जोडीदार तू माझा... भाग २५

 जोडीदार तू माझा...  भाग २५



दिवस धावत होते आणि रात्र एकमेकांना ओलांडत होत्या. महिना संपायला आला होता. सानू राजन प्रेमात होते. अंकित त्याच्या तिच्यात गुंग होता. आई बाबा आयुष्याचे जोडीदार म्हणून सोबत होते. आता बघूया आजच्या भागात ...

सानू पहाटे उठून नेहमीप्रमाणे उगवत्या सूर्याला बघत होती. विचारात तिला लक्षात आलं, आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस उद्याच आहे. मनात म्हणाली,

 “अरे आपण आल्याच दुनियेत मस्त असतो, आईं बाबांच्या नात्याला उद्या पस्तीस वर्ष पूर्ण होतील... हे आहेत खरे जोडीदार! तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून जमेना.... माझे आई बाबा. “

सानू आनंदाने खोलीतून बाहेर आली आणि बाळूच्या खोलीकडे निघाली, निघतांना तिने सानूला आवाज दिला,

“राणी बाळूच्या खोलीत ये लवकर. बोलायचं आहे.”

राणीही लगेच निघाली, बाळू खोलीत त्याच्या तिच्याशी बोलत होता,

“ये शेंबड्या, नंतर बोल, सांग तिला माझी ताई आलीय म्हणून. जेव्हा तेव्हा बोलत असतो, आजूबाजूला बघ काय सुरू आहे. काही दिवस काळ माहीत असतो का तुला.”

“ताई, शेंबड्या! अजूनही! का ग? मी बोलत आहे ना, जरा थांब ना ग, कशी ग तू....”

घे थांबली, पण तू माझ्या साठी शेंबडाच, काय झालं म्हणाले तर, तुझी ती आम्हाला माहित नसलेली काही बोलली का.....”

सानू आता फोन जवळ जावून ओरडली, अग ये, कधी तरी फोनच्या बाहेर ये, भेट....”

तसा बाळूने फोनवर हात ठेवला होता, सानू हसली, आणि परत जरा शांत होत म्हणाली,

“म्हणजे तुला हरकत नसेल तर बाबा... तुझा शेंबूड माझ्या फ्रॉकने पुसला आहे मी. म्हणून.....”

“तायडे... गप ना ग. मोठा झालोय मी आता.”

अंकितने फोन ठेवला, राणीही खोलीत शिरली.

सानू “मी काय म्हणत होते, अरे आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या, आहेस कुठे!”

“अरे हो, काय मग काय प्लॅन? मी केक बुक करतो.”

“हो तू ते कर, मी उद्या आई बाबांना बाहेर पाठवण्याचा प्लॅन करते, आणि घर सजवते.”, राणी उत्साहात म्हणाली.

“सानू दी, तू ना सुट्टी घे.” अंकित ब्रश करत म्हणाला.

“हो, तसं आईला आठवण असते, तिचं काही ना काही असेल प्लॅन, पण असो, आपण संध्याकाळी प्लॅन करू. आता राणीचं लग्न जुळलं, तुझंही सुरु आहे हे स्कुटी प्रकरण, कधी घरात तिला घेवून येशील काय माहित बाबा... आपल्याला असा योग कुठे मिळले रे... जमवुया आठवणी आयुष्यभराच्या. पुढे आपल्या आपल्या जोडीदारासोबत रमलो कि कुठे अशी संधी येयील...”

“हो ग ताई, करूया आपण आई बाबांसाठी”, राणी जवळ येत म्हणाली.

“मग ठरलं तर, उद्या करूया... फक्त आपल्यामध्ये. आपण पाच फक्त. एक सूरेख संध्या आपल्या सर्वांची.... सगळ्या काळजीतून दूर... “

“हो ताई मी ऑफिसला निघतो, केक मी ऑर्डर करतो. तुम्ही दोघे बाकीच बघा.”

तिघांनी काम वाटून घेतली. आणि आपल्या आपल्या कामाला निघाले.

दुसऱ्या सकाळी, आई आणि बाबा पहाटेच उठले होते. आईने तोच नेहमीचा आल्याचा चहा केला आणि बाबांना देत म्हणाली,

“अहो आठवतं का? लग्नानंतरची ती पहिली पहाट, तुम्ही चहा करून आणला होता माझ्यासाठी आणि आपण असेच बसून पीत होतो.”

“हो ग, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राणीसरकार! आपलं गुलाम होवून मला आज ३५ वर्ष पूर्ण होतील.“

“असं! तुम्हाला सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! मलाही ह्या सुरेख कैदेत पस्तीस वर्ष पूर्ण होतील हो...”

“कैद?”

“नाही तर काय!”

“राणीसरकार तुम्ही होता म्हणून हा एवढा प्रवास गाठलाय आम्ही, तुम्ही आहात म्हणू आम्ही आहोत. आम्ही आजही तेवढच प्रेम करतो.”

“म्हणून कैद म्हणाले ना... तुमच्या प्रेमाची कैद हो... मला कुठे कुणी आहे तुमच्याशिवाय... माहेर तर कधीच विसरले... आता तुम्हीच माझं माहेर हक्काचं, मनात साठलेलं सारं सारं बोलून मोकळी झाले कि नव्याने हा संसाराचा गाडा जोडीने ओढायला तयार होते.”

“माझंही तसचं ना राणीसरकार... मला कुठे कोण आहे आता... तुचं माझी आई झालीस ग, माझं करता करता. खरच आहे बघ, स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंत काळाची माता असते बघ, किती काळजी घेतेस माझी. माझी आई मरून देव झाली, बोलली होती, आता आरती तुझी आईसारखी काळजी घेईल म्हणून. प्रत्येक पुरुषामागे कायम एक स्त्री असते बघ, आयुष्याच्या वळणावळणावर, कधी आई, कधी बहिण, आणि मग अनंत काळासाठी पत्नी, जोडीदार म्हणून.”  

आई बाबांच्या मिठीत शिरली, बाबा हळवे झाले होते,

“अरु..”

“अहो किती दिवसाने बोललास असं... हल्ली विसरलात हो.”

“विसरलो नाही ग, बस जरा ना आपल्या मुलांची काळजी आहे. बघ ना, पिल मोठी झालीत ग, आता आपणच आपल्याला, उडतील लवकरच मग आपण दोघेच एकमेकांचे जोडीदार…”

“अहो, मी काय म्हणते, तुम्ही आणि मी... आपण संध्याकाळी देवळात जावून येवू.”

“हो, राणीसरकार आपण म्हणाल तसं.”

नंतर बराच वेळ आई बाबा गप्प करत होते. सानू ऑफिससाठी निघून गेली मग अंकितही निघाला, राणी आई बाबांच्या खोलीत डोकावत म्हणाली,

“आई आज देवळात भजन आहे ग चार वाजेपासून, जाणार आहात का तुम्ही? त्या समोरच्या काकू विचारात आहेत.”

“हो हो जावू आम्ही, म्हणजे आम्ही जाणारच होतो. “

“बऱ, मी बाहेर जात आहे, जरा मैत्रिणीकडे काम आहे ग. उशीर होईल मला.”

राणीही घरातून डेकोरेशनच सामान आणायला निघून गेली.

आई बाबांनी तो दिवस सोबत मजेत घालवला, बाबांनी आईशी गजरा आणला, तिला आज तयार

होण्यास मदत केली,

आण ती पिन मी टाचून देतो.”

“अहो राहू द्या मी टाचते.”

“राहू द्या काय, येतं मला.”

“अहो, तो गजरा माळा बऱ.”

“अरे, मग तू तर आपली जीगरा आहेस, किती सुंदर दिसतोय हा गजरा तुला. अग, नथ घाल ना आज, आईने दिलेली, खूप रुबाबदार दिसतेस तू.

आईने कपाटातून काढून नथ नाकात घातली, तिथे ठेवलेल्या पाटल्याही हातात घातल्या. बाबांच्या हट्टानुसार राणीहारही तिने गळ्यात घतला.

“आहा आहा ... काय सुंदर दिसतेस ग तू अजूनही, राणीसरकार आम्ही तर अजूनही गुलाम आहोत आपले... “

“पुरे हो कौतुक, आपण म्हातारे झालोत आता, भान ठेवा.”

“म्हातारे? कोण? मी तर अजूनही तरुण आहे.”

“असं! त्या औषधी घ्या आधी, विसरलेत तुम्ही, निघायचं आहे, आणि काय हो हे काय घातलंय तुम्ही, मी काढून ठेवलेंला सदरा घाला ना...”

“बऱ, घालतो, नाळा नाही ग त्यात.”

“अरे विसरील मी, हे बघा असं होतं माझं हल्ली, आणि तुम्ही म्हणता आपण अजून तरुण आहोत.”

आई बाबा ऐकमेकांच्या आवडीने तयार झाले. आज त्यांनी मुलांची काळजी जरा वेळ बाजूला ठेवली होती. हातात हात घेत दोघही देवळात निघाले.

इकडे राणी समोरच्या बागेतून आई बाबा बाहेर जाण्याची वाट बघत होती. ते निघताच ती घरात शिरली, घर अगदीच सजवलं. बाळूंही घरी आला होता. त्यानेही मदत केली. नंतर सानू सर्व सामान घेवून आली, आई बाबासाठी तिने नवीन कपडे आणले होते. सर्वांनी मिळून सगळं कसं नेटनेटकं लावलं होतं.

सहा वाजत आले होते आणि आई बाबा येण्याची वेळ झाली होती, ऐव्हाना, आईचे कितीतरी कॉल येवून गेले असते पण आज आई बाबा स्वतःच्या नादात होते, जरा विसावा म्हणून रमले होते एकमेकात.

बाबांच्या स्कुटीचा आवाज आला,

“राणी, आई बाबा आलेत ग.” म्हणत सानू आणि अंकित लपले.

बाबांनी घराचं दार उघडलं, दोघेही दारात उभे होते आणि फुलांचा वर्षाव झाला, समोर आले तर लाईटिंग सुरु झाली, आता मात्र आई म्हणाली, सानू घरात आहेस का बाळा, बाळू राणी कुठे आहात तुम्ही.

तिघेही बाहेर आले आणि आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या. सानु राणी आईला खोलीत घेवून गेल्या. बाळू बाबांना घेवून गेला.

सानुने आईचा सुंदर मेकअप करून दिला, नवीन साडी आणि तिचे पारंपारिक सर्व दागिने घालून दिले. आई जणू नवरी दिसत होती.

इकडे बाळूनेही बाबांना अगदीच तयार केलेलं.

हॉल मध्ये झोपाळा सजलेला होता, मुलांनी दोघांना तिथे बसवलं, आई बाबांना रिंग्स ऐकमेकांना बोटात घालायला लावल्या, खूप सारे फोटो घेतले. केक कापला, खूप सरी मस्ती केली. जेवणं बाहेरून बोलावलं होतं, आईच्या आवडीच्या धाब्यावरच. मजेत वेळ गेला.

आई बाबांना बघत होती तर कधी बाबा आईला,  त्या भिरभिरणाऱ्या नजरेतलं ऐकमेकांवरच त्याचं प्रेम आनंद बरसवत होतं.  मन संवाद घालत मुलांना बघत होती, आणि हळूच बोलत होती 

मी तुझी तू माझा,

जोडीदार तू माझा...

आणि हा सोहळा घर आठवणीच्या कप्यात साठवण म्हणून ठेवत होतं. मुलांनी दिलेलं हे अनोखं सरप्राईज आई बाबांना खूप सारां आनंद देवून गेलं होतं. पक्के जोडीदार ते होतेच आणि आज त्यांच्या पालकत्वाला मान मिळाला होता.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments