“द बुमरेंग”… एक डाव तिचा.... भाग 2 इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2022/02/blog-post_25.html
रतीने तिचा लॅपटॉप घेतला आणि ती लगेच निघाली. कॅबीन मध्ये पोहचली
तेव्हा, मयूर शॅम्पेनची बॉटल हातात घेऊन होता, ती
दिसताच म्हणाला,
“या या, मिस रती, तुमच्या.... तुझ्या शियाय हा आनंद कसा साजरा होवू
शकतो, कम कम, सीट, ड्रिंक्स घेतस ना?
“सर...”
“नो फॉरमॅलिटी, सीट फस्ट...”
मयूरने शॅम्पेन
ओपन केली, ग्लास भरली, रतीच्या
अगदीच जवळ आला, “चीयर्स... हे तुझ्या यशासाठी.. अरे आपण तुला खूप उंच घेवून जावू.
यू गोइंग टू बी रॉक रती. यू नो यू आर द स्पार्क.. वाव!”
त्याने पूर्ण बॉटल संपवली, नंतर
सिगार काढली, रतीच्या हातात लाईटर दिलं, तिला त्याच्या तोंडातली सिगार इशाऱ्याने
पेटवायला लावली. रतीने तिचा पॅक अजून संपवला नव्हता, मयूर म्हणाला, “ये रती काय
हे, फिनिश इट, मी जेवण ऑर्डर केलं आहे. येईल, लेट्स एंजॉय.”
“सर.. पण?”
“सर बिन काही नाही तू मयूर
म्हटल तरी हरकत नाही मला.”
त्याने अलगत त्याच्या टेबलचा
ड्रोवर उघडला, नशेची गोळी गुपचूप काढली, रतीचा ग्लास समोर होता, तो तिच्या जवळ
गेला, तिचा ग्लास त्याने उचलला तिच्या नकळत गोळी त्यात टाकली, आणि तो ग्लास तिच्या
हातात दिला,
“हे रती फिनिश कर ग तुझा
पॅक... सगळं संपवून घरीही जायचं आहे आपल्याला, आपले बेटर हाफ वाट बघत असतील.”
रतीने गटकन गीटकत तिचा पॅक
संपवला. जेवण आलं होतं, बॉय ने ते दोघांना लावून दिलं, नंतर मयूरने त्यालाही घरी
जायला सांगितलं. दोघांनी सोबत जेवण केलं. रतीला काहीसं गरगरत होतं. पण ती स्वतःला
सावरत होती. आता तिने राजेशला मेसेज करायला फोन हातात घेतला तोच मयुरने फोन तिच्या
हातून ओढला, तिलाही ओढलं, तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर त्याने ताटातला नाईफ फिरवला,
रतीला आता तो दोन दोन दिसायला लागला होता. तीही त्याच्या बाहूत होती. मयुरने तिला कॅबिनच्या
मोठ्याश्या सोफ्यावर फेकलं. त्याचे कपडे काढले, तिलाही त्याने अर्ध नग्न केलं. रती
भानावर नव्हती, मयूरने स्वतःला शांत होईपर्यंत रतीला सोडलं नाही. तासभरात गोळीची
गुंगी उतरली, रती पटकन भानावर आली, तिचा सलवार तिने उचलला, घातला, मयूर खोलीत
नव्हता, स्वतःला सावरलं. केसं नीट केलेत. गडबडीत तिने उलटा सलवार घातला होता. भरा
भरा ती तिच्या जागेवर आली, राजेशला फोन लावला, तोही उचलत नव्हता, आता मुयुर
त्याच्या खोलीतून तिच्याकडे आला, “हे, मी वॉश रूम मध्ये होतो ग, तू का लवकर आलीस खाली?”
मग जवळ आला, तिच्या केसांना
हात लावत म्हणाला, “काय रती काय चीज आहेस तू?”
रती तिच्या टेबलला धरून उभी
होती, गडबडली, मयूर परत तिला सांभाळत म्हणाला,
“अरे जपून, लागेल तुला,
मस्त, छुपे रुस्तम आहेस ग तू, आहा मन कसं भरून गेलं माझं, तुझही ना?”
“सर, पुढे येवू नका, मी तसली
नाही, मला माहित नाही हे काय झालं ते.”
“कसली ग, आता काही वेळा आधी
मला सोडत नव्हतीस तू.”
“आहा आहा, मज्जा आली मला,
काय तो फील होता.”
“सर, मला माहित नाही तुम्ही
काय केलंय ते... तुम्ही कदाचित गुर्मीची औषध घातली असावी.”
“असं?”
“मी काही केलेलं नाही, मी
निघते.”
“अग, हो, मी सोडतो तुला.”
“नाही, नको...”
तिने राजेशला फोन लावला, तो
अजूनही उचलत नव्हता. तिने बॅग उचलली. मयुरने तिचा हात पकडला, रतीने तो सोडवत
त्याच्या गालावर जोरात लावली. मयूरला प्रचंड राग आला होता. ती निघणारच होती तर
त्याने त्याचा मोबाईल सुरु केला,
मयुरने त्याचं आणि तिचं
शारीरिक मिलन रेकॉर्ड केलं होतं, आणि तोच ओरडत होता, “सोड ना ग रती... यस आय नो यू
लव लॉटस. मी टू...” आणि तो तिला अगदीच चिपकून होता, दोघेही नग्न होते. आणि सारं
काही कैद होतं कॅमेऱ्यात.
मयुरने vdo बंद
केला, तो हसत तिच्या जवळ आला, “रती तू रतीच आहेस ग, त्या राजेशच्या मागे काय लागलीस.”
त्याने तिचा हात घट्ट धरला, आज ही थापड सहन केली मी तुझ्या त्या माझ्या वरच्या
प्रेमापोटी पण यात राख, जस्ट कीप इन माइंड, मी ह्यातही तुझा बॉस आहे.”
रती हात सोडवत होती तोच
राजेशचा फोन आला, मयुरने तिचा हात सोडला, आणि तो गाणं गुणगुणत मागे झाला, “अगर तूम
मिल जावो जमाना छोड देंगे हम.....”
रतीने राजेशला यायला सांगितलं. रती घाबरून गप्प झाली होती, तोच मयूर तिच्या आणखीनच जवळ आला, “ऐक, गोष्ट तुझ्यात आणि माझ्यात, बात खल्लास. तुझा नवरा तुला लखलाब, त्याला काहीही कळणार नाही ना कुणाला, तू हाच प्रोजेक्ट लीड करत आहेस. समजलं. गुमान काम करायचं... आणि नाही केलंस तर...
कसम तेरी कसम
तक़दीर का रुख मोड़ देंगे हम
अगर तुम ना मिलो
ज़माना तोड देंगे हम....”
रती निघणार होतीच तर
म्हणाला, “सलवार उलटा घातला आहेस, नीट कर... नाहीतर तुझ्या त्या लंपट नवऱ्याला
काहीही वाटायचं. मी माझ्या कॅबीन मध्ये आहे.”
रती तिचा सलवार नीट करायला
निघणार होती तोच राजेश तिथे आला. पाठमोऱ्या मयूरवर नजर पडली त्याची म्हणाला, “मयूर
सर, हाऊ आर यू..”
मयूर पालटला, त्याने त्याचा
मोबाईल हातात घेतला, तशी रती घाबरली, पण सावरत म्हणाली, “राजेश हे सर, मयूर सर.”
मयुरने त्याचा मोबाईल
खिश्यात टाकला, त्याने राजेशशी हात मिळवला, म्हणाला, “राजेश तू खूप लकी आहेस, रती
इज सो इंटेलिजएन्ट...”
राजेशने मान हलवली म्हणाला, “यस
आय डू नो इट, शी इज. लेट्स मिट समटाइम.”
“शुअर, आय हॅव टू गो, यू नो
माय वाईफ वेटिंग फॉर डिनर...”
मग रतीला म्हणाला, “रती तू
ते प्रेझेन्टेशन तयार करून घे, उद्या आपल्याला मोहिते साईट वर जायचं आहे.”
“राजेश एक्सकुज मी. आय हॅव
टु गो, यू गाईज कॅरि ऑन.”
आणि तो त्याच्या कॅबिन मध्ये
निघून गेला. रतीने तिची बॅग उचलली आणि तीही गुमान राजेश सोबत निघाली. स्वतःचा राग
येत होता तिला, जयूचं म्हणन आठवतं होतं. सगळ्या लेडीज स्टाफला माहित होता मयूर पण
तिचा अंदाज कसा चुकला ह्या विचारात ती कासावीस घरी पोहचली.
रती घरात येताच आधी शॉवर
घ्यायला निघून गेली. राजेशने येतांना पिझ्झा घेतला होता, ऑवेन मध्ये त्याने गरम
केला, दोन पॅक तयार केले. रतीच्या आवडीच म्युझिक लावलं. घरात कॅण्डल लावलीत, माहोल
कसा फुल रोमॅंटिक केला होता त्याने.
रतीने आधी अंगावर गार पाणी
घेतलं, दाटून ठेवलेला आवंढा पार मोकळा करत ती ढसाढसा रडली, किळस आल्यासारखी ती
अंगाच्या प्रत्येक भागाला साबनीने घासत होती. तोच राजेशने आवाज दिला,
“रती किती वेळ लावशील ग?
येणा आता. कधीचा वाट बघतोय, भूक लागली आहे मला...”
रतीने सर्व आवरलं आणि ती
केसांना टॉवेल बांधून बाहेर आली. हॉल मध्ये आली तर सर्व कसं रम्य वाटलं तिला, पण
हवी ती दाद ती राजेशला देऊच शकली नाही. नंतर राजेशच समोर आला, तिला त्याने मिठीत
घेतलं, तिच्या केसांना त्याने ड्रायर ने ड्राय केलं. मिठीत घेवून तिला बसवलं, रती
मात्र मनातून पार गोंधळली होती. तिचा उलटा सलवार त्याला दिसला नाही कि दिसला ह्या
प्रश्नात ती होती. तरीही गुमान शांत राजेशला साद देत राहिली, शेवटी राजेशने तिच्या
मांडीवर डोकं टाकलं,
“रती काय झालं मिटिंग मध्ये,
झाली सारी फॉरमॅलिटी, तुचं करणार लीड हा प्रोजेक्ट...? आपल्याला खूप मदत होईल ग
ह्याची.”
रतीने शांत उत्तर दिलं, “हो
कदाचित करणार आहे... खूप मोठी किंमत मोजावी लागली मला आज.”
“काय? म्हणजे ग.”
“काही नाही...“
“वेळच गेला ना, जावूदे ग,
तुझ्या ह्याच वेळेचा उत्तम उपयोग होईल आपल्याला. तो तुझा बॉस जसा म्हणतो ना तसं कर
काही वेळेसाठी, आपल्याल हवं ते मिळालं की दे सोडून.... आणि एकदा का माझा बिजनेस
सेट झाला कि मी कुठे तुला दुसरीकडे काम करायला देणार... अरे माझी येवढी टॅलेंटेड
बायको...”
“हुम्म.... कुठे रे, अजूनही
माणसं ओळखता येत नाहीत मला... आणि ह्या खेळात अजूनही नवीन गळी आहे मी....फसली
कदाचित.”
“आता कुणाला ओळखायचं आहे ग,
मला तर तू पार ओळखून आहेस... काय! फसलीस?” आणि तो तिच्या अधिकच जवळ आला, त्याच्या
श्वासाच्या आवाजात आणि त्या गर्मीत शहारणारी आज बैचेन झाली होती. तिच्या मनातून तो
मयूरचा भास जात नव्हता. पण राजेश तिला सोडत नव्हता. परत तेच होतं होत तिच्यासोबत,
एकाने नशेत तिला मिळवलं आणि एक आता नशेत आणत होता... त्याला काहीही साद न देता रती
पडून होती आणि राजेश तिच्यावर स्वतःला झोकून शांत झाला होता....”
राजेश निवांत झोपला पण रती मात्र विचारात जागीच होती, घरात येतांना तिने जॉब सोडण्याचा विचार केला होता...
आता रती पुढे काय करेल नक्की वाचा.... येत्या शुक्रवारी एक डाव तिचा....
पुढ काय होतं वाचूया पुढल्या भागात, लवकरच. एका स्त्रीच्या भावनेची कहाणी, एक डाव तिचा...
कथा कशी वाटली नक्की कळवा! कथा कॉर्पोरेट विश्वाची घाणेरडी बाजू दाखत उलगडल्या जाणार आहे. दीर्घ कथा आहे, निदान १० भागांची, तेव्हां आपला प्रतिसाद अनमोल आहे. प्रत्येक भागाच्या अपडेटसाठी आजचं पेजला लाईक करा. आठवड्यातून दोन दीर्घ भाग प्रकाशित होतील, बुधवारी आणि शुक्रवारी तेव्हां पेजला आवर्जून भेट द्या. प्रतिक्रिया नोंदवा आणि मनातल्या तळ्यात सहभागी व्हा!
नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!
https://www.facebook.com/manatlyatalyat
जोडीदार कथेचे भाग सर्व भाग इथे आहेत - कादंबरी कथा- जोडीदार... प्रवास तुझा माझा
पेजला लाईक करा
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव
फोटो साभार गुगल
©उर्मिला देवेन
Urmiladev@gmail.com
1 Comments
As usual best....waiting for Rati's befitting reply
ReplyDelete