जोडीदार.. प्रवास तुझा
माझा .. भाग ३
अनु तिच्या खोलीत
आली होती, जरा स्वतःला आवरत होती. फोन वाजला, बघितला तर तिच्या आईचा होता, पटकन
उचलला,
“काय ग आई कशी आहेस?”
“मी मजेत ग बाळा,
तू कशी आहेस?”
“मीही मजेत.”
“खरंच ना, बाबा
सांगत होते कि तू सर्वच करतेस म्हणून तिकडे, थकत नाहीस काय ग? बारीकपण झालीस, मी
फोटो बघितला तुझा डीपीला.”
“आई काही नाही, मी
जैसे थे आहे. तो ड्रेस तसाच आहे. ह्यांनी आणलाय बँगलोरवरून.”
“अरे हो कधी निघताय
तुम्ही?”
“अवकाश आहे ग अजून,
आता सानूदीच लग्न झालं कि बघू, इथलं सगळं सांभाळून निघू.”
“लवकर निघा ग, काय
इथे राहतेस? तू आणि तुझा जोडीदार तिकडे वेगळे बरे.”
“आई, काय बोलतेस!”
“नाही ग, मी आपलं,
तुझा विचार केलाय, म्हणजे तुला लग्नापासून कुठे प्रायवसी मिळाली नसणार. मोहिते
निवास म्हणजे ना पाहुण्यांचा ढेर आहे. कुणी ना कुणी येतच असतं. घारात नुसता गोंधळ
असतो मोहित्यांच्या.”
“म्हणूनच मोहिते
निवासाचा मोह सुटत नाही ना मला... मी खुश आहे त्यांच्यासोबत. आणि हा मला माझी
हक्काची खोली आहे ना प्रायवसीसाठी, आमच्याकडे खोलीत कुणी बेधडक घुसत नाही. नॉक
करून येण्याची पद्धत आहे....”
“तरी पण काय तो
नातेवाईकांचा आणि मित्रमंडळीचा पसारा सारा...”
“आई, सगळे जवळचे
आहेत आणि विसरू नकोस, त्यांची मला संभाळलय.”
“हो ग, मान्य आहे, पण
तू आपली भोळी आहेस आणि तुला सगळे भुलवतात.”
तोच होर्नचा आवाज
आला, अनु लगेच म्हणाली,
“आई तसलं काही
नाही. मी खूप आनंदात आहे, निदान तिथल्या पेक्षा तरी, तू ना आपल्या आलियाची काळजी
घे, तिची सासू तशी आहे ना म्हणून तू मलाही तसचं बोलतेस, फरक आहे ग माझ्या घरच्या
लोकांमध्ये आणि तिच्या... तुझा सूर बदलत जा मला फोन केलास की. आणि आता भीमा काका
आणि सूनी काकी आलेत, गाडीचा होर्न वाजवलाय अंकितने. मी निघालेच खाली. तू काळजी घे.
मी येईल मध्ये भेटायला.”
अनुने फोन ठेवला.
मधल्या काळात अनु आणि अंकितने अनुच्या वडिलांना खूप मदत केली आणि सगळं नातं गोड
झालं, अंकित आता वेळ जसा मिळेल तसा अनुच्या बाबांनाही बिजनेस मध्ये मदत करायचा मग
त्याला नौकरी व्यतिरिक्त काही रक्कमही मिळायची आणि अनुचे बाबाही खूप खुष असायचे. त्याने
त्याच्या दिमाकाने तो सगळा बिजनेस ऑनलाई केला. मग खूप काही बघावं लागत नव्हत त्याला
प्रत्यक्ष उपस्थित राहून. अनुचे बाबा मासे गोदमात जमा करून घ्यायचे आणि पार्सर
रेडी ठेवायचे. अंकित तो सारा माल ऑनलाईन विकून रक्कम द्यायचा. अनुची आई मात्र जरा
मुलींसाठी काळजीने सतत मुलींना उपदेश देत असायची. अनुच्या लहान बहिणीच आलियाच तिच्या
वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि भरल्या घरात ती सतत रडत असायची.
स्वभावाने मृदु, आईसारखी, पण त्यानेच माती खाल्ली आणि आता सतत सगळं काही सहन करत असायची.
त्याच विचारात अनुची आई नेहमी असायची आणि मग तिला वाटत राहायचं कि तिच्या सतत ऐकून
घेतल्याने मुली अश्या झाल्या, मग तिने स्वतःला असं अचानक बदललं कि ती आता मुलींनी
काहीही सहन करू नये हाच विचार करत असायची.
अनुने गुणगुणत
अंकितच्या आवडता शेड ओठांवर लावला, स्वतःला आरश्यात आलटून पलटून बघितलं आणि सर सर
जिना उतरून ती खाली आली, तिला असा धापा टाकत उतरतांना बघून, राणी पटकन म्हणाली,
“वहिनी, अंकित नाही
आला रशिया वरून, तो इथूनच गेलाय ना सूनी काकी आणि भीमा काकाला घ्यायला. आहा...
न्यू शेड, मस्त आहे.”
अनुची स्पीड कमी
झाली, गळ्याला चीपकलेली ओढणी तिने नीट केली आणि त्याच ओढनीला हाताने गुंडाळत
म्हणाली,
“ताई, मी ना सूनी काकीला
बघण्यासाठी धावले हो, ऐकलं होतं ना, कि त्यांनी स्वतः ला भारी बदललंय म्हणून.”
“असं होय!, बऱ, जा
मग धाव आणखी.”
अनु स्मित हसली,
आणि दारातून गेटकडे निघाली, अंकित सामान डिक्कीतून उतरवत होता, अनुला बघताच त्याने
डोळा मारला. डोळ्यांनी आणि ओठांनी खाणाखुणा करत त्याने शेड जबरदस्त दिसतोय हेही
सांगितलं. अनु स्मित हसली आणि सूनी काकीकडे वळली. तिने काका आणि काकीचा आशीर्वाद
घेतला,
“काकी मस्त दिसत
आहात तुम्ही. तुम्ही तर एकदम बदलून गेलात.”
“सगळी आमच्या
सुनेची कृपा,यू नो शि इज सो लवली, तुला सांगू.”
तोच भीमा काका बॅग उचलत
म्हणले,
“अर्धांगिनी, घरात
व्हा आधी, मग सांगा... सूनेच कौतुक. मी तर बाबा जाम थकलोय.”
“अबे ये अरुण, चल जमव
बऱ मैफिल माळ्यावर, आपला स्टोक आलाय आता रशियावरून, या म्हणावं अमेरिकेच्या
जावयांना... आम्ही फुल आहोत आता.”
अरुण भीमाकाकाच्या
जवळ येत म्हणाला,
“अबे चूप बे! इथूनच
यैलान करू नको. नाहीतर ह्या बायका सगळा बेत पाडायच्या.”
सूनी काकी, आरती
आणि अनु घरात शिरत होत्या, तर सूनी काकी अनुला म्हणाली,
“अनु आपलीही पार्टी
जमव ग इकडे, सानूला पार्टी देववूया आपण...”
सगळ्याच हसत
हॉलमध्ये शिरल्या. घर परत हसायला लागलं. सदा काकाही आवाजाने घरी आले,
अरे भीमा, म्हणत ते
भीमा काकाला मिठी मारत म्हणाले,
“तू आलास हे ना आता
हे सगळ्या कॉलोनीला माहित झालंय, मला तर गल्लीतले मुल सांगायला आले होते. तसाच
आलो, माझ्या साठी काय आणलंस आणि आपला पोरगा कसा आहे रे, सुनबाई कशी आहे... आणि
तुझे ते फॉरेन नातू....”
“अरे जरा दम घे,
सगळे मजेत आहेत.” तोच सदाची नजर सूनीवर पडली,
“सूनी वहिनी ना?
काय हे! ओळखलंच नाही मी.”
“हुम्म, अबे! तिचं
आणि तिच्या सूनेच आहे ते काम, तू राहूदे, आज इकडेच थांब मी मोठे मोठे खांब आणलेत
तिकडून.”
भीमा काका त्याला
कोपऱ्यात नेत म्हणाला.
सगळी मैफिल आज परत
तीन महिन्यांनी भरली होती. अनुने परत चहा टाकला, अंकितने तिला परत मदत केली आणि
सगळ्यांनी चहा घेत सूनी काकी आणि काकांशी गप्पा केल्या.
घरातलं प्रत्येक
नातं आज भरभरून हसलं होतं. संध्या रात्रीकडे वळत होती आणि सानूची हुरहूर परत वाढत
होती. तिला राहून राहून बाबांची काळजी वाटत होती.
फोन वाजला तिने तो
घेतला, सुमंत एअरपोर्ट वरून बोलत होता,
“जानेमन बसं हा
निघालोच आता, उद्या सकाळी भारतात, आणि मग परवा लग्न, तू माझी बसं माझी.”
“अरे हो हो, दम तर
घे, आधी ये ना इकडे, मग जावू जरा तिकडे...”
“आहा... दिल फिरसे
झूम उठा...”
“तो इंतजार है हमे
आपका...”
“बसं हम पोहच रहे
है....दिल वाले दुल्हनिया लेने पोहच रहे है...”
“हो हो, या तुम्ही...हमने
भी मेहंदी सजाई है!”
“अरे व्हा... अरे
वरून, आता थेट तुम्ही... सुमंत रावांच प्रमोशन.... कबूल है! कबूल है हमे!”
“हो हो ये आता...
मी ना बसं तयार आहे...”
“खरच ना... नाहीतर
म्हणशील... माझे बाबा, कसे राहतील माझ्याशिवाय.”
“ये मस्करी पुरे,
खरच आहे ते.... तू काय बाबा, आईच कोकरू, पण मी माझ्या बाबांचा जीवं कि प्राण.”
“असं! अग फोन बंद
करावा लागेल फ्लाईट टेक ऑफ करते आहे. बाय उद्या सकाळी मीच उठवतो तुला.”
“मग अलाराम लावत
नाही मी... लव यू.”
सानूने फोन ठेवला,
सगळ कसं जरा वेळ थांबलं होतं पण परत विचारांच्या भवरयात ती शिरली आणि मग शिरत
गेली. क्षण तिला कठीण जात होते, तोच बाबाने खोलीच दार सारलं,
“सानू बाळा झोपली
नाहीस का ग?”
“बाबा, झोपतच होते, हे जरा नीबू पाणी मेहेंदीला
लावत होते.”
“आणि राणी ग कुठे आहे? खोलीत नाही का? ह्या
पाहुण्याच्या गडबडीत माझ्या राणीशी निवांत बोलायला मिळालंच नाही.”
“बाबा ती आताच
माळ्यावर गेली, राजन रावांचा फोन होता. अहो बाबा राणी रामिली आहे राज्यामध्ये, काही
काळजी नाही बाबा आहे तिच्याकडे.... तुम्ही काळजी करू नका! जावई अगदीच उत्तम
मिळालाय आपल्याला. मनाचा राजा आहे राजन.”
“असं, पण बोलावं
लागेल राणीशी, उगाच मुलीला तुटल्या सारखं वाटायला नको माझ्या.”
“बोला तुम्ही
निवांत.”
बाबांनी हुस्कारा
दिला आणि परत म्हणाले,
“आणि माझी लाडाची
सुनबाई...”
“हुम्म, बाळू....
घेवून गेलाय तिला काही वेळा आधी.”
“अरे... चला मुलगा
मात्र माझ्या पदचिन्हावर आहे, आपल्याला पण बाबा बायकोशिवाय खोलीत करमत नाही, तिची
बोलणी खाल्या शिवाय पचतच नाही. तिच्या समोर गुमान गप्प बसत तिला बड बड करतांना
बघितलं ना कि कसं घर घर वाटतं मला.”
“बाबा, आई ऐकलं हो!
चढली तर नाही ना तुम्हाला.”
“काय चढली बिडली
नाही, आम्ही काय जरा जरा टॉनिक म्हणून घेतली.”
“असं काय, सदा काका
गेलेत काय घरी.”
“तो आणि भीमा बसला
आहे खोलीत, इकडेच सांगितलंय मी सदाला झोपायला. आणि काय ग, काय भितो काय तुझ्या
त्या आईला, काहीपण हो तुमचंला.”
“बाबा!”
“ते जावू दे, माझा
जावई काय म्हणतो, निघालाय ना सुखरूप.”
“हे काय आताच बोलून
झालं, तुमच्या लाडाच्या मेहुणीला सोबत घेवून येत आहे.”
“ओ, म्हणजे
उद्यापासून ते अमेरीकेच भूत ओ माय गॉड घरात गोंधळ घालणार.”
“बाबा अति होतंय हो
आता, आईला माहित झालं ना तर वाट लावेल तुमची.”
“काय ग, नाहीतर
काय! काय नमुने आहेत माझ्या सासरचे, तो तिचा भाऊ, ढेरपोट्या, लावला त्याला तिकडे
कॅन्टीनवाल्या कडे कामाला. आणि तुझी ती मामी चुगल चोंबळी, काय काय महित रहिते
तिला, रेडीओ आहे ती सासरचा माझ्या. काल पासून घरात नुसत्या बैठकी पाहतो मी आणि ती
असते त्यात मुख्य.”
“बाबा, तुम्ही ना,
थांबा मी दार लावते.”
सानू धावत दाराकडे
गेली तोच राणीने दार परत सारलं, “तायडे, मी आहे. कशाला दार लावतेस.”
“अग तू, ये आत
मध्ये, आज बाबा ना पार वाट लावतील आपली, दार लावलं नाही तर.”
राणी हसत खोलीत
शिरली, “बाबा बरे आहात ना?
“हे, मला काय झालंय,
अग आज घराचं नुसतं सासर झालंय माझ्या. तुझ्या मामीने सर्वाना कसं बसं तिच्याकडे
ओढून ठेवलं आहे. आता भीमा काका आले तेव्हा घर कसं मला माझं वाटायला लागलं. जरा
माझ्या मुलींसोबत बसावं म्हटल म्हणून आलोय. कशी आहेस बाळा, जावई, सासूबाई सर्व नीट
ना?”
“हो बाबा सर्व उत्तम.”
“जावई भला माणूस
आहे ग, राजा आहे मनाचा, सगळं नीट होईल, सगळ्यांना ह्याच मार्गाने निघावं लागते.
तेव्हा कुठे घरात दबदबा बसतो. आता आई नाहीका, माझी आई म्हणजे आजी ग, तुझी आई कशी
थरथर कापायची तिच्यासमोर. पण कसं वेळ आणि शब्द जपून वापरले तिने आणि आज
मोहित्यांचा मान आहे तुझी आई.”
“बाबा आताच तुम्ही आईला बोलत होते.”
सानू राणीला खुणवत
म्हणाली.
“मी, माझी काय हिंमत तिच्या बद्दल काही
बोलायची. अर्र, आधी आईला घबरायचो आता बायकोला, आणि माझा मुलगा माझ्या पदचिन्हावर
आहे... आनंद आहे... मोहिते निवासात शांती
सदा राहील.... घरच्या लक्ष्मीसमोर कधीच मोठ्या आवाजाने बोलू नये बाबा, नाहीतर ती
कोपायची....”
“राणी आज काही खर
नाही बाबांच.”
सानू राणी हसत
होत्या. बाबांच्या मात्र डोळ्यात पाणी जमा झालं होतं. म्हणाले,
आज नकळत कही
दिवसांनी अरुण मुलींसोबत मोकळा झाला होता. हा योग येणे आता शक्य नाही हे सर्व जाणत
होते. कोण कुठे असं नेहमी जवळ येतं, आता तर नुसत्या आठवणी जपायच्या होत्या. मोहिते
निवासातून पक्षी भरारी घ्यायला तयार होते. आणि मन घट्ट पालकांना करायचं होतं.
0 Comments