सानूच ऑफिस-
इकडे आज सानू आणि सुमंतची मिटिंग होती, दोघेही एकमेकांना
पहिल्यादा भेटणार होते. सानूच मन आणि डोकं एकमेकांशी भांडत होतं. मिटिंगची वेळ झाली आणि सुमंत मिटिंग रूममध्ये त्याच्या
रुबाबात शिरला, तसा सानूला धसका बसला, त्याचा तो फ्रेंच कट आणि गोरसा रंग, त्यावर
खाकी सूट.... अगदीच राजेशाही मिजाज होता सुमंतचा, आज ऑफिस मध्ये त्याची चर्चा
रंगणार होती हे सानूला पुरत कळालं होतं. त्याची ती बोलण्याची पद्धत आणि समोरच्याला
समजून घेण्याचा मोठेपणा त्याला विचारी भासवत होता. आणि सानू परत विचारात पडली... मनात
हसली,
“कधी कधी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरचाही नंबर लागतो...
पण इथे... ह्याला बघूनच वाटते, काही चान्स
नाही ...” मनात पुटपुटली पण
चेहऱ्यावर आलं होतं.
तशी सर्व इथल्या स्टाफशी सुमंतची पहिली भेट होती.
प्रत्येकाने आपली आपली ओळख करून दिलेली. सानूनेही तिची फोर्मल ओळख करून दिलीच आणि
सुमंतनेही फारसं लक्ष दिलं नाही. प्रोजेक्टवर बोलणं सुरु होतं, मध्ये ,मध्ये सानू
सुमंतकडे चोरून बघायची. आणि अचानक एका नजरेत एकमेकांची नजरा नजर झाली. तशी सानू
भानावर आली, स्मित हसली, सुमंतही जरा हसला, त्याचा नेकटाय उलटा होता हे मात्र
त्याला जाणवलं. कदाचित सानू ह्याच साठी हसत असावी हे त्याच्या लक्षात आलं. बोलता
बोलता त्याने नेकटाय काढला, त्याला परत बांधला. समोरच्याला जाणवू दिलं नाही की
त्याची सकाळी काही चुकी झाली होती, अगदीच चेहऱ्यावर कुठलेही भाव न आणता त्याने
त्याचा तो उलटा नेकटाय परत सीधा केला. आणि प्रोजेक्ट मध्ये मग्न झाला, त्याच ते
सर्व काही सानू बसून गुमान बघत होती. तिलाही काहीस भावलं, आपला नेकटाय उलटा आहे
आणि स्टाफ हसतोय हे कळूनही सुमंतने ती गोष्ट सहज हाताळली हे तिला त्याच्या परत जवळ
आणत होतं. मिटिंग संपली होती जवळपास सर्वच हॉलमधून निघून गेले होते. पण सानू गुमान
समोर बघत बसली होती, तोच समोरून आवाज आला,
“मिस सानवी, वी हॅव टू गो, डेमो देताय ना? तुम्ही देणार होता.”
सानू बावरली, हॉलमध्ये कुणीच नव्हत, फक्त सुमंत होता, आणि
तिच्याकडे बघून तो काहीही बोलला नाही फक्त स्मित हसला, तशी सानू पटकन म्हणाली,
“हो, लेट्स मुव, प्रोडक्शन डीपार्टमेंटला जावूया.”
“मिस सानवी कॉफी घेणार? तुम्ही अश्या गुमान बसल्या होत्या
मग मी मागवली ईफ यू डू नोट माइंड...”
सानू मनात म्हणाली,
“चायला, पाहिजेच होती मला, बऱ मन ओळखलं ह्याने, “
“हो चालेल ना.”
ती परत लॅपटॉप उघडून बसली. काही वेळात पिऊन कॉफी घेवून आला,
दोघांनी कॉफी घेतली. आणि निघाले प्रोडक्शनकडे, आज फायनल डेमो होता, श्वास रोखून
असल्या सारखी सानू दिवस भर सुमंत सोबत होती, तसाही तो अगदीच कामापुरता बोलणारा,
त्याच्या समोर पाणी पिण्यासाठीही तिला अवघड जात होतं, एका भन्नाट वादळाला अनाचक
काबूत करणार कुणी तरी भेटलं की काय हाच प्रश्न आच सानूला पडला होता, पण त्याच
उत्तर मात्र तिचं मन शोधायला तयार नव्हत. सुमंतची ही एकच भेट होती ऑफिसला नंतर तो
तीन दिवसात निघणार होता. शेवटी परत दोघेही कॅबीनमध्ये आले, सुमंतने तिचं खूप कौतुक
केलं आणि त्याला काही खाजगी काम उरकून लगेच निघायचं आहे हे ही त्याने सांगितलं.
सानू काही त्याच्या सोबत एवढी खुलली नाही, तिनेही हो ला हो आणि नाही ला नाही उत्तर
देत वेळ काढली, खरं तर मनाला आवर घातला.
प्रेम हे..... मन मारून गेले
प्रेम हे ....काही सांगून गेले
प्रियाला प्रीत कळेना कधी रे
मन हे आज सांगून गेले....
बावरून मन मी कूणास सांगू
उभा असशी तू मागे पुढे रे
सांगू कशी मी तुलाच तू रे
शब्द माझे मलाच बोलून गेले
प्रेम हे... मन मारून गेले ...
भेट तुझी माझी घडता सख्यारे
झाली स्वप्नातल्या कळ्यांची फुले रे
मावळता तो नभातला तारा परत कोमेजून मन गेले
प्रीत ही कशी दाखवू तुला रे
मन माझे मलाच थांबवून गेले
प्रेम हे.... मन मारून गेले ...
मिटिंग संपली होती आणि सानूने
सुमंतला सीऑफ दिला, उद्याची सुट्टी टाकली आणि घरी निघाली, उद्या तिला पाहुणे
बघायला येणार होते. घरी निघातंना तिने मोठा दीर्घ श्वास घेतला, स्वतःच्या मनातून
सुमंतला डिलिट करण्याचा प्रयत्न केला आणि निघाली. आज सुमंत मनातून आणि मेंदूतून
डिलिट होतं नव्हता, राहून राहून तिला तोच आठवत होता, रस्त्याने तिला सगळ्या ठिकाणी
तोच दिसत होता. ओटो थांबवला आणि ती बसली, वाऱ्याच्या वेगाने चालेल्या ओटोत जशी
एकटीच होती, चौकात ओटो थांबला आणि ती घरी एका वेगळ्याच धुंदीत शिरली, बाबा आणि
भीमाकांची साफ सुफ सुरु होती पण तिचं काहीच लक्ष नव्हतं. बाबांनी तिला आवाजही दिला
पण तोही तिने ऐकला नव्हता. हॉलमध्ये शिरतातच मावशी म्हणाली,
“सानू सुट्टी टाकली ना
उद्या? “
सानुने काहीही उत्तर दिल
नाही. ती खोलीत शिरली, मावशीने आणि सुनीता काकीने एकमेकींना इशारा करत आईकडे
बघितलं, बाबा आणि भीमा काका सानूला असं बघून बाहेरून घरात आले. आईने चहा हातात
घेतला आणि तिच्या खोलीकडे निघाली होती तर बाबांनी तो चहा हातात घेतला आणि सोनूच्या
खोलीच दार वाजवलं,
“सानू, बाळा आत येवू का?
चहा आणलाय ग.”
सानू निवांत येवून
पलंगावर पडली होती, तशीच म्हणाली,
“बाबा या, “
बाबा आता शिरत म्हणाले,
“काय ग, आज वादळ शांत शिरलं घरात, काय बिनसलं ग तुझं?”
“काही नाही बाबा, तो खडूस
आला होता आज.”
“कोण ग? “
“बाबा माझा तो अमेरिकेचा
बॉस, “
“मग तुला काही बोलला का ?
“नाही तेच तर तो काहीच
बोलत नाही... मीच का बोलायचं ? मी ही गप्प...आणि तो तर गुमान गप्प असतो.”
“सानू .....” बाबा हळूच
म्हणाले.
आता मात्र सानू भानावर
आली, धाडकन उठली, आणि म्हणाली,
“काही नाही हो बाबा, तो
काय मला बोलणार... आपलं काम चोखं... मिटिंग होती, केली आणि गेला.....उडत...शु शु
...अमेरिका...., आता मी उद्या पासून इथली बॉस!”
“बऱ, चहा घे... तयार हो,
आणि माझं एक काम कर ना?”
“काय हो बाबा... आणि हा
चाह थंडा झाला हो..”
“ठीक आहे आईला सांग गरम
करायला, ऐकना, अग ह्या ओ माय गॉड ने अस्मित कुमारची बॅग कुठे ठेवली सांग ग, सगळ्या माझ्या जुन्या मित्रांना सांगून झालं आहे, ते येतील आता, घर साफ करून
थकलो आम्ही आणि ही अजून देत नाही
आहे.”
सानू हसली, “बाबा!”
“कराना मदत…”
तोच मावशीचा आवाज आला,
“अहो जीजू बॅग दिली आहे मी. ओरडू नका ….. ओ माय गॉड काय करायचं ह्याचं.!”
बाबा सानूसोबत हॉलमध्ये आले, तोच दारात अनया आणि अंकित आले. अनया धावत
खोलीत गेली. सानूला तिचा जरा धक्का लागाल,
“अग, हळू अनु,” सानू
सावरत म्हणाली.
आणि अंकितकडे बघत
म्हणाली,
“काय रे बाळू? काही झालंय
का?”
बाळू हताश झाल्या सारखा
सोफ्यावर येवून बसला,
“काही नाही, अपेक्षित
होतं आम्हाला ते, तेव्हांच अनुने येवढ्या घाईत लग्नाचा निर्णय घेतला होता, मला आज
तिचा तो निर्णय योग्य होता ह्याची खात्री झाली.”
सानू बाबांना सोडून चहाचा
कप आईच्या हातात देत बाळूजवळ जावून बसली, आईने हळूच खोलीत ढुंकून बघितलं, अनु
ओक्साबोक्शी रडत होती, तिने बाळूकडे बघितलं, बाळूने इशारा करून आईला खोलीत जायला
थांबवलं आणि आई नुसती दारात उभी राहिली. दीर्घ श्वास घेत तो म्हणाला,
“आज पाठवणी होती अनुची
असा समजा, पण तिचं माहेर परत मिळवण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागतील, मी तिची
पसंत आहे आणि माझा तिच्या वरचा विश्वास कधीच कमी होवू द्यायचा नाही आहे. अर्थात
मला तुम्हा सर्वांची मदत हवी आहे. म्हणजे माझं आणि तिचं असं काही तुम्हा
सर्वांकडून खूप काही मागणं नाही. ती आमची दोघांची लढाई आहे, जे गमवलय ते परत
मिळवण्याची.....”
आणि त्याने सर्वांना हात
जोडले. अश्रू त्याच्याही डोळ्यात दाटले होते. पण त्याला ते वाहू द्यायचे नव्हते,
ते आधीच अनुच्या डोळ्यातून वाहत होते. घरात सांर थांबलं होतं. तोच बाबांचा फोन
वाजला, समोरून राणी बोलत होती, राणीची बाबांनी चौकशी केली आणि आईला सांगून फोन
स्पीकर वर टाकला, “आई, मी आणि राजन निघतोय आता, आम्ही इकडून सात पर्यंत पोहचू. आज
रात्र आणि उद्या दिवसभर तिकडे असेल मी.”
“आणि राजन रावं ग?
“तेही असतील, आम्ही
दोघही.”
“बर बाई, या, वाट बघत
आहेत सर्व.”
“आई मावशी, सुनीकाकी आहेत
ना ?
“अरे म्हणजे, आहेत की.”
“आणि माझा अस्मित अंकल,
आलाय का बँगलोर वरून.”
अस्मित अंकल बोलले, “अरे
चिमणे आहो इथेच, तुला भेटून निघेल मी पण.....तू कधी निघणार आहेस तिकडे... म्हणजे
ते तिकडे ग...”
“अंकल, ती सांगते मी
उद्या.... आई बाबा बाय!”
राणीच्या फोनने जरा
वातावरण बदलल होतं, समोर काय ते ठरलं होतं, राणी येणार होती, आणि सानूला बघायला
उद्या मुलगाही, येत्या रविवारी अंकित आणि अनयाच घरच्या घरी लग्न होतं.
अंकित उठला आणि अनयाकडे
गेला, अनयानेही बोलणं ऐकल होतं, सावरली होती,
“अनु हे डॉकूमेंट ठेव,
तुझ्या बुटिकच्या रजिस्टर प्रोसेससाठी ह्याची एक एक कॉपी बाजूला काढून सेट तयार
ठेव सकाळपर्यंत. आणि आवर सर्व, चाह ठेव परत सर्वांसाठी, तुझ्या हातचा.”
सानूही खोलीत आली,
“ये अनु, चल तो ट्रेन
सारखा चहा कर बघू, काय चव असते यार अगदीच तशी.”
“ये तायडे, काहीही म्हणू
नकोस, कला मस्त केलाय तिने, मला तर आईच्या हाताची चव आली होती...”
“असं ! मग तूही जा ना
जोडीला चाह करायला.”
“मग काय! लाजतो काय! अरे
तिच्या बापाच्या नाकाखालून पळवून इथवर आणली, आणि पुढही पळवेन शेवटापर्यंत.”
“चल ग अनु, अभी तो इज्जत
का सवाल है... असा झक्कास चहा करू की... अनुंकीत चहा म्हणून अख्या घरात फेमस झाला
पाहिजे, चायला नावं पण जुळलं, आपलं नावं
बघ कसं चाह पत्ती सारखं मिक्स झालं... व्हा, अनुंकीत चहा.”
“अरे, शेंबडा मोठा झाला,
शिंग फुटली बाबा... तुझं काय काय होणार आता तुझं तू आणि अनु बघा, आम्हाला चहा द्या
प्यायला... हवाय आता, जरा फ्रेश व्ह्यायला. निघा, करा पकडा पकडी... चायला घरात
सारा घोळ करून ठेवला ह्या दोघांनी... नाकात दम! काय ग आई?”
सानू ,अनु आणि अंकितला
चिडवत आईला म्हणाली.
“अग बाई, मला नका पाडू
तुमच्यात, मी आपली सासू बरी... कराल तुम्ही आणि येणारं माझ्यावर.” आई बाबा जवळ जावून बसली.
आता मात्र अनु हसली. आणि
ते तिघेही स्वयंपाक घरात गेले, तिघांनी मिळून आज स्वयंपाक घरी करायचा नाही हे
ठरवलं, अनु आणि सानूने मेनू ठरवला आणि अंकितने तो बाहेरून ओर्डेर केला. रात्रीच्या
चकण्याचीही सोय त्याने केली होती. सगळं ठरलं होतं. भीमा काका, बाबा आणि अस्मित
कुमार माळ्यावर तयारी करत होते. एकमेकांची
खेचा खेची सुरु होती.
राजन लग्नानंतर येणारं
होता मग उद्याच्या तयारीचा खास बेत करण्यात आई आणि महिला मंडळ लागलं होतं. आज
पहिल्यादा अंकित आणि अनु सोबत बाहेर निघाले होते, जेवण घेवून येण्यासाठी. सानू
आपला लॅपटॉप काढून बसली होती. तिलाही जरा
टेन्शन आलं होतं उद्या बघायला येणाऱ्या मुलाच पण सुमंतचा विचार निघत नव्हता आणि
पाहुणा मुलगा तिला नाकारायचा होता.
मन परत परत त्या वळणावर
येत होतं..
प्रेम हे..... मन मारून गेले
प्रेम हे ....काही सांगून गेले
प्रियाला प्रीत कळेना कधी रे
मन हे आज सांगून गेले....
घर मोकळा श्वास घेत परत
सज्ज झालं होतं उद्याच्या तयारीत .....
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments