जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग ८

 


जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग ८

सानूच्या खोलीत राणी आणि सानू होत्याच, दोघीही तयार झाल्या होत्या, तोच राजनने दारावर नॉक केलं,

“राणी येतेस ना बाहेर... आपल्याला समोर जायचं आहे.”

राणीने दार उघडलं आणि राजन तिला बघतच राहिला, तिला डोळा मारत म्हणाला,

“काय, आपणही घ्यायचे काय ग परत फेरे... “

म्हणत त्याने त्याच्या खिश्यातून अलगद गुलाबाचं फूलं काढलं, राणीला देत तिला अलगद मिठी मारली आणि कानात म्हणाला,

“काय आज बेत काही? तसं आम्ही इथेच घायाळ झालोय.”

राणी लाजली, राजनला बाजूला करत ती हळूच म्हणाली,

“महिना वाढला आहे ह्या वेळी, पत्ता कटणार कदाचित.”

राजन लगेच बोलला,

“म्हणजे... मी??”

“नाही नाही, असं काही नाही.... मी तर असचं बोलले... पण असलं तर...”

“तर तेही मंजूर राणी... आता तर तुझं सर्व मंजूर....”

“जावूद्या हो, तुमचं काहीही... असंच बोलले मी.”

“हुम्म.... चल निघूया आपण... दी ला सांग... “ म्हणत त्यानेच आवाज दिला,

“दी गेट रेडी..... एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी... एन्जॉय.... आम्ही निघतोय खाली...”

घरातले सर्व समोर मांडवात आले होते स्वागतासाठी. घरही उत्सुक होतं... सानू जवळ असलेली पार्लरवाली तिचं सामान आवरत काही सामान धुण्यासाठी खाली आलेली होती. सानूच हृदय बाहेर वाजणाऱ्या  बैंड बाजा च्या तालावर जणू जोरात धडधडत होतं. मनात हुरहूर वाटत होती पण सुखाहून जात होती. सजलेली सानू आज स्वत:ला बघून काहीशी बावरली होती. स्वतःचे फोटो घेत होतीच तर तिच्या खोलीच्या खिडकीतून टक टक आवाज आला. सानूने जरा दुर्लक्ष केलं. पण आवाज परत परत येत होता. आता मात्र तिला राहावलं नाही. खिडकीजवळ गेली तर आवाज बंद झाला आणि मग तोच आवाज दारावर आला. कुणीतरी दार ठोकत होतं. सानूने आधी राणीला फोन लावला, तिने उचलला नाही, मग राजनला, बाळूला... कुणीही उचलत नव्हतं... आणि तिचा फोन वाजला.... सुमंतचा,

क्षणाचाही विलंब न लावता तिने उचलला,

“अग दार उघड ना. मी आहे बाहेर....”

सानूला अजून विश्वास होतं नव्हता, तिने दुसर्‍या खिडकीतून बाहेर डोकावलं, खाली वरात आली होती. आता तिचा विश्वास बसेन कठीण झाला होता. फोन कुणीच उचलत नव्हतं. विचारत पडली होती, खाली नाचण्याचा गोंधळ सुरू आहे. सर्वांच स्वागत सुरू आहे मग माझ्या दारावर सुमंत कसा? आणि तिच्यातलं जरा शमलेलं वादळ परत उभं झालं, सुसाट मनाचा ताबा घेत तिने हातात खोलीत असलेला दंडा घेतला आणि दार उघडलं....

 

सानुने दार उघडलं, समोर कुणीच नव्हतं,

“चायला, कुणाची हिंमत माझं दार ठोकण्याची, कोण आहे, अरे समोर ये हिंमत आहे तर, असा लपून काय दार ठोकतोस.”

सानू दार लावणारच तोच सुमंत समोर उभा राहिला,

सानू, “ये, वेडा आहेस काय रे तू?”

“हो त्यात काही शंका आहे का तुला.”

“अरे पण इथे आलास! कुणी बघितलं तर! आणि आता बसल्या असत्या तुझ्यावर तर... ओ नो यार...मी पण ना...”

“वेडाच तर आहे, बघूदे ना, घाबरतो काय ग? अरे होणारी बायको आहेस माझी.

“होणारी ना!”

“अर्थात अजून काय उरलं आहे ग, इथेच बांधतो मंगळसूत्र, हे बघ घेवून फिरतोय खिशात.”

“अरे तू ना, पण मग खाली कोण आहे?”

“मी तर इथे आहे बाबा, मला काय माहित खाली कोण आहे ते.”

“त्याने सानूचा हात पकडला आणि तो खोलीत शिरला, रागात काय मस्त दिसतेस ग तू. एकदम झक्कास. एवढ्या दिवसात हे तुझं सर्वांनी सांगितलेल रूप कधीच बघितलं नव्हतं. डोळे कसे शोधत होते... शेवटी बघितलं बाबा. आता कसं मन शांत झालं...”

“हुम्म, तू आलास ना माझ्या आयुष्यात मग जरा... वळण बदललय रे.”

“हो, मला हेही वळण पसंत आहे...”

“असं बघ बाबा, वादळ म्हणतात माझ्या ह्या रुपाला इकडे सर्व.”

“तिकडेही ह्याच वादळाची गरज आहे.”

सुमंत आणि सानूने गच्च मिठी मारली, सुमंतने सानूच्या माथ्यावर ओठ टिपले. त्याने अलगद त्याच्या खिशातून एक अंगठी काढली,

“सानू, ही आपल्या ह्या भेटीची भेट.”  सानूने हात पुढे केला,

सुमंत अंगठी बोटात घालत म्हणाला,

“ही साखरपुड्याची आणि ही ह्या भेटीची, दोन्ही हातात ठेव. ही तुझ्या माझ्या प्रीतीची आणि ही आपल्या नवीन प्रवासाची...”

“सुमंत काहीही सुरू आहे तुझं...”

“नाही ग, मी ही अंगठी खूप आधी शिकागोला घेतली होती,

“कुणासाठी रे...”

“कुणासाठी असं काही नाही, बसं  वाटलं घ्यावी म्हणून, पण कुणी हिला वाली भेटत नव्हती, तू भेटलीस आणि ह्या अंगठीची मालकीण मिळाली.”

 आणि सुमंत निघाला. सानू बघत राहिली, सुमंत गर्दी गर्दीतून वरातीती पोहचला, सानू स्मित हसली.

“भारीच दिसतोय, पहिल्या त्या भेटीत वाटलंही नव्हतं कि हा माझा जोडीदार असेल, किती सहज छेडल्या होत्या त्या तारा...आणि आज सुमंत माझा जोडीदार म्हणून उभा आहे...

मनात हसली, जरा लाजली, स्वत:वर स्मित हसत होती, म्हणाली,

“आगर किसी चिज़ को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उससे तुमसे मिलने की कोषिश में लग जाती है!”

परत दरवाज्यावर थाप पडली,

“तायडे दार उघड मी आहे राणी.

सानूने पटकन दार उघडलं, राणी तिचा चेहरा बघून म्हणाली,

“आहा, काहीतरी घडलेलं दिसते आहे इथे. तुझा चेहरा कसा फुलाला ग.”

“ये काहीही तुझं.”

“मस्करी नाही, आले होते ना जीजू इथे.”

सानुने तोंड उघडच ठेवलं,

राणी, “अग बंद कर ते, आमची टीम आहे, ग्रुप आहे आमचा, ज्यात फक्त तू नाहीस, आता आगे आगे देखो क्या क्या आगे आता है!

“आयला तू कधी पासून अशी झालीस ग, नुसती आईचा डाइलॉग मारणारी, काहीही पण हो तुमचं, काहीही तायडे... असं नाक तोंड मुरडून बोलणारी तू ....

“अरे,... लग्न अख्या अख्यांना बदलतं, तू स्वतःला बघ आधी, काय होतीस तू आणि बघ आता प्रेमात वाया गेलीस तू....

“थांबा तुम्ही सर्व, लग्न होवून जावू द्या, सगळ्यांना बघते...

“हुम्म... बघ कि आधी.... जीजुला... सरदार आहेत ते ह्या सर्व गोष्टींचे... काय आयडिया  काढतात... राजन रावं तर म्हणाले होते चायला मिस केलं सांर म्हणून...

“मग चोइस ग चोइस....

“ये इतरु नको आता... वरात मांडवात आली आहे... तयार हो जावो दी...

आई आता आतमध्ये शिरली,

“ये सानू, आवर सांर, वरात मांडवात आलेली आहे. राणी कर ग तिची ओढणी नीट....”

 आणि बाळूला आवाज दे आई पुढे म्हणाली,

“काय ती छत्री आली आहे तिच्या सासरवरून, नववधू म्हणे त्याच्या सावलीतच मांडवात यावी असा आदेश आहे मासाहेबांचा.... मोठ्यांचे मोठे चोचले ग, राणी तिची ओढणी अजून खाली घे, चेहरा दिसायला नको म्हणतात ते, लग्नमंडपापर्यंत.”

आईच्या मागेच सानुचे सर्व चुलत भाऊ आले, सानुला खाली न्यायचे होते , सानुने कैलासला बघितलं आणि ती ओरडली,

“अरे कैलास तू आत्ता येतोस, साल्या तुझी वाट बघत होते मी, जीवा भावाचा मित्र ना तू, कामचोर साला.

“ये सानू, ड्यूटि लागली होती कि तिकडे संसद भवनात, म्हणून जमलं नाही, आणि माझी ही गौरी.... म्हणजे बाप होणार आहे मी लवकर... पण आली आहे तुझ्या लग्नात तुझी मैत्रीण.”

बसं बसं, तुलाही बघते मी नंतर... उचल माझी ती छत्री आता.

सगळे हसले, आणि सानू सोबत सर्वच मांडवात निघाले, राजकन्या मांडवात आली होती राणी होण्यासाठी. डोळे अगदीच दिपावे असा तो सोहळा होता. सांर कसं राजेशाही थाटात होतं.

लग्नाची प्रत्येक रीत  श्रेणीसुधारित झाल्या होत्या, आणि त्याच्या संपूर्ण खर्चाची काळजी नकळत सुमंत कडच्यांनी घेतली होती. तसा मासाहेबांचा म्हणजे सानूच्या होणाऱ्या सासूचा आदेश होता सर्वांना, त्यांच्याही घरचं शेवटच लग्न होतं हे. खुद्द सानूकडचे आश्चर्य चकित होते कि सगळ्या रिती भाती राजेशाही थाटात अपग्रेड झाल्या होत्या. सानूच्या अंगावरच्या कपड्यापासून तर मांडवातल्या पद्धतीपर्यंत सारच डोळे दिपवणार होतं. सानू सुमंतला मांडवात  मुंडावळ्या बांधल्या जात होत्या, आईच्या डोळ्यात अश्रुनी गर्दी केली होती, बाबांनी अलगद तिचा हात धरला,

“काय आरती आलाय ना राजकुमार आपल्या सानूसाठी, आणि तू ग किती काळजी करत होतीस, काय काय नाही बोलत होतीस माझ्या लेकीला. बघ आता, आपल्या सात पिढ्यांनी असा विवाह सोहळा बघितला नसेल ग, आज मोहिते निवासातल्या सर्व पूर्वजांना आनंद होतं असणार.”  

आई पदराने डोळ्याच्या कळा पुसत म्हणली, “होय हो, तुमच्या लाडाच्या लेकीच्या नशीबात राजयोग म्हणावा, बघा हो कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय, दोघेही जोडीला जोड आहेत. समवयीन आणि समंजस वाटतात, एवढा थाट असूनही सुमंत रावं गर्विष्ठ वाटत नाहीत, हों ना?”

“हो ग, पण आपली सानू वाटते हा, म्हणजे, गर्विष्ठ नाही पण जावयापेक्षा जरा चतुर आहे आणि ते तिच्या चेहऱ्यावर दिसतं... असावं ही, मुलगी आहे म्हणून तिला अशी ती ना दबून राहत नाही, कसा मोकळेपणा दिसतो तिच्यात.”

“काय हो काहीही हो तुमचं, मासाहेब तर तिची स्तुति करत असतात सतत.”

“हो ग, मला कधी कधी त्याचीही काळजी वाटते. पण मुलीवर आणि सुमंत रावांवर विश्वास आहे माझा. तिकडे शिकागो मध्ये म्हणे त्यांचा लहान भाऊ आहे बहिण आहे. भाऊ काहीच करत नाही आणि बहिण सुमंत रावांच्या भरोसे आहे. साऱ्यांनी मिळून लुट लावली आहे म्हणे असं कानावर आलंय ग, आपली सानू तशी वादळ आहे पण .... असो म्हणूनच कदाचित मासाहेब तिच्याकडून अपेक्षा ठेवत असतील कि तिने सर्वांना मार्गी लावावं म्हणून.... सुमंत त्याच आयुष्य कधीच जगाला नाही म्हणे. लहान वयात कारभार हाती घेतला त्याने आणि तेव्हापासून फक्त कामात आहे. सानू त्याला पसंत पडली तेव्हांच मासाहेबाना आश्चर्य झालं होतं... अन हळूहळू जावई पार प्रेमात पडेल आपल्या सानूच्या... बघ ना काय दिसतोय दोघाचा जोडा.”

“मग माझी सानू आहेच तशी... आणि काय हो तुम्ही बरी माहिती काढली जवयांकडली.”

“मग! बापाच काळीज, आणि त्यातल्या त्यात माझी लाडाची लेक ती, सब खबर रखणी पडती हे राणीसरकार.

तोचं भीमा काकांनी आवाज दिला, मंडपात मंगलाष्टका सुरु करायची होती. सारेच समोर निघाले, मंत्र उच्चारण होतं होतं आणि दोन मन एकमेकांना साक्ष देत उभे होते. पुष्पमाला एकमेकांनी टाकल्या. सर्वांचे आशीर्वाद घेतले. आणि रीतसर विवाह कंकण बंधनानंतर वर वधू होमासाठी बसले. लग्न विधी विधीने वळत होतं... सर्वांचा मान सन्मान सांभाळत मोहिते आणि साने मांडवात वावरत होते.


कथेचा पुढचा भाग लवकरच.


---

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक- https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....

© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल

Post a Comment

0 Comments