावू मी
तुझ्या खोलीत?”
“सावकाश जा ग, काही
घाई नाही, सानू झोपली आहे. मीच तिला म्हणालो, तिकडे पण सारखी धावपळ झाली तिला, मला
तर मुळीच वेळ नव्हता. आपली भारत व्हिजिट यशस्वी झाली, तो दिल्ली वाला कॉंट्रॅक्ट
मिळायला आपल्याला. तिकडे टीम सेट करण्यात वेळ गेला माझा पूर्ण.”
“अभिनंदन दादा,
इट्स बिग डील आणि तू असा सांगत आहेस. पार्टी हवी आहे.”
“देतो ग जरा रिसोर्सेस
जमवू दे मला, विश्वासू हवंय कुणीतरी तिकडे.”
“अरे मग वहिनीला
बोल ना तिच्या नात्यात कुणी असेल तर.”
“नको बोलली ती.
म्हणते, अजून तरी नाही, मी अंकितसाठी बोललो होतो.
पण ती म्हणाली, अंकितला आधी बाहेर मोठा होवू दे, आपली सोबत मिळाली तर
त्याला खूप मोठा आधार असेल, आणि तो आधार तिला नाही द्यायचा त्याला आता. तो स्वत:
परिपक्व झाला की मग त्याला बोलूया, वेगळं यूनिट हँडल करायला. सध्या तिने अॅड दिली
आहे तिकडे.”
“बापरे! जरा वेगळाच
विचार करते रे वहिनी!“
“हुमम, रिस्क होती,
भावाला वाचवलं तिने आणि पुढच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी फिक्स पण केलं, चतुर आहे.
म्हणूनच ह्या राज्याला गप्प करू शकते ती बिजनेसमध्ये. बोलू नको कुणाला, मी तर जाम
घाबरतो बाबा तिला, आता निकोलसच्या प्रोजेक्ट ची रिस्क तिनेच घेतली ना!”
“दादा, रिस्क
घ्यावी लागते कधी कधी आणि वेळेत घ्यावी लागते, तुला समजलं असेल ना आता.”
“हुमम, चूक झाली
माझ्या कडून, पण सानू नाही चुकली, तिने माझी चूक खोडून काढली. तुझ्या चेहऱ्यावर
आनंद आहे आलं त्यात सगळं. “
“ दादा आम्ही
आमच्या घरी शिफ्ट होण्याच ठरवलं आहे.”
“अग नको, इथे काय
कमी आहे आणि माझ्या बायकोने तुला घराबाहेर नाही काढलं... “
सारंगी परत हसली,”
नाही रे... आणि तिने काढलं तरी हे घर माझं आहे हे माहीत आहे मला, आणि तशी ती कधीच
बोलणार नाही हे त्यापेक्षाही पक्क आहे, काय!”
“एस, चल
रणीसारकारसाठी कॉफी घेवून जातो. तू बोल तिच्यासाठी, आणि धन्यवाद तिला दे, मला तुझा
आनंद हवा आहे, धन्यवाद नाही!, अर्थात तिलाही आनंदच हवा आहे तुझा पण ह्या धन्यवादाची
मानकरी फक्त माझी बायको आहे.”
सुमंत सोबत काही
लेटर घेवून हातात घेतले, मारियाकडून कॉफी घेतली आणि त्याच्या खोलीत गेला. सारंगी
त्याला आज असं बघून मनात हसत होती.
0 Comments