जोडीदार तू माझा भाग 44
चार लोंकासमोर अक्षदा पडल्या आणि गळ्यात माळा घातल्या तरी
ते लग्न असतं असं नाही बऱ का? लग्न हा मनाने मनाचा केलेला स्वीकार असला तर मग काय
अक्षदा, कुठे त्या फुलांच्या माळा. आणि हीच तर लग्नाची व्याख्या आहे जिला कुठल्याच
दिखाव्यात मांडता येत नाही. मोठा देखावा करूनही लग्न, लग्न नसतं आणि लपून केलेलं
लग्न ही लग्न असतं.
लग्न आयुष्य तर नसतं पण आयुष्यचा टर्निंग पोइंट नक्कीच
असतं, आपल्या जोडीदारावर आपलं खूप काही निर्भर असतं. कदाचित म्हणूनच लग्न म्हत्वाच
असतं.
मोहिते निवास:
सकाळी सगळे चहा घेत हॉलमध्ये बसले होते, तोच सुनी, भीमा
काकाची बायको म्हणाली,
“अरे ही मेहंदी काढणारी इथेच थांबली होती का? आज तर नाही
मेहंदी... उद्या आहे ना काढायची?”
घरातल्या सर्वांची मन एकदम शांत झाली, काय बोलावं सुचेना
झालं होतं, भीमा काका आणि सुनीकाकीच्या अंगा खांद्यावर बाळू खेळून मोठा झाला होता
मग बाळूची गोष्ट त्यांच्या पासून कशी लपवावी हा प्रश्न सर्वाना पडला होता. पण
आरतीच्या शब्दांमध्ये बांधले होते सर्व.
तोच दारातून, छकुलीचा आवाज आला,
“सानू ताई, राणी ताई मी आली बरका लग्नाला.”
अंजली आत्या आणि छकुली दोघीही आल्या होत्या, त्यांना बघताच
भीमा काका म्हणाले, “अरे अमित येणारं नाही आहे का ग लग्नाला?”
अंजली जरा हळूच म्हणाली,
“माहित पण नाही मला ते कुठे आहेत ते, आठ दिवस झाले घरी नाही
आले... ”
नंतर परत काही वेळाने म्हणाली,
“ते ना बाहेर गेले आहेत... आले की येतील.”
“बऱ बऱ, तुझ्या भावना पोहोचल्या ग, ही एवढीच खंत आहे आमच्या
आयुष्यात, काय रे अरुण?”
अरुणचे तर तिच्या पहिल्या उत्तरा नंतरच डोळे भरून आले होते, डोळे पुसत म्हणाला,
“हो भीमा, माझी एकुलती एक बहिण, कुठे ती कॉलेजची बिनधास्त अंजू
आणि कुठे ही, नवऱ्याने केव्हांच सोडून दिलेलं उपरणं सांभाळत बसली आहे.”
सुनीने अंजलीला मिठी मारत म्हणाली,
“घरचं कुणी येणारं आहे का ग लग्नात?”
“वहिनी, सासूला बोलले मी, येणारं काय म्हणून पण त्यांनी
काहीच उत्तर दिलं नाही, आणि मी आले माझ्या छकुलीला घेवून, जावूद्या माझ्या बद्दल
काय बोलत आहात... झालं माझं सर्व... आता आहे ना ही माझी छकुली, काय हवं अजून...”
आणि मग अनुकडे वळत म्हणाली,
“अनु.... तू मेहंदी काढतेस म्हणे?”
अनुने जरा होकाराची मान हलवली. तर परत सुनीता म्हणाली,
“अंजू तू ओळखतेस हिला, कोण ग ही? काल पासून आहे.”
आता मात्र आरतीला धड धडायाल लागलं, सानू आईच्या जवळ गेली,
“आई भीमा काका आणि काकू काही वेगळे नाहीत ग, एकदाचं आपण
बाकी नात्यात सांगितलं नाही ना तरी चालेल पण भीमा काका... आणि काकी...”
आई पार सोफ्यावर बसली, घाम सुटला होता तिला, कासावीस झालं
होतं, पहिल्यांदा हा प्रश्न तिने अनुभवला होता आणि तिचं मन कासावीस झालं होतं
उत्तर देतांनी. सर्व आईकडे बघत होते. आई जो निर्णय घेईल कदाचित तो मान्य होता
घरच्यांना, अनुने पाणी आणुन दिलं आणि गुमान खोलीत जात होती, आरतीने पाणी घेतलं आणि
म्हणाली,
“सुनी ही आपल्या बाळूची बायको आहे. तू विचरते आहेस ना कोण
ही, सून आहे मोहित्यांची एकुलती एक.”
आणि मग रडायला लागली, सुनी आणि भीमा काका सुन्न झाले होते.
नंतर बाबांनी सर्व घडलेला प्रकार भीमा काकाला आणि काकूला सविस्तर सांगितला,
म्हणाले,
“तुला सांगायला काही हरकत नाही दोस्ता, सांभाळ आता
लग्नापर्यंत ही गोष्ट आणि हा आरतीचा निर्णय आहे.”
“वहिनीसाहेब, बसं एवढच ओळखता का हो मला!
अरे माझ्या बाळूची अर्धांगिनी आहे ती, तुम्ही म्हणता म्हणून गप्प बसतो लग्नापर्यंत,
पण एकदा हे रणीच लग्न झालं की माझ्या सुनेला रीतसर मान मिळाला पाहिजे... झालं आता, ती सून आहे आपली.”
भीमा काका भावूक झाले होते.
“बाळा अनु नावं ना तुझं?” भीमा काका अनुकडे बघत म्हणाले.
“अनया, नावं आहे माझं. पण अनु म्हणालात तरी माझी काही हरकत
नाही काका.”
“बऱ बऱ, काळजी नको, करूया सगळं नीट, आता आम्ही आलोय ना,
काही काळजी करू नको तू आणि तुम्हीही वहिनीसाहेब.”
“काय ग आरती! अजून कुणाला सांगितलं? म्हणजे आम्हाला माहित
असलेलं बऱ ना, आता लग्नाचं घर, गोष्टी होणार मग मला आणि ह्यांना माहित असलं तर
आम्ही सांभाळू ना. तुला ह्याची काळजी उगाच नको. लग्नाच घर तू दहा कामाची, दहा
तोंडांना मी आहे ना सांभाळायला.” सुनीता आरती जवळ येवून बसली.
सर्वच जणू आता हसले होते. आरतीने पाण्याचा ग्लास टेबलवर
ठेवत म्हटलं,
“आराध्या, अराध्याला सांगितलंय मी.”
“आणि सावंतांकडे?”
“राजन रावांना माहीत आहे, ते बोलले आम्हाला, ते सांभाळतील
म्हणून.”
“बऱ, काही काळजी नको, सगळं नीट होईल.”
“काय अनया? मग मेहंदी काढून देशील ना मलाही?”
“ये काकी थांब ग, तू आपली ती ठिपक्याची लावं, माझी बुक्किंग
आहे अनु वहिनीकडे.” राणी म्हणाली.
आणि सगळे हसायला लागले, अंकितने हळूच अनयाला नजरेने दिलासा
दिला.
घरानेही सर्वांसोबत सुटकेचा सुस्कारा सोडला आणि घर परत
आनंदाने हसायला लागलं.
--
पहाटेचे तीन वाजले आणि मोठ्याने अलराम वाजायला लागला,
आरतीने डोळे न उघडता चाचपळत मोबाईल हातात घेतला आणि अलाराम बंद केला, झोपेतच तिने
लाईट लावला, “अहो, उठा, तीन वाजले, तुम्हाला निघायचं आहे ना अरुला घ्यायला जायचं
आहे.”
अरुण उठला आणि चेहरा धुवायला निघून गेला, आरती उठली आणि
तिने चहा ठेवला, सगळे अजून झोपलेच होतेच, आता कुठे दोन वाजता सर्व मेहदी लावून
पडले होते. आरती हळूच चहा घेवून खोलीत आली, अरुणने सानूचा लॅपटॉप आधीच घेवून ठेवला
होता त्यांनी चहा घेत फ्लाईटच स्टेटस चेक केलं, फ्लाईट वेळेवर होती,
“आयला ही ओ माय गॉड ना नेहमी वेळेवर येते, जरा तासभर उशिरा लँड
झाली असती तर किती मस्त झालं असतं. जेव्हाही येते माझी झोप उडवते, कसा तो साउथवाला
हिला सांभाळतो काय माहित.”
घाईत अरुण निघाला, त्याच्या हालचालीने हॉलमध्ये नुकतेच
झोपलेले भीमा काकाही उठले, “अरे ये अरुण मीही येतो, आली का ओ माय गॉड?”
“अरे फ्लाइट वेळेवर लँड होणार आहे. आता तिला काही तिकडे एक तास लागेल. आपण निघायला हवं.”
भीमा काकाने आवाज दिला,
“वहिनीसाहेब चहा द्या मलाही. मीही सोबत निघतो अरुणच्या.”
भीमा काका बाथरूम मध्ये शिरले. तयार झाले, चहा घेतला आणि दोघेही विमातळाकडे निघाले होते. हळूहळू आवाजाने
सगळेच उठले. आणि चहा घेत हॉलमध्ये बसले. अंकित आणि अनुही अचानक जवळ जवळ बसले, आईची
नजर पडली आणि अनु उठली, अंकितने तिचा हात पकडला,
“अनु सगळे घरचेच आहेत, जरा बसं ग सोबत.”
अनु ने नजर चोरत सर्वांवर नजर टाकली, सर्वांनी ते बघितलं
होतं पण कुणीही बघितलं नाही हाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता. हळू हळू हॉल खाली
झाला आणि अंकित आणि अनु दोघेच तिथे होते. अनुने हळूच अंकिताला मेहंदी दाखवली आणि
त्यात लिहिलेलं त्याच नाव त्याला पटकन दिसलं. जरा वेळ मिळाला होता दोघांना, आता
घरात वर्दळ वाढणार होती, अनु आणि अंकितला दुरूनच एकमेकांना बघायचं होतं. आईची सक्त
ताकीद होती ती आणि दोघांनाही मान्य होतीच. अंकितने हळूच अनुच्या हातात हात दिला
आणि अनुचे डोळे पाणावले. अंकित तिला म्हणाला,
“अग तुझा लाचा झालाय असा फोन आला होता मला, आज आणेल मी.... मजा
बाबा तुझी.”
“हो, आहे माझी मजा, घरातल्या सर्वांनी स्वीकारायल रे.”
“अनु, अजून नाही, लग्न आहे, सर्वाना शांत राहणं गरजेच आहे
म्हणून... सर्व थांबलाय... तू तुझे प्रयत्न सोडू नकोस, आईला सांभाळ बऱ का?”
“अंकित माझ्या आईची आठवण येते रे, बोलयचं का आपण तिच्याशी.”
“नको ग आता, जरा धीर धर, आता इकडे नाती जुळत आहेत तर थांब
ना, तिकडेही जुळतील... आताच आगीतून निघालोय अजून जळायचं नाही ग. उगाच आपण चांगला
विचार करायचो आणि काहीतरी भलतं व्हायचं.”
अनुने मोठा सुस्कारा दिला,
“ठीक आहे, मन शांत आणि वेळेची वाट बघण्याशिवाय काय रे हातात
आपल्या.”
“ये, हताश नको ना होवू, तू आलियाशी बोल, तिला लग्नाला
बोलावं. बहिण आहे तुझी येईल ग... आणि तुझंही मन मोकळं होईल.”
“फोन देतोस का जरा...”
अंकितने फोन दिला आणि म्हणाला,
“अरे तुझ्यासाठी फोन पण घायचा होता मला, आज आणतो मी
आठवणीने.”
अनुने अलीयाला फोन केला आणि लग्नाचं आमंत्रण दिलं. सांगितलं
सांग म्हणून घरी कि एका मैत्रिणीच लग्न आहे ते. आलिया जरा चतुर स्वभावाची मग ती
जमवेल काहीतरी जुगाड हे अनुला माहित होतं. मग स्वारी मनातून खुश झाली होती, हलकीशी
छटा तिच्या चेहऱ्यावर आली होती, सासरच्या वस्तीत आपलं कुणीतरी सोबतीला येणारं होतं
तिचं.
© उर्मिला
देवेन
urmiladev@gmail.com
कथा
वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या
प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही
चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर
प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा
पुढचा भाग लवकरच.
स्टे
कनेक्ट, स्टे सेफ...
कथा
क्रमशः
© उर्मिला
देवेन
urmiladev@gmail.com
कथा
वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या
प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही
चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर
प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा
पुढचा भाग लवकरच.
स्टे
कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments