सोबत वेळ घालवतांना मयूर बद्दल रतीला खूप काही माहित झालं. मोहिते बिल्डरच्या बऱ्याच गुपित
गोष्टी तीला कळल्या होत्या.
अवघ्या काही महिन्यात रती
मॅनेजर झाली होती, स्वतःची वेगळी कॅबीन, हाताखाली माणसं आणि चाळीस माणसांची टीम ती
हँडल करत होती. मोहिते मॅनेजमेंट जाम खुश होतं आणि त्या खुशीत मयुरने लॉज बुक
केला. त्याला आता रतीला सर्प्राइज द्यायचं होतं. आज परत सहा वाजले होते, धडकी
रातीत भरली होती, तर एक बुके तिच्या टेबलवर आला, आणि मग तिचा मोबाईल वाजाला,
“हे रती, जस्ट गेट रेडी.”
आणि हळूच म्हणाला,
“बुके कसा वाटला, तुला
आवडतात ही फुले.”
रतीही तसाच प्रतिसाद देत
म्हणाली,
“हो पण तुला कसं माहित?”
“अरे, आपल्याला जे आवडतात ना
त्याची प्रत्येक आवड आपल्याला माहित असते. असुदे, जस्ट गेट रेडी, आय हॅव सर्प्राइज
फॉर यू.. तू तुझ्या त्या, कोण तो, राजेश, हा त्याला कॉल करून सांगून दे, तू
माझ्यासोबत आज बाहेर आहेस म्हणून.”
“म्हणजे?”
“अग जस्ट टेल हिम, आपण साईट
वर जातोय आणि मोहिते बिल्डर सोबत डिनर आहे म्हणून.”
“चिल.. आय विल हँडल हिम..
मला सांग कुठे जायचं आहे ते.”
“ते सर्प्राइज आहे
तुझ्यासाठी, मी निघतोय, पार्किंग मध्ये भेट.”
रतीचे श्वास फुले होते, आज
असं काहीच नव्हतं मग हा अजून काय करणार हे तिला कळत नव्हतं... मोहिते प्रोजेक्ट
अंतिम टप्यात होताच, राजेशनेही टेंडर भरलं होतं, पण अजून रतीचे दिवस संपले नव्हते,
तिला तिचा संयम कायम ठेवायचा होता. मयूर कॅबीनच्या बाहेर आला, तिरकस नजरेने त्याने
रतीच्या कॅबीन मध्ये बघितलं, रती गुमान
काम करत होती. तसं त्याचं ठरलं असायचं रती कधीच मयूरच्या मागेच निघत नसायची, मयूर
बाहेर जावून सिगार फुकत, भटकत, कधी सील घ्यायला जायचा कधी काही असा तो साधारण एक
तास घालवायचा आणि मग रती पार्किंग मध्ये यायची. किंवा रती आधी निघाली कि ती शॉपिंग
करत असायची. आजही मयूर सील घ्यायला निघून गेला. पण रती आज गोंधळली होती, आज परत
तेच ह्या विचाराने ती मनात तुटली होती, तिने बऱ्याचदा मयूरचा फोन चेकही केला होता
पण तिला तो VDO कधीच मिळाला नव्हता आणि मयूरकडे विषय काढला कि तो
सहज टाळायचा, म्हणायचा,
“रती, मी केव्हांच विसरलो,
आपण एक आहोत आता, मी डिलिट केलाय कधीच, माझी बायकोही आहे. मलाही भीती आहे ग.”
पण रतीला ते कधीच खरं वाटलं
नाही, आणि आज तिने त्याला गुंगीच ओषध दवून लॅपटॉप बघायचा प्लॅन केला.
वाशरूम मध्ये आली, ओठंवर
लिपस्टिक लावली, ओठांचा घट्ट करत तिने त्या लिपस्टिकला घट्ट करत मनाला घट्ट केलं,
आणि निघाली पार्किंग कडे, मयूर गुलाबाचं फुलं घेवून तिची वाट बघत होता. ती येताच
त्याने गाडीच दार तिच्यासाठी उघडलं, फुलं तिच्या हातात दिलं, गोडशी स्माईलं दिली
आणि गाडी सुरु केली.
रतीने गुमान कानात हेड फोन
लावले, जरा निवांत पडून ती होती, मयूर तसाही तिची काळजी करत असायचा मग त्यानेही
तिला काहीही म्हटलं नाही, सरळ गाडी त्याने हॉटेल समोर उभी केली. दोघेही खोलीत आले.
खोलीत सर्व काही तयार होतं, आल्या आल्या आज रतीने पॅक तयार केले, मयूर असं तिला
बघून आणखीनच खुश झाला, तो शॉवर रूम मध्ये गेला आणि रतीने पॅक मध्ये गुंगीच औषध
टाकलं आणि ती गुणगुणत राहिली, मयूर आला आणि मग स्वतःला आवरू शकला नाही, रतीने आज
त्याला जरा वेळ स्वतः गुंतवलं आणि मग पॅक संपला, मयूर बेसुध होवून पडून होता आणि
रती पिसाळल्या सारखी मयूरचा लॅपटॉप बघत होत, मयूर जास्त वेळ बेसुध राहणार नव्हताच,
रतीला काहीच मिळालं नाही, हताश झाली, काहीच सुचत नव्हतं, मयूर उठला,
“काय काही मिळालं का ग?”
रती गोंधळली, दाराच्या
कोपऱ्यात उभी होती, मयूर तिला रेटून उभा झाला, तिच्या गालांना पिळत म्हणाला, मला
काय मूर्ख समजलीस, तो vdo असा मोकळा ठेवायला. आणि त्याने त्याचा पेंट काढला,
रती ओरडत राहिली आणि मयूर मनमानी करत राहिला. रती हरली होती. बऱ्याच वेळानी मयूरचा
फोन वाजला, त्याने उचलला, त्याच्या बायकोचा होता,
“सानी, येतोय बेबी, जरा
मिटिंग होती, आणि कसं आहे ना वेळेवर काही लोकांना दगाच दिला मग मलाच सगळं सांभाळावं
लागलं, आणि तो एका हाताने रतिचे केसं आवरत होता.”
रतीचे तर जसे अश्रू आटले
होते आणि ती शून्य झाली होती. मयूरने तिचे केसं जोरात ओढून तिला धक्का दिला आणि
निघण्याचा हाताने इशारा दिला. रती कशीतरी उठली, कपडे आवरले, आजही घाईत तिने उलटा
जीन्स घातला. तिला असं बघून मयूर जोरात हसायला लागला, म्हणाला,
“ये वेडाबाई, काशाला ग
मेंदूला त्रास देतेस, तू ना मेंधाळच छान आहेस.”
नंतर त्याने सिगार पेटवली,
नाकातून आणि आणि कानातून धुव्वा काढत तो रतीच्या अगदीच जवळ आला, तीही शून्य झाली,
तिच्या कानात हळूच म्हणाला, “तुझ्या नवऱ्याला मी तो कधीच पाठवला....”
रती रागात बघत राहिली, आता
तिचा हात उठला, त्याने तो कचकन पकडत तिला आणखीनच जवळ ओढलं, “जानू, असं मी करेन का
ग, मी तो कधीच डिलिट केलाय...”
तिचा हात धसकन सोडला त्याने
आणि परत तिला म्हणाला, “खरच मी केलाय ग, मग आता काय तू मला सोडून देशील?”
रतीने रागात तिची बॅग उचलली,
आणि ती निघून गेली.
दिवस जात होते, आणि शेवटी
राजेशला ह्या वर्षीचा मोहिते बिल्डरचा कॉंट्रॅक्ट मिळाला, रती खुश होती पण जाणून
होती तिने किती मोठी किंमत मोजली ते. शेवटी तिचा निर्णय पक्का झाला, तिला नौकरी
सोडायची होती आणि राजेशला जॉईन करायचं होतं.
आज राजेश जाम खुश होता, घर
जसं आनंदाने डोलत होता. रती त्याला म्हणाली,
“राजेश मी राजीनामा देतं
आहे.”
“रतु का ग, अजून काही महिने
कर ना, काही बारीक सुरिक बाबी माहित होतीलं ना मला .”
राजेश जास्त होतंय तुझं, कर
ना स्वतः मेहनत
रते काय ग चिडतेस, तो तुझा
बॉस आहे ना बुडव त्याला..
राजेश...
रते! माय डार्लिंग
मी उद्या राजीनामा देत
आहे... लग्न केलस, सांभाळ ना...?
राजेश गप्प होता आणि मग रती
गप्पच झाली.
रतीने दुसऱ्या दिवशी राजीनामा
मयूरकडे दिला, मयूर तिला म्हणाला, “काय ग? मन भरलं काय तुझं?”
“हो... तसं समज... तुला काय
नवीन तितली मिळेल ना? आणि हा, तुझा घडा भरला समज.... बघच तू आता...”
“पण तू नाही ना?” तो मिश्कील
हसला
“माझं काय, मला नकोच आता, पण तू तो vdo
डीलीट केलाय ना, विश्वास ठेवते तुझ्यावर, तसाही फरक पडत नाही, ज्याही धमकी देत
होतास ना त्यालाही बघेन मी.”
“उहउह....उफ .... घाबरलो
मी.. जा घे बघून....”
“माझं मी बघेनच पण तुझंही नातं
मी धुळीत मिळवेन, तुझ्याच कडून शिकले मी. आता माझ्या तू शेपटावर जरी पाय ठेवलास ना
तर तुला डंख मारेल मी
अर्र... नागीण झालीस ग तू.
मग, तुझ्या सारख्या पांढऱ्या
नागाला मारण्यासाठी मला नागीण व्हावच लागेल ना...निघते मी, आता माझ्या वाटेवर तू
नाही आणि तुझ्या मी नाही.”
मयूर विचार करत राहिला, हिने
नौकरी का सोडली, नंतर त्याला काही दिवसांनी माहित झालं कि मोहिते बिल्डरचा पुढचा
प्रोजेक्ट राजेशने घेतला तेव्हा मात्र तो गडबडला, “अरे साली, माझा तर वापर केला
हिने.”
मॅनेजमेंटचा दबाव वाढत होता,
मयूर त्याच्या कंपनीला खूप प्रोजेक्ट मिळवून देवू शकत नव्हता. मोहित्यांना कामावर
रती हवी होती आणि रती आता यायला तयार नव्हती. मॅनेजमेंटने मयूरला सस्पेंड केलं,
आणि तो दारूच्या आहारी गेला. काही दिवसात त्याच्यावर त्याचं राहतं घर विकण्याची पाळी
आली. बायकोचा गर्भपात झाला आणि ती चिडचिड मयूरला जाळत होती.
इकडे, राजेशने स्टाफ वाढवला
होता, त्याचा व्याप वाढत होता रती त्याच्या सोबत काम करत होती.
आता त्याच्या कडे प्रोजेक्ट
वाढले होते. मोठा बंगला, गाडी, गडी सांर काही साध्य झालं होतं.
दोन वर्षात अफाट प्रगती केली
होती. माहिते बिल्डरशी नातं जुळल्याने मार्केट मध्ये खूप नावं होतं त्याच.
रतीही सांर काही विसरली
होती. पण सल मनात होतीच, तिलाही सांर काही सांगून टाकावं राजेशला आणि मग तो म्हणेल
तो निर्णय ठेवावा असचं वाटायचं पण....
त्या दिवशी ती खूप प्यायली
आणि म्हणाली, “तू ना बायकोच्या जीवावर वर चढत गेला आहेस.”
रते, लय चढली आहे तुला,
गुमान झोपं
थांब रे, आज तुला सांगायचं
आहे मला
पण मला काहीच ऐकायचं नाही
ऐकावं लागेल, मी किंमत मोजली
आहे तुझ्या यशाची, साला तो मयूर... त्याला काय म्हणते मी, साली पुरुषाची जातच
खराब, तू काय कमी नाहीस, रते, तुझा बॉस जसं म्हणेल ना तसं कर, मला तर आजही शंका
आहे...
काय रते,
तुझी आणि त्या बोक्याची
गाठभेट होती कि काय?
रती, तू काय बोलत आहेत हे
तुला माहित आहे का?
हो चांगलंच माहित आहे, साला
तो आणि तू, मर्द म्हणून घेता स्वतःला, आणि बायकांचा वापर करता.
रती बिलकुल चूप, माहित आहे
सांर मला, पण रेटतोय ना तुला, नसले पटत तर सांग मला काय कमी आहे का?
असं ! म्हणजे काम झालं तर
लाथ मारायची...
तसं नाही ग, गप्प हो ना.
राजेश तिच्या जवळ आला,
त्याने तिला हलकसं मिठीत घेतलं, रती जे झालं ते माझ्या सांगण्यावरून नाहीच पण तुझा
तो उलटा ड्रेस सांर काही सांगून गेला होता मला.
राजेश बोलत राहिला आणि रती
झोपली होती. तिला झोपवून राजेश पूर्ण रात्र पीत राहिला, त्याला आता राहून राहून
रतीचा उलटा जीन्स आठवत होता, त्याने रागात विस्कीचा ग्लास फेकला, “साला मयूर,
लाचारी काय असते ना ते मी तुला सांगतो आता.” नशेत बडबडत तो तसाच सोफ्यावर झोपला.
कथा अंतिम चरणात लवकरच... येत्या
बुधवारी वाचायला विसरू नका.
नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!
https://www.facebook.com/manatlyatalyat
जोडीदार कथेचे भाग सर्व भाग इथे आहेत - कादंबरी कथा- जोडीदार... प्रवास तुझा माझा
पेजला लाईक करा
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव
फोटो साभार गुगल
©उर्मिला देवेन
Urmiladev@gmail.com
0 Comments