अधिचा भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2022/03/blog-post_11.html
नशेतल्या गोष्ठी राजेशसाठी नशा झाल्या होत्या. तो रतीला सोडू शकत नव्हता. पहिल्या दिवशी रातीचा उलटा सलवार त्याला सुन्न करवून गेला होता, रती काही बोलेल आणि मग सांर काही वेगळाच मार्ग धरेल ह्या नादात त्याने त्याच्याकडून त्या विषयाला वेगळाच मार्ग दिला होता. किंतु आता रती मनात मरत होती आणि राजेश घुसमटत होता.
सकाळी, राजेशने रतीची माफी
मागितली, “रते, जावूदे ना, मी नाही ग तसा, आपण दोघे आहोत ना एकमेकांना.”
रतीने त्याला जावू दिलं
नव्हतं, तिलाही आता नशाच होती त्याचं सारं काही जाणून घेण्याची, नात्यात तर भेग
पडली होती किंतु तुटलं नव्हत. रतीला नात सहज तोडायचं नव्हतं, तिला त्या भेगेची
वेदना त्याला जाणवून द्यायची होती.
रती तिच्या नादात म्हणाली, “जावू
देत नाही आता, खूप शिकले रे, आणि मीचं सांर काही करत आले.”
मीही सांर काही बघत आलोय
रती, जावू देत ना....
हो, जावूदेत पण मन सांर काही
सोसून उठवू कसं...
मी आहो ना....
रतीची घुसमट तिला खात होती,
वेळ निभवून नेत तिने गोष्ट सोडून दिली. राजेश ऑफिसला निघून गेला. आज त्याला काही
इंटेरिअर डिझानरचा इंटरविएव घ्यायचा होता.
तो ऑफिस मध्ये पोहचला, रती
आज आलीच नव्हती त्याच्यासोबत. तिलाही बऱ नव्हतं. आज घरीच बसावं ह्या नादात तिने
जुन्या आठवणीची साठवण आठवत राहिली. तो दिवस स्वतःसाठी जगवा म्हणून ती स्वतः रमवत
राहिली.
इकडे राजेशच्या ऑफिस मध्ये
त्याने इंटरविएव घेणं सुरु केलं, कुणीही त्याला पाहिजे तसं मिळत नव्हत. शेवटी एक
अर्ज होता, त्याने बघितला, नाव सानिका होतं, अनुभव काहीच नव्हता. तरीही त्याने
सानिका नाव असल्याने बोलावलं,
सानिका आत आली, तिला ह्या
नौकरीची गरज होती. भीत भीत ती बसली, सानिकाला राजेशला घ्यायच नव्हत, मग त्याने
अगदीच अलगत सोपा प्रश्न केला,
का हवा आहे हा जॉब, तुला का
द्यायचा आम्ही. काहीच अनुभव नसतांना.
तिनेही भीत उत्तर दिलं, मला
मागच्या दहा वर्षापासून घर डेकोरेट करण्याचा अनुभव आहे. किंतु नौकरीची गरज पडली
नाही, आपण च्नास द्या, मी आपल्याला बोलायला जागा ठेवणार नाही.
अगदीच सध्या स्वभावाची सानिका,
अलगत मयूरबद्दल बोलून गेली आणि राजेश चकाकला. त्याने हळूहळू तिला सारच विचारलं.
आणि काही वेळातच तिला नौकरी दिली. उद्यापासून तिला कामावर यायला सांगितलं.
ती कॅबीन मधून जाताच त्याचा
प्लान सुरु झाला. त्याने रतीला बऱ्याचदा फोन केला पण ती काही केल्या फोन उचलत
नव्हती. त्रासून त्याने घरी लवकर येण्याचा निर्णय घेतला. तो आला त्याने सर्वीकडे
रतीला शोधलं, फोनही घरीच होता. रती कुठेच दिसली नाही. जवळपासच्या सर्वांना कॉल
करून झालं. सर्वाना विचारून झालं. नौकर चाकर कुणालाच रती कुठे आहे माहित नव्हत.
संध्याकाळ होतं आली होती.
रतीचा अजूनही पत्ता नव्हता. राजेश घरात बसून वाट बघत होता. तोच समोरून त्याला रती
येतांना दिसली, तो धावला,
“रती कुठे होतीस, किती वेळचा
तुला शोधत आहे मी. काय हा मूर्खपणा, फोन तरी सोबत न्यायाचा ना?”
रती गुमान गप्प होती, काहीच
बोलत नव्हती, ती आली, पाणी प्याली, राजेश तिच्या मागे पुढे होतं होता, किंतु रती
काहीच बोलेना. शेवटी त्रासून राजेश म्हणाला,
“ठीक आहे नको बोलूस, निदान
कुठेही जात्तांना मोबाईल तेवढा घेवून जात जा. मी ऑफिसला निघालोय. तू फोन उचलत
नव्हतीस म्हणून घरी आलेलो. नवीन स्टाफ ठेवला आहे. काही काम आहेत.”
रती आता बोलली, “तुझा अधिकार
आहे ह्या गोष्टीवर म्हणून सांगते, मला दीवस गेलेत, तीन महिने झाले आहेत. मी
उद्यापासून ऑफिसला येणार नाही, माझी काम मी इथून घरून करणार.”
राजेश चक्क ओरडला, “रते,
एवढी मोठी गोष्ट तू अशी सांगतेस.”
त्याने येवून रतीला आलिंगण
दिलं, लगेच ऑफिसला फोन लावला कि तो येणार नाही म्हणून. त्याचा आनंद पाहण्यासारखा
होता. रती मात्र मनात खुडत होती, तिने राजेश सकाळी निघताच स्वतः साठी जगण्याचा
निर्णय घेत वेगळं होण्याचा मार्ग निवडला होता. किंतु अचानक तिला पोटात दुखायला
लागलं आणि मग सारच लक्षात आलं कि गेल्या काही महिन्यापासून पाळी आलेली नाही, कंबर
दुखतेय, अचानक तिचं चिडणं आणि रडणं, आजही तिचं असं वागणं......... ति तयारी करून
सरळ हॉस्पिटलला गेलेली आणि हि बातमी तिला मिळाली. बाळाला बाप असून वेगळं ती ठेवू
शकत नव्हती आणि मग घराचा रस्ता तिने धरला होता.
बाळाची बातमीहि तेव्हां
कळाली जेव्हां सारच कळून चुकलं होतं. आता परत स्त्रीच जगणं बाळासाठी जगावं लागेल
ह्याच विचारात ती होती. बाळासाठी मनमुराद जगायचं पण तेही बाळाच्या बापासमोर हे
तिला पटत नव्हतं.
राजेशने तीची माफी परत
मागितली, “रते मला माफ कर ग, पण जे झालं ते मी नाही केलं, आणि सांर झाल्यावर
माझ्या हाती काय होतं. त्या मयूरची कॉलर धरून आपण काय इथवर पोहचणार होता. मी सांर
काही विसरलो, तुही विसर.... त्या मयूरला मी सोडणार नाही..”
“काय करणार रे तू...?”
“जावूदे ना ते, तू आता
काहीही विचार करू नकोस. बांस आनंदी राहायचं, आधी कशी राहायची, अगदी तशीच.”
राजेश सांर काही नीट
असल्याची शाश्वती स्वतःला देत होता. रती तिच्या बाळासाठी मागे पालटली होती.
सानिकाने ऑफिस जॉईन केलं
होतं. राजेश तिला अगदीच चांगली वागणूक देत होता. मयूरसारखा नव्हता पण, पुरुष होता,
त्याच्या बायकोला वापरणाऱ्या मयूरला त्याला धडा शिकवायचा होता. पण सानिका अगदीच
साधी होती. तिला काही डावपेच कळत नसायचा. कामाशी काम ठेवत ती ऑफिस करायची. राजेश
मात्र तिला रोखून नेहमी बघत असायचा.
दिवस भराभरा जात होती आणि मग
रतीला मुलगी झाली. रती कामापासून दूर झाली होती. राजेशच्या हातात सांर काही आलं
होतं. मयूरची बायको त्याच्या ऑफिस मध्ये कामाला होती. त्याच्या साठी डाव पलटला
होता. आणि त्याने तो तसाच पलटायचा विचार पक्का केला होता. मयूरने नकळत त्याला दुखावलं
होतं ते त्याला आता मयूरला दाखवून द्याचं
होतं. मयूर ने फेकलेला बुमरेंग त्याच्या दिशेने परत निघण्याची वेळ आली होती.
तो नेहमी सहज बोलण्यात
सानिकाची चौकशी करायचा. सानिका हसरी आणि बोलकी होती, अलगत सांर सांगायची. तिचा
त्रासहि ती बॉस म्हणून कधी कधी राजेशला सांगायची.
त्या दिवशी, एका प्रोजेक्टच
इंटेरिअर राजेशने सानिकाला दिलं. तिला साईट दाखवायला घेवून गेलेला. तशी ती कधी
त्याच्या सोबत जात नसायची पण आता तिला काम करून वर्ष झालं होतं त्याच्यासोबत. मग
आज ती गेलेली. राजेश हळूच म्हणाला,
“सानिका तू घरी गेल्यावर
घरचंहि करत असशील ना, कि तुझा नवरा करतो सांर?”
“नाही सर, तो नुसता दारू पीत
असतो, मी घरी गेली कि करते सांर”
ती परत साईटचे फोटो काढण्यात
गुंग झाली. अलगत तिची ओढणी खंद्या वरून खाली आली, तिने ती सावरली पण तिच्या
छातीवरच्या जखमा राजेशला दिसल्या. तो काही विचारनार तेवढ्यात सानिका बोलली,
“निघायचं का, माझं झालं सांर
बघून, मी करेल सगळं आता ऑफिस मध्ये बसून.”
राजेश मात्र बोलला, “काय ग,
मारतो का तुझा नवरा.? कशाला सहन करतेस, आजकाल येवढ कुणी सहन करत नाही, कमावतेस
तू.”
“नाही सर.” सानिका
डोळ्याच्या किनाऱ्यावर जमलेले अश्रू अलगत लपवत म्हणाली.
“मग हे, तुझ्या हातालहि मार
आहे, कुठे पडलीस का?”
सानिका काहीच बोलली नाही. ती
गप्प कार कडे वळली, कार मध्ये बसल्या बसल्या राजेश आणखीन जोर देवून म्हणाला,
“तुझ्या नवऱ्याला माहित आहे
का तू इथे काम करते ते.?”
“मी सांगितलंय त्याला, पण
लक्षात नसेल त्याच्या. दारूची नाश त्याला सोडत नाही मग काय लक्षात असणार.”
“आणि तुला तो मारतो मग
तुझ्या माहेरी माहित आहे. सासरी सगळं नीट आहे ना.”
“जावूद्या ना सर, कशाला
नुसत्या चौकश्या करता, तुम्ही काय मला वाचवायला येणार आहात, कुणाला मी हवी आहे.
साऱ्यांना सगळे बरोबर वाटतात. कुण्या एका विषकन्ये आयुष्य बरबाद केलं आमचं आणि आता
आहोत पडलो. ज्याला डंख तिने मारला तो नशेत असतो आणि मरण माझं होतं. जगते तेवढ
जगायचं, आता कुठे निघायचं. इथे इथेच राहायचं.”.
आत मात्र राजेशचा मेंदू
तापला होता, नकळत सानिकाने त्याच्या बायकोला विषकन्या म्हटल होतं. अर्थात तिला
काहीच माहित नव्हतं. नाण्याची खोटी बाजू तिने तिच्या चलाख नवऱ्याकडून ऐकली होती.
राजेशने जोरात गडी ऑफिसला घेतली. सानिकाला कॅबीनमध्ये यायला सांगितलं.
सानिका कॅबीन मध्ये पोहचली
तेव्हां राजेश रतीशी बोलत होता. रती त्याच्याशी VDO कॉलवर होती. तो बाळाशी बोलत
रतीला छेडत होता. मुलीच्या जन्मानंतर रती जरा शांत झाली होती. मनातल्या वादळांना
तिने शमवलं होतं. राजेश आणि रती जरा रमले होते त्यांच्या संसारात. दोघांत गोडवा
निर्माण झाला होता.
सानिकाला कॅबीन मध्ये बघताच
राजेशने रतीला सानिका आली आहे सांगून फोन बंद केला. रतीला सानिकाबद्दल फारसं काही
माहित नव्हतं. ती इनटेरिअर डीझाईनर आहे एवढचं ते तिला माहित. राजेशने कधी तिचा
विषय घरी काढला नव्हता आणि रातीनेही कधी फार जोर देत नुसत्या चौकश्या केल्या
नव्हत्या.
राजेशने सानिकाला बसायला
सांगितलं, उगाच खूप काम दिलं आणि तेही त्याने समोर करायला लावलं. आज सहा वाजून
गेले होते. सानिका घरी सात पर्यंत पोहचली नाही तर मयूर आज तिला मारून मारून काय
करेल हे ती विचारही करू शकत नव्हती. तिची घालमेल वाढत होती. ती राहून राहून फोन
बघत होती. भीती होती तिला कि मयूर फोन करून कुठे असल्याची चौकशी करेल म्हणून...
तसा मयूर पझेसिव होता सानिका साठी, असं तिचं नौकरी करणं त्याला पसंद नव्हतं म्हणून
त्याने कधी तिच्या गुणांना वाव दिला नव्हता.
इकडे राजेश तिला असं बघून
मनात तृप्त होतं होता. त्याला रतीची घालमेल आठवत होती.
सानिका उठली आणि म्हणाली, “सर
सहा वाजून बराच वेळ झालंय, मी थांबत नाही, निघते, उद्या करेन हे.”
“का ग, हवं तर ओवर टाईम घे
ना! गरज आहे तुला.”
“सर जगण्यापुरत मिळत बाकी
नको, पैसा पर्तिष्ठा खूप बघितली आहे. आता जगन्याचा मार्ग शोधत आहे.”
राजेश हसला, “तुझ्या त्या
बेवड्या नवऱ्या सोबत.”
“सर सांभळून बोला, नवरा आहे,
एकेकाळी अतिशय प्रेम करायचा तो माझ्यावर, मग काय आता त्याला सोडून देवू?”
“सॉरी, असो, मी सोडतो तुला.”
सानिका साधी होती पण
सांभाळून राहणारी होती. आणि राजेश नेमका तसा नव्हता. त्याला सानिकाला उतरवण अजून
काही जमलं नव्हतं. तिला तसाही तो बावळट समजायचा.
राजेश सानिकाला सोडायला तिच्या
अपार्टमेंट पर्यंत आलेला. मयूर बाहेरच होता. सानिकाला गाडीतून उतरतांना बघत मयूर
चकाकला, त्याने रोखून बघितलं, त्याला कार मध्ये राजेश दिसला. आता मात्र त्याचा
मेंदू पार भडकला. राजेश निघून जाताच त्याने सानिकाला ओढत घरात आणलं.
आधी तिचे कपडे बघितले. मनात
शंका आली होती त्याच्या. रतीचा उलटा सलवार अजूनही लक्षात होता त्याच्या. राजेशने
सानिकाला खूप मारलं. तिला तर कारणही कळत नव्हतं.
मार खावून गप्प झालेली
सानिका स्वतः ला सावरत स्वयपाकाला लागली. हॉल मध्ये बसून मयूर गुमान कसल्या तरी
विचारात होता. सानिकाला आज मयूरच्या
फोनमधला तो VDO आठवला, त्यात ते रतीच मयूरसाठी भेभान होणं तिला आठवत
होतं. मनात तिने रतीला अनेक श्राप दिले आणि शांत होतं. स्वयपाक केला.
खरं तर तो VDO
सानिका ने दोन वर्षा आधीच चुकून बघितला होता. आणि कुणाला माहित होईल ह्या भीतीपोटी
डीलीट केलेला. त्यातंच तिला गर्भपात झाला होता. नंतर जे घडत गेलं ते सांर काही
संपत गेलं. त्यात मयूरच तिला सांर काही उलट पद्धतीने सांगून स्वतःला वाचवणं हे ती
ओळखू शकली नाही. तिच्या साठी रती विषकन्या होती जिने तिच्या संसारात विष घातलं
होतं आणि स्वतः राणी म्हणून राज्य करत होती. आज मयूरने तिला ह्यासाठी मारलं नव्हत
कि ती राजेशच्या गाडीत आली, तर तिने आजहि राजेशला तिच्या जाळ्यात फसवलं नव्हतं आणि
राजेश तिला स्टाफ म्हणून सोडायला आलेला बघून त्याने तिला बेदम मारलं होतं. सानिकाला
रती वाह्यचं नव्हतं, तिच्यासाठी तिचा जीव गेला तरी चालेल असं होतं, बसं दिवसाचे
काही तास ती स्वतः साठी जगत राजेशच्या कंपनीत काम करायची. नवऱ्याने रोज दिलेल्या
सूचना ती दारात सोडून द्यायची आणि गुमान ते आठ तास जगायची.
कथेचाअंतिम भाग वाचायला विसरू नका. स्त्री एक असं व्यक्तिमत्व आहे जिच्या मनाचा थांग पत्ता खुद्द तो घडवणारा कधी लावू शकला नाही, मग राजेश, आणि मयूर कसे लावणार होते ... वाचूया पुढचा अंतिम भाग... एक डाव तिचा ...
अंतिम भाग पेजवर लवकरच, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा... तेच तर माझं बक्षीस असते, जे उत्साह भरते लिखाणासाठी....
https://www.facebook.com/manatlyatalyat
जोडीदार कथेचे भाग सर्व भाग इथे आहेत - कादंबरी कथा- जोडीदार... प्रवास तुझा माझा
पेजला लाईक करा
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव
फोटो साभार गुगल
©उर्मिला देवेन
Urmiladev@gmail.com
0 Comments