“द बुमरेंग”… एक डाव तिचा.... भाग १ इथे वाचा -https://www.manatalyatalyat.com/2022/02/blog-post_21.html
राजेशच काम संपल होतं, रती विचार करत
तिथेच झोपली होती. राजेशने तिला उठवलं आणि दोघेही शेजारच्या मेसमधून पार्सल घेवून
घरी गेले. रतीला रात्रीही मयूर आठवत होता. आणि राजेश ढाराढूर झोपला होता. सकाळी
रती नेहमीप्रमाणे तयार झाली. स्लीव लेस सलवार आणि मस्तस मेचीन्ग केलं होतं तिने,
राजेश झोपेतच होता तर म्हणाला, “रती सुंदर दिसत आहेस ग, काय? काही खास आहे का आज?
राणीसाहेब एकदम तयार झालात.”
“अरे मी सांगायची विसरले, मोहिते
प्रोजेक्ट मी प्रेझेंट करत आहे.”
राजेश उठून बसला, डोळे चोळत म्हणाला,
“काय! आणि तू मला आता सागंतेस!”
“अरे काल तुचं माझ्याशी बोलत
नव्हतास, बिझी होतास... हेच तर सांगायचं होतं मला.”
“अरे कॉंगरॅट्स बायको, माझी बायकोच ग
तू. All द बेस्ट.”
“मग काय सोडून दे ना?”
“अरे स्वारी तयार आहे आपली. मी आता
तयार होतो.”
“आणि तू, तुला काही नाही का आज?”
“माझं काय ग, काही नाही, बसं बसेल
अजून काही टेंडर बघत. पण जाम खुश हा तुझ्यासाठी, रते तुचं लीड करायला हवसं ह्या
प्रोजेक्टला, अरे तुझा हा अनुभव खूप कामाचा असेल आपल्याला. मोहिते बिल्डरचं बरंच
काही माहित होईल ना? टेंडर निघतो त्यांचा दर वर्षी.”
रती हसली, “ते काही माहित नाही,
पेमेंट आणि प्रतिष्ठा वाढेल माझी, मी कॅरिअरला महत्व देणारी आहे पण तेवढी नाही रे.”
“अरे... माझी बायको आहेस! तू करच हे.
आणि करायलाच हवं. असा चान्स सोडायचा नसतो.”
रती राजेशच प्रोत्साहन बघून अजूनच
उत्साहात आली, स्वतः गुंतून आरश्यात बघत होती. राजेशच्या बोलण्याचा ओघ काही तिला
कळाला नव्हता.
वर्षभरात मोहिते बिल्डीग्सचा टेंडर
निघणार होता हे राजेशला माहित होतं, आणि
तो टेंडर मिळवण्यासाठी रतीचा हा प्रोजेक्ट महत्वाचा होता हे त्याला कळाल होतं. रतीचं
त्याला आता मदत करू शकते हे पूर्ण लक्षात आलं होतं. पटपट आवरून तो तयार झालं आणि
त्याने रतीला ऑफिस मध्ये सोडलं. तोही तसाच त्याच्या ऑफिस मध्ये आला आणि मोहिते
बिल्डरची वेबसाईट बघत पुढची प्लानिंग करत होता.
इकडे रती ऑफिस मध्ये पोहचली आणि तिने
तिचं काम संपवलं. नंतर ती मयूरच्या कॅबीन मध्ये लॅपटॉप घेवून
गेली. मयूरला ती दुरूनच दिसली होती, तसा तो तिचीच वाट बघत होता पण ती येत आहे हे
कळताच त्याने त्याचा फोन सुरु केला, आणि बोलत राहिला, रतीने इशाऱ्यात आत येवू का
विचारलं आणि मयूरने इशारयातच तिला आत बोलावलं, हात करत बसायला लावलं. आणि मयूर
बोलत राहिला. बोलून झाल्यावर तो रतीला म्हणाला, “येस मिस रती, काय काम होतं? सॉरी,
मी जरा बिझी होतो. आपण आता बोलू शकतो.”
रती गडबडली, “सर, ते मोहिते प्रोजेक्टच प्रेझेनटेशन...बघता ना?”
“अरे हो, विसरलो होतो मी, आपले एवढे प्रोजेक्ट सुरु आहेत, गोंधळून
जातो मी, हा, झालंय का तुझं सर्व? देन नो वरी... माझा विश्वास आहे तुझ्यावर. भेटू
आपण चार वाजता. माझी एक महत्वाची मिटिंग आहे आता, मी काही वेळ देवू शकत नाही.”
“सर, तुम्ही एकदा बघितलं तर कसं मला विश्वास येईल ना! म्हणजे माझी ही
पहिली वेळ आहे.”
मयूर तिच्याकडे बघत होता तर त्याला अजून एक कॉल आला, मिटिंग होती ऑनलाईन,
मयूर रतीला म्हणाला, “जॉईन विथ मी, तुला कळेल सर्व.”
रती गुमान मयूर सोबत त्याच्या कॅबीन मध्ये बसली. मयूरही मिटिंग मध्ये
व्यस्त होता. रती कधी त्याला बघत होती तर कधी स्वतः ला. मिटिंग संपली आणि मयूर
म्हणाला, “असं प्रेझेंट करायचं आहे तुला, आणि माझी खात्री आहे तू करशील.”
आता मयूर तिच्या अगदीच जवळ आला, त्याने तिच्या हातावर हात ठेवला,
“घाबरू नकोस, मी असणारं आहे त्या मिटिंग मध्ये. मी करेन काही गडबडल
तर मदत. तू बिनधास्त राहा.”
Ok सर
म्हणत तिने तिचा हात अलगत त्याच्या हाताखालून काढला आणि हसत ती त्याच्या कॅबीन
मधून तिच्या जागेवर गेली.
चार वाजेपर्यंत रती कुणाशीच बोलली नव्हती तिची ती तयार होतं होती.
मिटिंग जसं जशी जवळ येत होती ती मनातून घाबरत होती, तरीही मनाला घट्ट करत तयार
झाली. परत सुंदर मेकअप केला. मिटिंग रूम मध्ये पोहचली. प्रेझेनटेशन सेट केलं. सगळ
रेडी केलं. चार वाजून काही मिनट झाले आणि मयूर मोहिते बिल्डरच्या मॅनेजर सह आत
आला. रतीची ओळख करून दिली आणि तिला प्रोजेक्ट प्रेझेंट करायला लावला.
रतीने तिच्या पद्धतीने तो प्रेझेंट केला पण अनुभव कमी असल्याने ती
खूप काही बोलू शकली नाही आणि ती जागा मयूरने भरून काढिली, उत्तम रित्या पॉलिश करत
मयूरने मोहिते बिल्डरच्या मॅनेजर पूर्णपणे पटवून दिलं आणि प्रोजेक्ट साइन होणार
होता. रतीला मिटिंग रूम मध्ये ठेवून मयूर मॅनेजरसोबत त्याला बाहेर सोडायलाही गेला.
रती तिथेच बसून विचार करत होती आणि मयूर बद्दल खूप काही वाटतं होतं
तिला, तो खोलीत येताच ती म्हणाली, “सर
तुम्ही खरच ग्रेट आहात, मी तर गोधळली होते, खूप शिकायला मिळेल तुमच्या कडून.”
मयूर म्हणाला, “माझ्या
सोबत काम करणार आहेस, सगळं शिकशील. कॅबीन मध्ये ये. महत्वाच बोलायचं आहे.”
रती तिचा लॅपटॉप आवरत होती तर तिला तिच्या नवऱ्याचा राजेशचा फोन
आलेला, विचारात होता मिटिंग बद्दल, म्हणाला, “रती तुला ह्या प्रोजेक्टला लीड
करायचं आहे. हा प्रोजेक्ट तुचं करणार आहेस. तुझा बॉस काय म्हणतो ते पूर्ण ऐक आणि
तसं कर, मोहिते बिल्डरचा प्रोजेक्ट हाताळणं म्हणजे काही कमी नाही... आणि तू करू
शकतेस.”
मग जरा हळवा होतं म्हणाला, “रते, मला मदत होईल त्याची, मोहिते
बिल्डरच पुढचं टेंडर निघण्याआधी काही माहिती मिळाली तर... म्हणून तू हा प्रोजेक्ट
जावू देता कामा नये.”
रतीने होकार दिला आणि प्रोमीस करून तिने फोन ठेवला. खोलीच्या बाहेर
आली तर ऑफिस मध्ये सर्वांना माहित झालं होतं कि रती मोहिते प्रोजेक्ट लीड करणार
आहे म्हणून. सर्व तिला अभिनंदन देत होते. तीही भारावून गेली होती. सर्वाना धन्यवाद
देत ती मयूरच्या कॅबीन मध्ये गेली. मयूर अजूनही बिझी होता, तिला बघताच त्याने
त्याचा लॅपटॉप बंद केला आणि तिला आत घेतलं,
“वॉव रती, तू करून दाखवलस. ग्रेट, यस!!!”
“सर मी... तुम्ही मदत केली मला.”
“मग आता तू कर...”
“म्हणजे?”
“म्हणजे काही नाही, मेहनत कर... आज काही काम आहे, मी सहा नंतर बोलतो
तुला, थांबणार आहेस ना? प्रोजेक्ट लीड करायचा आहे ना तुला? काही फॉर्मेलिटी आहेत. करूया सहा
नंतर आपण दोघे.”
रती पटकन म्हणाली, “हो सर. मी थांबते.” ती आनंदात खोलीतून बाहेर आली.
रतीने तिच्या जागेवर आल्या आल्या राजेशला फोन करून सर्व सांगितलं,
तोही जाम खुश होता. आज तो तिला घ्यायला येणारं होता. रती त्याला म्हणाली,
“अरे प्रोजेक्टच्या काही फॉर्मेलिटी सायीन करायच्या आहेत, मी माझं
काम झालं कि कॉल करते तुला, मग तू ये, उगाच इथे युवून काय करशील?”
रती आणि राजेश खुश होते. रती तिच्या पुढच्या तयारीला लागली, सहा
वाजायला आले होते, जयू परत तिच्या जवळ आली, “रती आजपण थांबणार आहे का ग.?”
रती अवघडत म्हणाली, “हो
ग, पण राजेश येतोय मला घ्यायला आज. तू हो पुढे”.
जयू काहीही न बोलता निघून गेली. तिच्या नजरेत चिंता होती पण तिने
बोलून दाखवली नव्हती.
जवळजवळ सगळाच स्टाफ निघून गेला होता. रती एकटीच कॅबीन मध्ये होती.
तोच तिचा फोन वाजला, मयुरने फोन करून तिला कॅबीन मध्ये बोलावलं होतं.
पुढ काय होतं वाचूया पुढल्या भागात, लवकरच. एका स्त्रीच्या भावनेची
कहाणी, एक डाव तिचा...
कथा कशी वाटली नक्की कळवा! कथा कॉर्पोरेट विश्वाची घाणेरडी बाजू दाखत उलगडल्या जाणार आहे. दीर्घ कथा आहे, निदान १० भागांची, तेव्हां आपला प्रतिसाद अनमोल आहे. प्रत्येक भागाच्या अपडेटसाठी आजचं पेजला लाईक करा. आठवड्यातून दोन दीर्घ भाग प्रकाशित होतील, बुधवारी आणि शुक्रवारी तेव्हां [पेजला आवर्जून भेट द्या. प्रतिक्रिया नोंदवा आणि मनातल्या तळ्यात सहभागी व्हा!
नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!
https://www.facebook.com/manatlyatalyat
जोडीदार कथेचे भाग सर्व भाग इथे आहेत - कादंबरी कथा- जोडीदार... प्रवास तुझा माझा
पेजला लाईक करा
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव
फोटो साभार गुगल
©उर्मिला देवेन
Urmiladev@gmail.com
0 Comments