जोडीदार तू माझा... भाग १५

 जोडीदार तू माझा...  भाग १५ 

राजन घरातून निघून गेला आणि बाबा आईच्या नजीक आले,



“रंजू, मुलगा मोठा झालंय आपला, त्याचा जोडीदार त्याला निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याला, आपण काहीच बोलू शकत नाही.”

“हो ना, पण तो जे बोलला ते लागलं हो मनाला,” रंजना उतरत्या स्वरात म्हणली.

परत म्हणाली, “आपण विचार केला होता, सर्व गुणसंपन्न मुलगी राजनसाठी शोधण्याचा, शोधलीही पण बघा ना... मुलांना घरण्याची परंपरा कायम ठेवली... मलाही तुम्ही उभं केलंच ना, मी माझ्या सासूच्या हाताखाली खूप शिकले. आता मलाही हेच सांर करावं लागेल अजून.”

“अग मग भारी मौज असते कि त्यात. आईचा दरारा होता घरात, म्हणजे आजही आहे. पण ती खूपच थकली आता. तुझंच ऐकते. तिला सांग कशी खुश होईल बघ, राजनसाठी, आनंद आहे आपल्याला. राणी गोरीपान आहे ग, सुंदर आहे पोरगी, तशी राणी शोभते आपल्या राज्याला, नाहीका?”

“आता काय मुलाला पसंत म्हटल्यावर कुठली मेनका काय कामाची आपल्या. पण वाईट वाटलं हो! काही दिवस जड जाईल मला. सानूसाठी मन कसं तयार होतं”

“हो ग, पण आता पर्याय काय? राजनला राणी आवडली ना?”

“मन मनात नाही अजून काय.”

“मनही मानेल आणि सर्वच होईल, तुम्ही आधी सावरा स्वतःला, आज शाळा नाही का? निघायचं नाही आपल्याला.”

“राहूद्या आज सुट्टी टाकते, तुम्ही पण थांबा ना घरी.”

“अग माझी महत्वाची मिटिंग आहे, असं काय करतेस. बऱ मी लवकर येतो आज. आपण बाहेर जावूया मग.”

“चालेल, तुम्ही आहात म्हणून सांर कसं बरोबर होतं हो, मी आपली जरा लवकर रागात येते.”

“पण रागात आलीस कि भारी दिसतेस ग तू. आणि काय काय नाही करत तू. शाळा, हा वाडा आणि आपली सामजिक कार्यशाळा सारं काही सांभाळतेस. मी आपला नामधारी आहे.”

“जावूद्या हो, तुम्ही माझे जोडीदार आहात ना म्हणून मी सगळं करू शकली हे त्रिवार सत्य आहे.”

“बऱ उशीर होतोय मला, राजनशी आपण निवांत बोलूया, कुठलीच घाई नको. मी करतो तुला कॉल, तयार राहा... जावूया बाहेर आज.”

राजन आणि राणीसाठी आता सर्व जमवाजमव होतं होतीच ना... अरे दोन मनांच्या मनात असलं तर समोरच्याला मानावच लागतं.... नाही का!

सानू सगळं विसरून परत तिच्या कामात मग्न झाली होती. राजन आणि राणीसाठी आता सर्व जमवाजमव होतं होतीच, आणि प्रेम वीर प्रेमात मग्न होते. आज राणी राजनला भेटायला जाणार होती. आता बघूया पुढचा भाग...

सानू घाईतच ऑफिसला पोहचली, आज सानूची फॉरेन कलाईन्ट सोबत मिटिंग होती. ती फाईनल टच म्हणून तिचं प्रेझेनटेशन बघत तयारी करत होती तोच टीम वर मॅसेज आला,

“हॅलो, सुमंत हियर, मॅनेजर ऑफ यूएसए ब्रांच, शाल वी स्टार्ट, मिस्टर, मोहित इज ऑन अर्जंट लीव. सो आय एम  इनिशिएटिंग धिस मीटिंग.”

सानूने सर्वात आधी त्याच्या प्रोफाईल पिक्चरला क्लिक केलं आणि मग त्याला हाय टाकला..

समोरून नंतर बऱ्याच वेळेपर्यंत उत्तर आलं नाही. सानू वाट बघत राहिली, पण काहीच उत्तर आलं नाही, मनातून राग येत होता तिला, परत हाय टाकला, तरीही उत्तर आलचं नाही. मनात वाट होतं, मिटिंगला बोलतो आणि समोरचा उत्तर देतच नाही, पुटपुटली,

“हाऊ केअरलेस समवन, कसे यूएसए ब्रांचचे मॅनेजरम वगैरे होतात कोण जाने, आपली लोकं ना कामच करत नाही, पगार मात्र पाहिजे असतो आणि मग म्हणतात प्रगती होतं नाही म्हणून...”

नंतर सहज तिने सुमंतचा प्रोफाईल फोटो परत क्लिक केला, अर्धा तास ती सुमंतच्या प्रोफाईल फोटोला झूम करून बघत होती, टेबलवरच पेपरवेट हाताने हलवत होती आणि मनात विचारांशी खेळत होती. रंगीबेरंगी विचारांची होळी सुरु होती तिच्या मनात. मनात आज नकळत गुलाबी रंगांची उधळण होतं होती. रंगाने भिजलेल्या मनाला अलगत प्रेमाच्या वाऱ्याची चाहूल लागावी आणि हुरहुरी वाढावी अशी शहारात होती. त्या वाऱ्याने मनातले विचार सैरावैरे उडत होते आणि समोरून तिला मॅसेज  आला,

"व्हेर आर यू मिस सानवी? वी आर वेटिंग, प्लीज जॉईन द मिटिंग, वी ऑल आर वेटिंग फॉर यु ओन्ली, क्लीक थिस लिंक नॉव."

धाडकन पेपर वेट मनातल्या सैरावैर विचारांवर पडलं. ती त्या मनातल्या भिजलेल्या रंगाने ओलीचिंब बाहेर आली. क्षणभर तिला सुचलच नाही, मनातच पुटपुटली,

“काय हा, मी इकडे वाट बघते आहे मिटिंगची आणि... ”

मनातल्या मनात तिने त्याला जाम शब्दाने ठोकलं,

“चायला, यूएसएवाला, भलताच दिसतोय बाबा.”

जरा गप्प झाली मग परत म्हणाली,

“अरे यार, त्याला काय बोलते, मी इथे टीम मॅसेंजरवर त्याच्या मॅसेजची वाट बघते आहे आणि मिटिंगच तर आमंत्रण मेलला होतंच, मीच लिंक क्लिक केली नाही, इथे काय चाटवर मीटिंग होणार होती! आपणच गुंतलो होता यार, असं कसं झालंय आज माझ्या हातून, वेंधळी तर नाहीच मी, ह्या ह्या फोटोने भुरळ पडली मला. ओह नो, आय मेड मिस्टेक, लेट मी जॉईन फर्स्ट. लेट मी इन यार."

तिने लगभगिने लिंक जॉईन केली, सारेच तिच्या साठी थांबून होते. जॉइन  होताच म्हणाली,

"सो... सॉरी... लेट मी शेयर माय स्क्रीन, प्लीज लेट मी नो व्हेन इट बी विजिबल टु ऑल.”

 सुमंत, "नो वरी, वी डू हॅव सफीश्यंट टाइम, प्लीज गो अहेड.”

आता स्क्रीनवर सानवीची स्क्रीन होती. तिचा पॉइंटेर अडकला होता. ती प्रयत्न करत होती तर सुमंत म्हणाला,

“मिस सानवी आपण प्रेझेंट करा, लेट इट बी, वी आर वेटिंग टु हियर यू.”

“  एक्सट्रेमली सॉरी, आय वॉज...”  

“ आय उंडरस्टूडं, वी  स्टील  हॅव टाइम. प्लिज गो अहेड.”

सानूने तिचं प्रेझेनटेशन दिलं, मुद्दा नी मुद्दा तिने समोरच्याला अगदीच पटावा असा मांडला होता पण लक्ष तिचं सुमंतच्या प्रत्येक हुंकाराकडे होतं.  प्रेझेनटेशन संपल, पण अजूनही ती त्याच विचारात होती कि तिच्यामुळे सगळे वाट बघत होते. मनातच मन मनाशी बोलत होतं,

“मी त्याच्या जागी असते तर माझा अर्धा तास वाया घालवला म्हणून मिटिंग कॅन्सल करून वरच्या लेव्हेलला रिपोर्ट केली असती.”

सुमंतने तसं काहीच केलं नव्हतं त्याने स्वतः परत तिला मॅसेंजर पिंग करून जॉईन व्हायला सांगितलं होतं. मनातच चुकली होती ती. नंतर मिटिंग मध्ये कोण काय बोललं ह्यावर तिचं काहीच लक्ष नव्हतं, मीटिंग संपली तरी सानू मात्र तिच्या त्या विचारातून बाहेर नव्हती. तिच्या मनातच ती परत शिरली होती, आपली चूक कशी झाली हे तिला कळत नव्हतं. आणि सुमंतचा प्रतेक गोष्टीतला सपोर्ट तिला आठवत होता. दुपारभर विचारात होती तर राणीचा फोन आला,

“ताईडे, आज मला राजनला भेटायला जायचं आहे, तू घरी परत येतांना मला पिक अप कर ना. ”

“आहा, स्वारी भेटायला जाते आहे...  मजा बुवा...”

कसली मजा ग, इथे माझं अंग अंग शहारत आहे....”

“हुम्म्म बाबा, पहिला पहिला प्यार है!... आणि काय ग त्यालाच सांग ना घरी सोडायला. मी कशाला हवी ग मध्ये आता, कबाब मे हड्डी, यू गो अहेड डियर.”  

“तायडे, काहीही पण ग तुझं, असं बिसं काही नाही, आणि आई म्हणाली, अजून लग्न काही जुडलं नाही तर घरापर्यंत नको, चार लोकं उगाच विषय वाढवतील, आणि काहीही बोंब करतील. नकोच बाबा, मलाही पटलं.”

“अरे यार, ही आई पण ना! हिला त्या चार लोकांचीच जास्त फिकर असते, मला ते कधी भेटले ना तर चांगली सुनवते त्यांना. आणि तू ही आई सारखी, काहीही हो तुमचं वाली.. तू म्हण ग राजनला.”

“अग मी बोलले, तर म्हणाला, आईचही बरोबर आहे आणि त्याने तुझा पर्याय सुचवला, आईनेही संमती दिली मग. तिला सांगू का तुला फोन करायला.”

“तिला, नको नको... मलाही त्या चार लोकांची भीती दाखवेल ते, माझी मावली लय गोड आहे. अरे पण, मला नका ना फसवू... बिझी आहे ग मी आज...”

“तायडे, मी तुला ऑफिस नंतर म्हणते आहे, आता नाही.”

 “अरे हो... मी पण ना..”

“काय लक्ष नाही का आज तुझं, मिटिंग होती आज यूएसएसोबत, सर्व ठीक ना ग?”

“हुम्म, तेच... असो बऱ किती वाजता यावं लागेल.”

“तू किती वाजता निघशील?”

“साधारण ८ वाजता.”

“मग ये तू, मी माझ्या कॉलेजच्या समोर कॉफीशॉप आहे ना तिथे असेल.”

“राजनलाही सोबत थांबायया सांग, मी आल्याशिवाय तो जाता कामा नये, मी ही मेसेज टाकते त्याला तसा. तू निघतांना आणि प्रत्येक वेळी मला मेसेज टाक, हल्ली काही सांगता येत नाही ग, आणि तुझं कॉलेज पण तर शहराच्या बाहेर आहे. सामसूम होते तिकडे लवकरच.”

“पण आज मी परिक्षेच आयडी कार्ड घ्यायला जाते आहे आता.“

“ठीक आहे ग, माझी अतिशय महत्वाची मिटिंग आहे, मग मी लगेच तुला कॉल किंवा उत्तर देवू शकणार नाही, तेव्हा काळजी घे.”

“ओके ताई, मी तसचं करेन, तू ही निघतांना सांग मला.”

“एन्जॉय राणी... राजन चांगला मुलगा आहे ग...”

“हो ताई, पण तू नकारलास ना!”

“ये ये राणी संपला ग तो विषय! आता तो माझा होणारा जावई आहे बसं !! उगाच काहीही बोलू नको त्याच्याशी. नीट गप्पा कर त्याच्याशी, कसं करायचं, काय करायचं सगळं विचार करा. प्रेम तुला झालंय मग मार्गही तू काढ, त्याला तुला जोडीदार म्हणून आयुष्यात आणायचं आहे तर तुलाच वाटचाल करावी लागेल. सांर दिसतं तसं काहीही नसतं राणी.”

“हुम्म... तायडे, मी निघते आता. बोलू नंतर. वेळ होतोय मला, करते तुला कॉल मी.”

राणीला सगळं समजवून तिने फोन ठेवला. राणीला फारसं सानूच बोलणं आवडलं नव्हतं हे सानूच्या लक्षात आलं होतं, पण ती हेही जाणून होती कि काही वेळाने राणी ते सगळं मनात आठवून परत परत विचार करेल आणि तिला पटेल. राणीला एन्जॉय असा मेसेज टाकून ती परत तिच्या कामाकडे वळली आणि परत पीसी वर नजर टाकली तर तिनेच झूम करून ठेवेलेला सुमंतचा फोटो तसाच होता.

रेकॉर्ड करून ठेवलेलं प्रेझेनटेशन परत ऐकलं, त्यातला तो सुमंतचा हुमम, ओके, एक्साकटली करेक्ट, येवढेच शब्द होते पण त्याच शब्दांना ती परत परत ऐकत होती. त्यानंतर तो जे काही बोलला ते तिने त्या वेळी तर ऐकलंच नव्हत मग ती आता ऐकत होती... आणि स्वतःला म्हणाली,

“केवढा शांत बोलतो हा, माझ्या सारख्या मुलीला एवढं शांतपणे हेंडल केलं ह्याने, मला जाणवूही दिलं नाही आणि माझं म्हणणं किती सहज पोहचवलं कलाईन्टपर्यंत. मेल लिहावा का याला... नको, उगाच काहीही समजेल, त्याने त्याचं काम केलं, मी माझं... त्यात काय? नाही नाही एक थॅंक्स म्हणून मेल लिहावा... नाही यार जावूदे...”

मनात परत विचारांची होळी सुरु झाली होती... प्रत्येक विचार तिला रंगवून जात होता आणि ती त्या विचारात त्या क्षणासाठी रंगत होती... मधेच परत विचरांना ब्रेक लागावा आणि असं झालं आणि पीसीच्या स्क्रीनला हात लागला आणि परत तोच सुमंतचा झूम करून ठेवलेला फोटो तिला दिसला...

प्रेमाच मधुर संगीत कानात वाजत होतं आणि दूर कुठतरी सनई सूर काढत होती... सानूच्या मनात आज प्रेमाचा हलकासा वंसत बहरत होता... पण हे सांगू कसं त्याला म्हणून मन मनालाच बोलत होतं

का कुणास ठाऊक सानू नुसत्या सुमंतच्या त्या बोलण्यावरच गुंतली होती. प्रेमाच हळुवार वारं तिला मोहत होतं....

सुमंतचा फोटो दिसताच ती स्वप्नातल्या विश्वातून एक हलकसं हास्य मनाच्या त्या कोपऱ्यात सोडून ती बाहेर आली.

कथा वळत आहे वळणा वळणाने, आपणही वळूया पुढच्या भागाकडे, लवकरच!  भेटूया पुढच्या भागात सानू आणि राणी सोबत....

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments