जोडीदार... प्रवास तुझा माझा....भाग १७

 


जोडीदार... प्रवास तुझा माझा....भाग १७

राणे पॅलेस

दुपार ओसरली होती पण अजूनही थंडी मात्र कायम होती. सानू आणि सुमंत खोलीत बसून गप्पा करत होते. कुणाचाही आवाज ऐकू येत नव्हता. घरात किमान डझनभर तरी लोकं होती, पण...  शांततेने तिचं साम्राज्य उत्तम पसरवलं होतं.

सानूने सुमंतला अलगद प्रश्न केला,

“काय रे घरात कुणी नाहीत काय? काहीच आवाज येत नाही. एखाद्या हॉटेल मध्ये राहतोय असं वाटत आहे.”

सुमंत हसला, “बदल मग? तू आली आहेस ना आता... मी आणि माने तर बरेच प्रयन्त केलेत, पण काही झालं नाही... मला सवय आहे पण माचा श्वास गुदमरतो इथे.”

“असं का? मग बघच तू.... हम आ गये है... नूर भी आ जाये गा... “

आता मात्र सुमंत हातचं काम सोडून उठला, सानू केसं आवरत होतीच तर त्याने तिला मागून गच्च पकडलं,

“आमचं काय मग, अजून तडपत ठेवलं आहे आम्हाला... कधी हा नूर इकडे बघणार...”

“ओ, हो हो, आलास तेव्हांपासून बसून आहेत त्या लॅपटॉपवर, म्हणे तडपत ठेवलं आहे. चोराच्या उलट्या बोंबा...”

“सानू अजून...”

“आता परत लाडात नको, सकाळी आल्या आल्या जे झालंय ते काय होतं मग...”

“कुठं काय, मला तर काही माहित नाही, मी तर कामात होतो.”

“असं म्हणजे मी स्वप्नात होती.

“हो तू झोपेत होती हे मला माहित आहे...

“सुमंत बघ हा मी तुझ्यासोबत सात समुद्र पार करून आले आणि तू असा...”

आणि ती गुणगुणायला लागली,

“लाला लाला लालाला....

सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई

ज़ुल्मी मेरी जान ...

सुमंतने तिला मिठीत घेतलं आणि अलगद ओठांवर बोट ठेवलं, नाही पुढचं नाही, कदमो के नीचे नाही तर...”

“तर रे...”

सुमंत ने तिची हनुवटी हातात घेतली आणि डोळ्यात डोळे टाकत म्हणाला,

“धीरे धीरे-धीरे आप मेरे
दिल के मेहमां हो गये
पहले जां, फिर जानेजां
फिर जानेजाना हो गये
धीरे-धीरे आप मेरे...

सानूने त्याच्या ओठांवर ओठ ठेवले आणि मग क्षणात बाजूला झाली, सुमंतने तिला परत अंगावर ओढलं,

“मग लावू का पाटी बाहेर डू नॉट डिस्टर्बची ... “

“अरे हे पण आहे का इथे...

“मग, तू शिकागोमध्ये आहेस.... आणि मला खात्री आहे ती पाटी बच्चे पार्टीने लावली ही असणार...”

“अरे कसं वाटतं ते.”

“कसं काय... यहा सब चलेगा...

तेवढ्यात रेसिव्हर वाजला, सुमंतने उचलून स्पीकरवर टाकला, मासाहेब बोलत होत्या,

“सानू, सुमंत तयार व्हा... खाली सगळी अरेंजमेंट झाली आहे. पाहुणे वेळेवर येतील,”

सुमंतने सानूला धक्का दिला,

“मग रणीसारकर व्हा तयार, मासाहेबांनी मुदिखाई ठेवली आहे.”

“सुमंत काहीही काय रे...

अग हो...”

“सुमंत!!!”

“काही नाही, तयार हो, मी बसं चिडवलं... आणि हा आता थोड्या वेळाने मारिया तुझं सामान घेवून येईल, तेच वापर, फक्त आजच्या दिवस, खाली मिडियापण असेल. बाकी तू परफेक्ट आहेच.... गेट रेडी सानू ... मी जरा खाली बघून येतो.”

सानूने सुमंतचा हात पकडला, तिच्या हृदयाची धड धड वाढली होती,

“सानू तू सुमंतची बायको आहेस. ह्या राणे  पॅलेसची राणी, तोच मिजास हवा आहे आज, गरजेचा आहे तो.”

सुमंत गडबडीत निघून गेला. सानू शॉवर घ्यायला निघून गेली. खोलीत मारियाने तिचं सारं समान लावून ठेवलं होतं. आणि ती तिची वाट बघत होती. सानू बाहेर आली, जरा दचकली, मारिया तिचे केसं कोरडे करण्यासाठी पुढे आली. सानूने नकार दिला. ती गुमान उभी होती. नंतर सानूने तिच्यासाठी पार्टीसाठी आणलेला ड्रेस बघितला, तिलाही आश्चर्य झालं होतं. मासाहेबानी आधीच सारं काही तयार ठेवलं होतं. सानूला अनयाने तयार केलेला ड्रेस घालायचा होता पण....

येताच आपला तोरा नको, तसंही तिने आधी सुमंतच ऐकलं होतं म्हणून सारं कसं वेळीच हातात आलं होतं, मग विचार न करता ती जसं मारिया तयार करेल तशी तयार झाली. तसाही तिच्या बांध्यावर तो विदेशी लुक अगदीच साजेसा वाटत होता.  मारियाने तिला हवी तशी मदत केली आणि ती हसऱ्या चेहऱ्याने निघून गेली. काही वेळाने सुमंत खोलीत आला. गड्बडित होता मग त्याने लक्ष न देताच तो शॉवर घ्यायला गेला.

सानूचं मन तिला खात होतं, ती तयार बसून होती पण कुणीच तिच्या खोलीत आलं नव्हतं. तिला कुणाची खोलीही माहित नव्हती. आता तिला जसिका आणि बच्चेपार्टीची आठवण येत होती.

तसा सुमंत शॉवर घेवून बाहेर आला, आणि सानुला त्या ड्रेस आणि गेटअप मध्ये अजुनची विदेशी वाटत होती.

सुमंत तिला हळूच म्हणाला,

“चायला मी भारतीय मुलीशी लग्न केलं कारण ह्या सो कॉल्ड पॅलेसच घर दिसावं म्हणून पण इथे तर...”

“ये सुमंत, काहीही... आता बदलू का, मला तर नकोच आहे हा, माझ्या भावाच्या बायकोने किती वेळ लावून आणि किती उत्सुकतेने माझा पार्टी ड्रेस तयार केलाय, आता बोलत होती ती कि मी तोच घालावा... पण हा एवढा मोठां झजा मला घालावा लागला ना...”

“असुदे, मी असाच बोललो, आज घाल, इकडे इकडच्या प्रमाणे होवू दे ही पार्टी, कारण बाहेरचे लोकं आहेत आज. उद्या परत घरी गेट टूगेदर आहे. तेव्हां कर तुझ्या मनासारखं...”

“हुम्म, अरे म्हणजे अजून एक पार्टी?

“हो आताच खाली मासाहेब बोलत होत्या. आजच्या पार्टीत आराध्या मावशीपण नाहीत ना? सगळे बिजनेस मधले लोकं आहेत. ती तिथे लिस्ट ठेवली आहे. टाक एक नजर त्याच्यावर...

“काय रे हे...

“राणीसरकार आज खास बिजनेस पार्टनरची घोषणा आहे. तूही लीड करत आहेस माझा बिजनेस उद्यापासून. सो थिस पार्टी इज ऑफिशीअल..... “

“सुमंत मी खरच करू शकेल काय रे?”

“मग, बायको आहेस माझी, माझ्या मागे उभं राहायचं नाही, सोबत राहायचं, माझ्या मागे माझी मासाहेब असते. तू मला सोबत हवी आहेस.

“हुम्म्म... बऱ बाबा... पण हा ड्रेस कसा सावरायचं...

“ते तू विचार करू नकोस, मरिया सतत सोबत असेल तुझ्या. ती आवरत राहील ड्रेस. बाकी तुला सर्व माहित आहेच.”

सुमंत तयार झाला होता. सानू त्याला म्हणाली,

“मग कधी निघायचं आपण खाली?”

“वेट ग, जरा बघू तर दे, तू कशी दिसतेस?”

“मी बाहुली...”

“हाहाहा....” सुमंतने तिला जवळ घेतलं,

“बाहुली नाहीस, बायको.... तेही माझी... मासाहेब कॉल करतील तेव्हां जावूया खाली, पाहुणे जमले असतील... अन मिडिया कव्हर करणार ते सगळं...

तोच फोन वाजला, मासाहेब बोलत होत्या.

सानूचा गोंधळ उडाला होता, तिचं हृदय जोरात आवाज करत होतं, सुमंतने तिचा हात हातात घेतला, त्याला तिची ती धकधक जाणवली होती, दोघेही निघाले, दारापासुनच मिडिया त्यांना  कव्हर करत होती. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अगदीच स्टेजवर आल्यावर सुमंतने माईक हातात घेतला. सारेच पार्टीमध्ये सानूला बघत होते. तोच सुमंतने घोषणा केली,

सो, आजपासून राणे कंपनीचे दोन पार्टनर आहेत.... मी आणि सानवी... सानवी मोहिते राणे लवकरच ऑफिस जॉईन करणार... आणि सगळे प्रोजेक्ट बघणार.

सुमंतच असं जगजाहीर करणं घरात सर्वांना लागलं होतं. लहान भाऊ सुशील आणि बहिण सारंगी नाराज झाले होते. कंपनीत त्यांच्याही शेअर होतेच पण ते करत काहीच नसल्याने नाईलाज म्हणून मासाहेबांच्या मनाप्रमाणे सुमंतने ही घोषणा दिली होती. सर्व सानवीला अभिनंदन देत होते. भाऊ सुशील आणि बहिण सारंगी एका कोपऱ्यात कुजबुज करत उभे होते. ते स्टेजवरही आलेले नव्हते. सुमंत सर्वांशी बोलण्यात मग्न होता, तो प्रत्येकाला सानूशी भेटवून देत होता. साऱ्यांना आता माहित झालं होतं कि सानूच भारतातला प्रोजेक्ट सांभाळत होती मग कुणाला शंका उरली नव्हतीच तिच्या कार्यक्षमतेवर... शेवटी दोघांनी डान्स केला. सोहळा अगदीच मस्त पार पडला, सारंगीने मस्त ड्रिंक्स केलं होतं, ती तिच्या धुंदीत होती, आता ती शेवटी काहीतरी गडबड करणार हे मासाहेबांच्या लक्षात आलं होतं. तिने मारियाला बोलावून सारंगीला आत घेवून जायला सांगितले.

मारिया तसं करायला गेली तर सारंगी तिच्यावर ओरडली,

“ये, डू नॉट टच मी.... जाते मी माझी... हुम्म्म... बघू आता सगळं.”

तिच्या अश्या बोलण्याने पार्टी जरा वेळ गोंधळली होती पण, मग सारं काही स्थिरावलं आणि सारे रमले....सानूने मात्र सारं काही सुटलेलं अलगद टिपलं होतं, तिच्या येण्याने घरात फुट पडली कि काय असचं तिला वाटत होतं. सुमंतने असं एकाऐकी  तिला अगदीच पार्टनर म्हणून जाहीर करणं तिला सुखावलं असलं तरी कारण कळत नव्हतं. घरात खूप काही अजून तिला कळायला बाकी होतं मग नुसतं स्मित हास्य ठेवत ती सर्वांशी बोलत होती.

Post a Comment

0 Comments