जोडीदार.... प्रवास
तुझा माझा! भाग ७
लग्न म्हटले की घरातला
कोपरा नी कोपरा व्यस्त असतो. काय प्रश्न पडला का?
अहो सामान असतं ना
कोपऱ्या-कोपऱ्यात... आणि मनाचे कोपरे गुंतत असतात... सगळे रुसवे-फुगवे हरवून लग्न
कार्य निर्विघ्न पूर्ण व्हावं असचं वाटत असतं सर्वांना.
असो, खरंच आहे ते,
आज मोहिते निवासातही तेच होतं, मनाचे कोपरे आणि घराचे कोपरे सारे व्यस्त होते.
मनात आनंदा सोबत चिंता भरली होती आणि घरात सामान प्रत्येक ठिकाणी होतं.
रात्र चढत होती पण
आज काही घर शांत होतं नव्हतं. आरतीला अरुणची काळजी वाटत होती. तिचं मन काही
थाऱ्यावर नव्हतं, उलट सानूला काही कळू नये म्हणून सर्व कसं व्यवस्थित आहे हे दाखवताना
तारांबळ उडाली होती. सानू तर तिच्या स्वप्नात मग्न होती आणि तिला खालच्या माळ्यावर
अनया आणि राणी येवू देणार नव्हत्याच. लग्न सोहळा सकाळी असल्याने तिने निवांत आराम
करावा हा हुकूम राणीने सोडला होता.
हळूहळू सारं काही
जरा वेळेसाठी शांत झालं होतं, काय ते रात्रीचे दोन वाजले असतील... घराने जरा डुलकी
घेतली होतीच तर, परत घर पहाटे जागं झालं... कॅटरिनवाले कामी लागले होते. बाळूची
पहाटे पासून वर्दळ सुरू झाली होती. भीमा काका आणि सदाही त्याच्या सोबतीने कामाला
लागले होते. सगळ्याच्या नजरा चुकवून अरुण हळूच सानूच्या खोलीकडे निघाला. सानू आणि
छकुली खोलीत झोपल्या होत्या. अरुणने अलगत खोलीच दार सारलं, सानूला निवांत झोपलेलं
बघून अरुणचे डोळे पाणावले, मनात म्हणाला,
“उद्यापासून हे
वादळ मोहिते निवासात नसणार... सवय झाली होती ह्या वादळाची ह्या निवासाला... सानूचा
आवाज घरात नसला तर घर तर मुकचं होईल...”
विचारात होतेच तर
अनया अंकितवर जोरात ओरडण्याचा आवाज बाबांना आला,
“अंकित, काय हे!
तुला सांगितलं ना गुलाबांच्या पुष्पमाला हव्यात, आता वेळ आहे, फोन कर त्या
फुलवाल्याला.”
“बऱ बऱ... शांत हो”
अंकित तिला शांत करत म्हणाला
“आणि हा, बाबांच्या
औषधी आधी शॉप उघडताच आण, सोबत असलेल्या कधीही उत्तम, तू आण स्वतः, कुणाला सांगू
नकोस.”
“हो ग बाई.” अंकित
परत बोलला.
सानूच्या खोलीच्या
दारातून मागे होतं बाबा स्मित हसले,
“आता... हे वादळ
बरसणार मोहिते निवासात... सवय नाही पण करावी लागेल... मुलीच्या रागवण्याची गंमत
सुनेत नसणार पण हक्क तिचाही आहे... माझ्यावर रागवण्याचा. चला मुलीची जागा सुनेला
देणे शक्य तर नाही पण सुनेला मुलगी मानायला काय हरकत आहे.” म्हणत त्यांनी अनुला
आवाज दिला,
“अनया, बाळा मला
चहा देतेस का ग करून?”
अनयाने खोलीचं दार
उघडलं आणि ती लगेच म्हणाली,
“बाबा तुम्ही इकडे? मी आले असते ना, हो आता
टाकते चहा तुमच्यासाठी. पण तुम्ही आधी खोलीत व्हा, आराम करा. मी येते घेवून.”
बाबा काहीच बोलले
नाही पण अनया समजली होती कि ते सानूच्या खोलीकडे आले होते म्हणून. बाबा पायऱ्या
उतरत होतेच तर अनयाने त्याचा हात पकडला आणि त्यांना खोलीपर्यंत नेवून सोडलं आणि
ताकीद दिली,
“बाबा हे बघा, मला
कळालं तुम्ही वरच्या माळ्यावर का आला होता ते, पण आता सानूला तिचं आयुष्य आहे
ना... आपल्याला तिचा आनंद हवाय... हो की नाही?”
बाबा नुसते मानेने
होकार देत पायऱ्या उतरत होते.
अनु परत म्हणाली, “आपलं
प्रेम तिला बांधू शकत नाही ह्या मोहिते निवासात. पण आपल्या प्रेमाच्या बंधनात ती
सदा असेल.”
बाबा हसले, निवांत
पलंगावर बसले, म्हणाले,
“चहा आणतेस ना, मी
चहा घेवून पडतो जरा, लेकीची पाठवणी करण्यासाठी तयार व्हायच आहे.”
“बाबा पाठवणी कशाला
म्हणता हो, ती तर कधीच नसते...”
बाबा तिच्याकडे बघत
राहिले, तर ती परत बोलली,
“पाठवणी हा शब्द
बोलून आपण परकं करतो मुलींना. कधी काळजाच्या तुकड्याची पाठवणी होवू शकते का?”
बाबा तिच्या
डोक्यावर हात ठेवत म्हणाले, “अनया, भावना उमगल्या ग तुझ्या, तुझे बाबा आणि आई
येणार आहेत ना?”
“हो येणार आहेत आणि
मग दोन दिवस इकडेच थांबणार आहेत. अंकित च बोलून झालंय बाबांशी.”
“असं होय, तू
बोलतेस की नाही?”
आता मात्र अनु जरा गोंधळली,
“म्हणजे बोलते, पण कदाचित बाबांना अजूनही माझ्यासोबत ते का असे वागले म्हणून वाईट
वाटत असावं म्हणून ते मला टाळतात, हा पण अंकितशी जमतं हा त्यांच, त्याच्या आणि
त्यांच्या गप्पा सुरू असतात बिजनेसाठी.”
“ते आता आले की
खडसावतो मी मग.”
“बाबा आधी आराम
करा, आवाज बघा तुमचा, तेच ओरडतील तुमच्यावर... पडा बघू, मी येते आल्याचा चहा
घेवून.”
अनया खोलीतून निघाली
आणि बाबा मनात बोलले,
“सत्ता आजपासून
बदलली अरुणराव, स्वत:च्या मुली स्व: मर्जीने दुसर्याच्या घरी जाणार आणि दुसर्याच्या
मुली इथे राज्य करणार... सत्ता पालट ह्यालाच म्हणतात... हीच रीत आहे... आणि हे स्वीकारवचं
लागेल मला. अनया गोड मुलगी आहे, तिलाही अधिकार आहेच माझ्या मुलीसारखा, पण ही पण
जाणार आहे ना बँगलोरला लवकरच... हुमम.... मग आम्ही दोघेच असणारं इथे ह्या
निवासात... चला मोहिते साहेब पिल्ले भरारीसाठी सज्ज झालीत, त्यांच्या पंखात बळ
आलंय मग आपण का थांबवायचं त्यांना...”
खरं तर आहे, हा बदल
स्वीकारणं महाकठीण आहे, आपण पहल खूप आनंदात करतो, मुलींचं लग्न, सूनेच स्वागत पण
हा घरात होणारा बदल मनापासून स्वीकारला ना तरच घरात आनंद टिकून राहतो... नाहीतर
घरो घरी मातीच्या चुली अजून काय! भांड्याला भांड आपटून भांडे विभाजनाची वेळ येवू
नये म्हणजे झालं.
पहाट लागलीच सकाळ
झाली होती. आणि सर्व घर उठलं होतं. लग्न सानूच होतं मग काय घरात नुसतं वादळ असणारच
ना, वादळासारखा उत्साह शिरला होता मनामनात, सगळे सर्वांचे होते पण कुणी कुणाचं
नव्हतं त्या गोड वादळात. सर्वांना कसं नीट तयार व्हयाच होतं, आतल्या खोलीत आरती
आणि आराध्या तयार होतं होत्या. दोघी एकमेकींना तयार करत होत्या. वरच्या माळ्यावर
सानू स्वत: तयार होतं होती, मेकअप करण्यात तिचं पटाईत होती. पार्लर वाली होती पण
तिची सानूला मदत करत राणीला तयार करत होती. बाजूच्या खोलीत अनया तिच्या बहिणीसोबत
तयार होतं होती. नाती सांभाळावी म्हणून आलिया तिच्या नवऱ्या सोबत सकाळीच आली होती.
तिचा नवरा अभिजित आणि अंकित बोलत खोलीच्या बाहेर उभे होते. पण अभिजितच लक्ष
त्याच्या बायकोवर होतं. अलीयाच्या प्रत्येक हालचालीला तो नीट टिपत होता. अंकित
त्याला म्हणाला,
“अभिजित चल होवू
देत त्यांना तयार, आपण मांडवात बघूया.”
अभिजित, “नाही, मी
आलिया घेवून येतो मांडवात.”
“अरे, राहूदे ना
तिला तिच्या दी जवळ तशीही आपली तयारी झालीच ना?”
“अ अह...” अभिजित जरा
गोंधळला, त्याला आलियाला एकटं सोडायचं
नव्हतं, भीती होती काही ती तिच्या दि ला सांगेलं म्हणून... अवघडत म्हणाला,
“आलिया मी आहे खाली,
लवकर ये, आपल्याला त्या गुरुजींशीही बोलायचं आहे. आईने सांगितलं आहे.”
अभिजित आलियाचा
नवरा, म्हंटल तर उच्च पगारची नौकरी. घरी सर्व काही, नोकर-चाकर, गाडी-बंगला, पण
बायकोकडून काय आणि किती मिळायला हवं ह्याच गणित त्याच्या दिमाकात सतत फिरत असतं.
अनुच्या बाबांनी हा त्याचा लाजमा बघून आलियाच लग्न जुळवलं पण लग्नाच्या महिन्या
भरात मुलीच्या सुखासाठी प्रापर्टी विकावी लागली त्यांना आणि मग अंकित आणि अनया हळू
हळू त्यांच्या जवळ आले. अंकितवरचा राग कसा कुठे उडाला आता कळतही नाही. अभिजितने
कधीच त्याच्या बायकोवर हात उचलला नाही पण तरीही त्याची वचक खूप जबरदस्त अलियावर होती.
अभिजीतला वळणावर आणावं हीच ऐक अपेक्षा अलीयाच्या वडिलांची आणि त्यात त्यांना अंकित
कडून मदत हवी होतीच. आणि हे सर्व अनु अंकित जाणून आहेत.
आपल्या जराश्या
चुकीची शिक्षा अलीयाला होवू शकते हे सर्व जाणून होतेच म्हणून कुणीच तिला त्रास
होवू नये असेच वागत असायचे पण नातं न तुटता अलगद गुंतावं हाच प्रयत्न सुरु होता.
अभिजित जाताच अनु
अलीयाला म्हणाली,
“काय तुझ्या सासूने
सोडलं तुला इकडे येण्यासाठी.?”
“हो दी, तुझ्या
सासूबाई घरी आल्या होत्या पत्रिका घेवून आणि माझ्या सासूबाईच्या महिला मंडळातल्या
अध्यक्ष काकू तुझ्या सासूच्या मैत्रिण आहेत म्हणे..”
“अग बाई.. “
“मग पाठवणारच ना?”
“जमलं तर, मला तर
आश्चर्य झालं तुला सकाळीच बघून.!”
“मलाही काल, म्हणजे
ह्याच्या आई, खोलीत येवून मला लग्नासाठी जा म्हणून सांगून गेल्या.”
“मग त्या नाही
येणारं का?”
“नाही बोलल्या,
त्यांना काही काम आहे म्हणे. म्हणून ह्यांनाही पाठवलं माझ्यासोबत.”
“हुमम... असो, होईल
ग सगळं नीट. काळजी करू नको.”
“हो... होईल, आता आलिया
भोगाशी असावे सादर...”
अनु हसली, “काय ग,
आलीयाच्याच आलाय ना अंगाशी......”
दोघीही जरा हसल्या,
आणि आलिया मोकळी झाली. चेहरा अगदीच फुलाला तिचा. तसा तिला कुठला त्रास नव्हता पण
होता तो त्रास सांगायला शब्द नाहीच...”
छकुली आत डोकावत
होती, तर अनया तिला म्हणाली,
“छकु, ये रे बाळा,
मी तयार करते तुला, आत्या कुठे आहे ग.?”
छकुली, लाजत खोलीत
शिरली, तिच्या हातात फ्रोक होता, आणि रबर बेंड,
“अनु वहिनी, पोनी
करून दे ना, आई दिसत नाही आहे मला. मला मांडवात जायचं आहे.”
अनयाने तिच्या
केसांची पोनी करून दिली, फ्रोक घालून दिला, तोच अंजू आत्या छकुला शोधत घरात शिरली,
“अरे इथे आहेस काय ग? चल मी तयार करून देते,
अरे, अनु वहिनीने तयार करून दिलेलं दिसते.”
अनु हसली, “आत्या तुम्ही व्हा तयार, छकुली आहे माझ्या सोबत.”
“नाही ग, तू कशाला, मी बघते हिला.”
“काय! म्हणजे, व्हा ना तयार?”
“मी काय तयारच ना.”
“अहो जरा मेकअप करा, या इकडे मी करून देते.’
“राहूदे ग, मला काय गरज त्याची. कोण वाली आहे
त्याचा, कुणासाठी करायचं आता.”
“अरे.... आत्या,
असं काय! सानू दीला कळालं तर... स्वतः साठी करा हो... ”
म्हणत तिने आत्याला
ओढलं, आलियाने आणि अनुने तिला नीट तयार केलं. अंजू आत्या सुरेख दिसत होती. तोच
अंजूला हाक मारत आराध्या खोलीत आली,
“अंजू कुठे आहेस,
मी कधीची शोधते तुला. आहा, सुंदर दिसत आहे ग, सुनबाईने तयार केलेलं दिसते.!”
अंजू हसली, “हो,
केलय तिने, कशी दिसते मी, उगाच काही बाई नाही ना वाटत. अनु हे काढ ग जरा जास्त
वाटत आहे.”
आराध्या, “अंजू,
सर्व ठीक आहे.”
“आणि अनया बिलकुल
काहीच काढायचं नाही. तिला सूट होईल असचं केलंस सर्व.”
तोच भीमा काका ओरडत
म्हणाले,
“अरे झाल्या का
तयाऱ्या सर्वांच्या, वरात समोरच्या चौकात आली आहे. महिला मंडळ बाहेर या. आपल्या
आपल्या जागा घ्या मांडवात.”
भीमा काकाच्या
आवाजाने सर्व कसे अगदीच अलाराम वाजल्या सारखे आपल्या-आपल्या कोषामधून बाहेर आले होते.
कथा क्रमश:
0 Comments