जोडीदार तू माझा... भाग ५८

 

भाग ५८  


सानुने मात्र मुलाला नकार देण्याचं नक्की केलं होतं, सुमंत तिला हे करण्यासाठी म्हणत आहे हेच तिला जाणवत होतं. परत एकदा आपण घरच्या सर्वाना हिरमुसलेपणा स्वीकारणार ही जाणीव ह्या वेळी तिला सलत होती... पण वादळ ते वादळ ....उठलं होतं, मनाच्या सर्व बंधनांना तोडून..... नकार पक्का होता.

बाळू आणि मंडळी पोह्चीली आणि मागेच गाडीचा होर्न वाजला, मावशीला फोन आला, आणि ती ओरडली,

“ओ माय गॉड! पाहुणे आले वाटते.” ती आईला आणि काकीला इशारा करत पुढे निघाली.

घरासमोर दोन मर्सेडिज-बेंज  उभ्या होत्या, एकातून मुलाची आई उतरली, सोबत सामान घेवून कुणीतरी होतं. दुसऱ्या गाडीतून खुद्द सुमंत उतरला, त्याच्या मामा आणि मामिसोबत.

संपूर्ण परिसरात मर्सेडिज-बेंज  कधीच आल्या नव्हत्या, सर्व आजू बाजूचे बघायला लागले होते. सानूला बघायला खुद्द राजकुमार आलाय ही चर्चा पूर्ण वेटाळात पसरली होती. सदा काका तर बघतच राहिला , तोही सानूकडे निघाला, त्यालाही अंदाज होता की पाहुणे सानूसाठी आहेत. पोरगी अंगा खांद्यावर वाढली होती, राहावलं नाही त्यांना, मागच्या दारातून काही मदत लागते का म्हणून आत आले.

समोर स्वागत सुरु होतं, घरात प्रचड उत्साह होता, जणू राजकुमार सानूसाठी आलेला हाच भाव सर्वांना आनंदाने न्हावून टाकत होता.

पाहुणे आत येवून बसले, राजन त्याच्या सोबत बसला, घरचे आधीच त्या रुबाबाने भांबावले होते, शब्द तर फुटत नव्हतेच, मग सांभाळणार कोण. सर्व राजन रावांवर आणि अस्मित कुमारांवर आलं होतं. राजन रावं हसत म्हणाले,

“काय मग किती दिवस इकडे मुक्काम?”

सुमंत तसाही कमी बोलणारा, फक्त हसला, त्याची आई म्हणाली,

“आहोत अजून एक आठवडा, सर्व ठरवूनच जायचा विचार आहे. बघू कसं जमतं तर.”

अनु आणि राणी सानूकडे निघून गेल्या, आणि सर्व वर्णन करून सांगत होत्या तोच, सानूला आवाज ओळखीचा वाटला,

“काय नावं सांगितलं ग, त्या राजकुमाराच ?”

राणी आणि अनुने एकमेकींना डोळा मारला आणि राणी म्हणाली,

“तुला काय करायचं आहे, तुझा नकार पक्का आहे ना! मग जावदे ना... नावात आहे तरी काय...

सानू परत स्वतःची लिपस्टिक नीट करत म्हणाली,

“ह्हुम, नका सांगू, मीच विचरते, जा विचार आईला, माझा बुलावा कधी करणार म्हणून... आले परत मोठा लाजमा घेवून. अशी सुट्टी करते ना, सरळ नाही बोलते ह्यावेळी.”

 

तेवढ्यात बाळू नॉक करून खोलीत आला,

“आयला तायडे, दोन मर्सेडिज घेवून आला यार तो, मजा बाबा तायडे तुझी.

ये फुट शेंबड्या... माझ्या काही कवरेज क्षेत्रात नाही तो... दोन आणो की तीन ....लय बघितले अशे ....

असं का ग ताई, बघतो मी ....

म्हणत तो परत हॉलकडे निघाला, आणि आराध्या मावशी खोलीत आली,

सानू चल बाळा, मुलाशी भेटवून देते, मग काय ते तू ठरव, ओकेन ना?”

सानू उठली, तोच आई खोलीत आली, तिला बघताच परत हसली,

काय सानू, नशीब काढलस पोरी, राजकुमार खरच आलंय ग तुझ्यासाठी... म्हणन खर झालं तिझ्या बाबांचं ...चल..

सानुने कसं तरी तोंड आईला केलं आणि ती निघाली हॉलकडे, पाठमोऱ्या सुमंतला बघून सानू जरा दचकली, काहीसा तिला भास झाला, नंतर तिला मावशीने समोर केलं आणि ती आश्चर्याने दंग झाली, समोर सुमंत होता, तोही हसला, म्हणाला,

“काय आवडलाय ना मुलगा की नकार मलाही?”

सानू मावशीकडे बघून हसली, मावशी तिला म्हणाली,

“सानू इट्स युअर चोइस...राईट?  सो मेक इट युअर लाइफ....

नंतर बाबा काका, अस्मित अंकल सर्व स्मित हसत होते, सानू मात्र पहिल्यांदा लाजली, समोर सुमंतची आई बसली होती, म्हणाली,

“बाळा, ये बसं इथे, आम्हाला काहीही विचरायचं नाही आहे तुला, पसंत आहेस मला तू, तुझं नावं सांगताच सुमंतने होकार दिलाय, तुझा काय तो निर्णय तू सांग?”

सानू नावाचं वादळ आज विसावलं होतं, तिला कळत नव्हतं, सुमंत एक स्वप्न वाटत होता तिला, काहीच बोलली नाही, म्हणाली,

“सर, जरा बोलायचं होतं.”

आता मात्र सुमंत हसला,

सर!”

हो बाबा सर, बोलायचं का आपण?

हो बोलूया...

आईला सानूची ट्रिक्स माहित होती ती मधात म्हणाली,

“वरच्या माळयावर नको, पसारा आहे लग्नाचा, इकडे बाळूच्या खोलीच्या बाल्कनीत गेलात तरी चालेल, काय सानू !”

सानू हळूच म्हणाली, “आई तुला तर मी नंतर बघते....”आणि ती सुमंत सोबत बाळूच्या खोलीकडे निघाली.

बाल्कनीत रमणीय असा गारवा होता, समोरच असणाऱ्या आंब्याचे झाडं होतं आणि त्याची सावली बाल्कनीत पडत होती, त्यातून येणारं सूर्य किरण मनाला उजळत होतं. सानू जावून बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसणार होती पण थबकली, म्हणाली,

“तुम्हाला माहित होतं हे सार... हों ना?

सुमंत स्मित हसत म्हणाला,

“नाही मुळीच नाही, सकाळी आईने नावं सांगितलं, आणि मग मी तुझा तुझ्या मावशीने पाठवलेला फोटो बघितला... मग...

 “मग ?

“मग काय, वाटलं लग्न तर ह्या वर्षी मी केलं नाही तर आई काही मला स्वस्थ राहू देणार नव्हती, म्हटल, दुसऱ्या कुणाशी करण्यापेक्षा तुझ्याशी का नाही?”

"पण मी ...

का ..तू का नाही

मी गव्हाळ रंगांची आणि तुम्ही ....तुमची आई ....

“पण सुंदर आहेस! आणि जेवढ मी सकाळपासून तुझ्याबद्दल ऐकल आहे ते पुरेसं आहे, मी आपला शांती प्रिय माणूस मग कूणीतर हवंय ओरडणार, रागवणार.... वादळ!

आता मात्र सानू सुमंत कडे बघत लाजली, आणि हा वादळ शब्द कुणी....?

अमेरिकेपासून भारता पर्यंत आलोय, काहीही तुझी माहिती नसतांना...पण आज सकाळपासून तेच काम केलंय ....

“असं... म्हणजे ठरलंय सगळं नाही?”

“तसं समज....”

“असं! पण मी तुम्हाला आवडले...?

“न आवडायला काय ग? तुझं नाही माहित... तुला नकार द्यायचा असेल तर माझी काही हरकत नाही... पण मला काहीही हरकत नाही, माझ्या आईने आधीच संमती दिली आहे, आणि मी तुझं नावं ऐकताच ...आता निर्णय तुझा....

“मी नकार दिला तर ...?”

“तर काय... राहिलं तसाच, काय फोर्स नाही ना करू शकत, लग्न आहे... ऑफिसचा जॉब नाही, की तुझ्या कडून काम करूनच घेईल. मर्जी तुझी... तसही मला नकार खूप मिळालेत ....तुझा एक परत .....आता पस्तीस वर्षाचा झालोच आहे... अजून पाच वर्ष झाली की कोण लग्न करणार ....राहिलं की तसाच.... पण आता मुली बघायला जाणार नाही हे नक्की....”

नंतर नजर एकमेकांवर पडली आणि आणि सानू म्हणाली, “वादळ आहे मी, सामावून घेण्याची तयारी आहे....”

“तुझ्या सारखं वादळ सामावून घ्यायला मी आयुष्यभर तठस्थ उभा आहे....निर्णय तुझा तू आदळायला तयार आहेस.”

सानू काहीच बोलली नाही आणि राणीने आवाज दिला, तायडे सर्व प्लानिंग आजच करू नको, काही तरी नंतर साठी ठेवा.”

सुमंत ने सानुकडे बघून एक स्मित हास्य दिलं आणि खाली आला. सानू मात्र तिथेच बसून होती. तिला तर अजूनही सांर स्वप्न वाटत होतं,

“मी माझी ना राहिले

जेव्हा तुझ्या मनाने मला हाक दिली.

स्वप्नातल्या कळ्यांची आजच फुले झाली

साजना कशी सावरू स्वतःला आज माझी मी ना राहिले!”

Post a Comment

0 Comments