जोडीदार तू माझा भाग ४२
बऱ्याच दिवसांनी दोन बहिणी बोलत होत्या, विषयांची कमी
नव्हतीच. आणि आराध्या मावशीने सानूसाठी स्थळ सुचवलं होतं ह्या एका बातमीने तर आईचा
बोलण्यातला ओघ काही केल्या थांबणार नव्हता. त्यात तिने अनुबद्द्ल आराध्याला
सांगितलं,
“हो ना, काय करावं, पण मुलगी शांत आहे ग, तिचा काही त्रास
नाही मीच जरा हेळसाळ करते तिला, मी तर काय करू अचानक समोर माझी सून म्हणून उभी
राहिली, मन मानतच नाही ना ग.”
“आणि जीजू ग? त्यांना काय पसंत आहे का हे सगळं? आपल्या
सॅन्डर्डची तर आहे ना... सो शॉकिंग टू मी ग. अग बाई बाळ्या
एवढा मोठा झाला.”
“ते काय बोलणार, मुलाने अगदी तोंड बंद केलंय, आम्ही काहीच
बोलू शकत नाही. आम्ही अजूनही शॉक मध्येच आहोत. मान्य
केल्याशिवाय पर्याय काय ग! तसंही त्याच्या पसंतीवर आमचं काही म्हणणं नाहीच पण
अचानक समोर आलं ना म्हणून जरा त्रास होतोय.
आणि सॅन्डर्ड म्हणशील तर आमच्यापेक्षा जरा जास्तच आहे, होलसेल मास्यांचा
बिजनेस आहे तिच्या वडिलांचा, इथेल्या कोळीवाड्यात राहतात ते. बऱ्यापैकी बिजनेस आहे
त्यांचा.”
“मग काय कोळ्याची मुलगी आहे काय ग.”
“नाही नाही, विदर्भातले आहेत हे पण इथे कोळ्यानकडून मासे
विकत घेवून मोठ्या बाजारात विकतात तिचे बाबा म्हणून कोळी वाड्यात राहतात, एवढचं
माहित झालं मला.”
“म्हणजे रग्गड पैसा असेल ग!”
“हो असेल ना, पण विचाराने मोठे नकोत.”
“म्हणजे ग...”
“म्हणजे काय, अजून मुलीची खबर घ्यायला कुणी आलं नाही.”
“ओ माय गॉड, अग नको ग काही बोलू
तिला.”
“माझा तसा स्वभाव तरी आहे का अरु...”
“हुम्म्म.... तूच बिचारी गरीब गाय.”
“तरी बऱ राजन रावांनी समजून घेतलं आणि गोष्ट अजून घरात
आहे.”
“ओ माय गॉड, म्हणेज राणीच्या
सासरी माहित झालं कि नाही?”
“काही माहित नाही बाई, जावई भला माणूस माझा, म्हणाले ते
बघून घेतील, मग आम्ही काही विषय काढला नाही कुणासमोर, अजूनतरी गोष्ट घरात आहे.
माझं आपलं मत ग, लग्नापर्यंत तरी गोष्ट घरात असावी, मग आम्हीच लग्न लावून देवू
दोघांच.”
“हो का? बघ बाबा... तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं… मग काय
करायचं, बोलू कि नको मुलाच्या आईशी.”
“बोल बोल, आपलं काम आहे प्रयत्न करणं.. बाकी काय आपल्या
सानूची मर्जी...”
“बऱ ताई, ठरवते मी आणि कळवते तुला. मी परवा निघणार इथून, मेसेज
करते निघतांना, आणि हो माझा महिन्या भराचा मुक्काम आहे, तुझ्याकडे राहिल आठवडाभर
नंतर सगळं ठरलं आहे कुठे जायचं आणि कुठे राहायचं म्हणून. त्यातच एक दिवस मी
सुमंतला घेवून येईल तुझ्याकडे.”
“जसं तुला जमेल तसं.”
“काळजी घे ग, आणि त्या मुलीला काही बोलू नको, प्रत्येकाची
लढाई सुरु असते ग, आपण उगाच बोलून कशाला वाईट व्हायचं, तिलाही कळत असणारं ना.
सुरवातीला थोडं जड जाईल तुला पण तू करशील ग, माहित आहे मला, तुझ्या सासूला तू नमवलंस,
मग ही तर मुलीसारखी ग तुला. आणि म्हणतेसही कि ती शांत आहे म्हणून, मग अजून काय
हवं, त्रास करून घेवू नको आणि देवू ही नको, जेवढ होईल तेवढ दुर्लक्ष कर... सध्या
घरात वाद नको, मन प्रसन्न ठेवा सारे, आणि मी येतेच आहे... सांभळू सगळं मिळून.”
“बघ माहेरचे ते माहेरचे ग बाई, ये तुझी वाट बघते मी.”
लहान बहिण लग्नासाठी येत आहे म्हटल्यावर आई जाम आनंदी होती.
कुणीतरी हक्काचं मनातल्या कुजबुजी सांगण्यासाठी येत होतं. मागच्या पंधरा
दिवसापासून घरात घडणाऱ्या गोष्टीमध्ये तिची बाजू सभळणार असं कुणी नव्हतं, अरुण
तिला समजदारीची बाजू समजवायचा पण मन मोकळं करायला आणी मनातला राग, त्रागा निघून मन
मोकळं करायला कुणी हवंच ना... मग आज ती गुण गुणत होती तर बाबा बाहेरून घरात आले,
“काय स्वारी आज आनंदी, काही खास!”
“तुमची लाडाची मेहुणी येत आहे,”
“काय! ओ माय गॉड येत आहे!”
“काय हो, उगाच चिडवणं ते...”
“मग काय, तिला येत काय! ओ माय गॉड शिवाय... येईल माझा खर्च
वाढवण्यासाठी. कधी? कधी उतरत आहेत सालीसाहेब? म्हटल जावं जरा पिकअप करायला.”
“असं, तिला बऱ पिकअप करायचं असतं तुम्हाला!”
“माझा साळभाऊ येत आहे ना... मस्त मैफिल जमवतो ह्या वेळी...”
“हो हो, येत आहे म्हणे पण दोन दिवस उशिरा... लग्नाच्या
दिवशी पहाटे पोहचणार आहे अस्मित बुवा.”
“जमलं जमलं मग, माझी मेहुणी किती वाजता येणारं आहे ते
सांग.”
“तीही पहाटे चारला पोहचेल मुंबईत, ती आणि लहान मुलगा येत
आहे, मुलगी येणारं नाही म्हणे तिची, तिचं काहीतरी प्रोजेक्टच काम आहे.”
“ओ माय गॉड, असं म्हणतेस. जाईल जाईल, तिला घ्यायला तर नक्की
जाईल. अरे, एकुलती एक लाडाची मेहुणी आहे माझी... तिला मी कळतो. नाहीतर तुझा तो
भाऊ, हेकड... कधी येतोय ग तो! इथल्या इथे ४० किलोमीटर तर राहतो, यायला नको,
लग्नाचं घर किती काम आहेत. माझी मेहुणी बघ अमेरिकेवरून येत आहे.”
“असं, कुठलं काम करता हो तुम्ही, सारंच तर कॉंट्रॅक्टमध्ये
दिलं आहे. आणि बाकी बाळू सांभाळतोय. माझ्याच भावाला बोलायचं असतं तुम्हाला. येतोय
उद्या, भाऊ आणि वहिनी दोघेही येत आहेत. तुम्हीच बघा तुमच्याकडले कधी टपकतात ते,
येतील आयते लग्नाच्या दिवशी आणि नाव ठेवून जातील.”
“ह्ह्म्म, असं होय... बघू आता.”
“बघाच मग, काय बाई ह्या माणसाच्या मागे लागली मी, काय
सांगायला आले होते आहे काय बोलत बसली, अहो इकडे या.”
“काय म्हणता, आता कुणाची काढायचं आहे तुला अजून....हो हो
मान्य केलंय मी माझ्या कडचे आहेतच तसे. पण माझी बहिण आहे ना... सर्व करणारी, अशी
हाक मारली कि हजर होते... थांब लावतो तिला फोन.”
“अहो चूप बसा, मी अंजलीला नाही बोलत आहे. जरा या हो इकडे.”
“असा म्हणता, आलो हायकमांड, घ्या उभा झालो समोर.”
“बसा.”
“बसलो.”
“अहो आराध्या सांगत होती सानूसाठी स्थळ आहे म्हणून, मुलगा
अमेरिकेत आहे आणि...”
“आणि काय, मी माझ्या सानूच्या मर्जीच्या बाहेर एकही गोष्ट
करणार नाही... मग तो अमेरिकेतला असो लंडनचा. तिने तिच्या आवडीने मागच्या गल्लीतला मुलगा जरी पुढे केला तरी माझा माझ्या मुलीच्या चॉइसवर
विश्वास आहे.”
“अहो तुमचं ना काहीही बोलणं सुरू असते, नाव काढलं एक आपलं
लेकीचा पाढा सुरू. माहित आहे मला, ऐका तर... तुम्ही ना... जावूदे... हे बघा, सानूला
बघायला मुलगा येणारं आहे. बसं एवढंच... बोला तिच्याशी...”
“ह्म्म्म... असं म्हणतेस. कधी येणारं आहे अमेरिकेतून
राजकुमार.”
“राजकुमारच आहे तो... बघा मला पक्क माहित आहे सानूला नक्की
पसंत पडेल मुलगा.”
“असं म्हणता राणीसरकार. बऱ...”
“अहो झालं तरी काय तुम्हाला... सकाळपासून तुम्हाला कुणी
भेटलं नाही का, हो हो म्हणायला, आज तूच्या त्या लाफ्टर मंडळात कुणीच नव्हतं वाटते,
जी तिकडली कसर घरी माझ्यावर काढत आहात. हो हो म्हणे!”
“अहो, ओ माय गॉड येते आहे मग असचं बोलावं लागणार आता.
नाहीतर ती काही मला गुमान बसू द्यायची नाही.”
“ते तुम्ही जाणा आणि तुमची मेहुणी... मला इथे सर्व बरोबर
हवंय, कळलं ना?”
“हो जी, हायकमांड, मी आपल्या आज्ञे बाहेर नाही... आणि मजल माझी.”
“काय सुरु आहे ह्या माणसाच माहित नाही... काय पीवून आले की
काय काही माहीत , वास तर येत नाही आहे. बोलण्यात काही पोईटचं नाही... सानूला सांगा
नक्की.”
“हो पण अवकाश आहे ना त्या गोष्टीला, नाहींतर येवूदे आमच्या
मेहुणीला, तिचं सांगेल... जमते तिचं सानू सोबत.”
“तेही ठीक आहे.. पण तुमचं ऐकते ना ती...”
“हो ह्या घरात माझी एकच तर मुलगी आहे जी माझं ऐकते... नाहीतर
इथे तुमची हुकुमत चालते... काय राणीसाहेब?”
“ह्हुम्म...काय झालं माहीत नाही ह्यांना ... काय हो काही
घेवून तर आले नाही ना तुम्ही,” आरती वास घाययाला तोंडाजवळ आली.
“ये काहीही काय ग, तू घरात येवू देशील का...?”
“ह्हमम... अहो जरा चांगलं वागा आता, सून आहे घरात...”
“म्हणजे? सून आली तर तू माझी बायको नाही का राहिली... कि
फक्त सासू झालीस?”
“अहो पण काही तर....”
“काही तर म्हणजे? अरे जोडीने सप्तपदी झाली आहे आपली.
जन्माची आणि हक्काची जोडीदार आहेस माझी तू.”
“बापा बापा .....वागा तुम्हाला हवं तसं...”
म्हणत आई लग्नाच्या सामानाच्या खोलीत शिरली, अहिराच सामान
नीट करत होती, अनु काही कामासाठी तिथे आली, जरा आईला बघून दचकली, आईही जरा दचकलीच,
दोघही हसल्या आणि आई स्वतःच बोलायला लागली,
“मी साड्या कुठे ठेवल्या, हा इथेच ठेवल्या होत्या. कुठे बऱ.
दिसतही नाही.”
अनु समोर येवून म्हणाली,
“ह्या आहेत का?”
“अरे हो, दे इकडे.”
आई खोलीतून निघणार होती तर थबकली,
“अनया लग्नाचं घर आहे, उद्यापासून पाहुणे यायला सुरुवात
होईल. जरा जपून, कुणीही काहींही विचरलं तर सांग तू सानूची मैत्रीण आहे ते, आम्ही
काही विचार करून ठेवला आहे तुझ्या आणि अंकितसाठी, तेव्हा एवढा आवर घाल. बाकी काही
अपेक्षा नाही ग आमची, लाख मोलाची इज्जत कमावली आहे, ती तुझ्या हातात आहे आता...
तुझे आई बाबा सावरतील कि नाही हे मी नाही सांगू शकत पण इथे परिस्थिती बिकट होईल,
राणीचं लग्न आहे आणि सानूसाठीही गोष्टी सूर आहे, तसंही अंकितच्या लग्नाचा आमचा
काही विचार नव्हता पण तुम्ही केलं, असो पण आता ती वेळ नाही जिथे तुझं स्वागत
होईल... असं नाही कि मी ते करणार नाही म्हणून... पण प्लीज समजून घे. मलाही माझ्या
सुनेची हौस करवून घ्यायची आहेच ना..? पण आता ह्या घरात मुलगी म्हणून राहा... बाकी
तू समजदार आहेसच, मोहित्यांची सून आहेस समजून घेशीलच.”
अनु गप्प उभी होती, सुचत नव्हतं तिला.
शेवटी आईने हात जोडले आणि अनुची चुप्पी तुटली,
“आई, समजते मी, माझ्या कडून काहीच हरकत नसणार आहे.”
आईने परत तिला बघत म्हणाली, “अंकित?”
“त्यालाही मी सांगते, तुम्ही काळजी करू नका.”
आई निघून गेली आणि अनु काय शोधायला आली होती तिचं तिलाही
आता आठवत नव्हतं... मनात गोंधळ उडाला होता, आई आज स्वतः बोलली होती पण....
हा पण ना नुसता... छळतो.... मीही जरा छळते.... भेटूया
पुढल्या भागात...
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments