मी परफेक्ट सुनबाई तर नाहीच!

 


कुंदा मामीने फॅमिली ग्रुपवर फोटो टाकले होते. मीही आवर्जून बघितले, सुंदर फोटो होते साऱ्यांचे. बऱ्याच दिवसाने आपल्या लोकांना बघून मस्त वाटतं होतं. साऱ्यांचे फोटोत कसे मस्त वाटत होते. सानिका कुंदा मामीची सून निस्तेज दिसली मला. तिचा लग्नातला चेहरा समोर आला. वाटलं बऱ नसेल नहीतर काही अजून. दनादन कुंदा मामीला कॉम्मेंट देवून मी मोकळी झाली.

दोन दिवसाआधी सासूबाईला फोन केला, सहज विचारलं,

“काय हो आई, आपल्या मामीची सुनबाई काय म्हणते. फोटो बघितले मी ग्रुपवर, सर्वांसोबत तिचे. मुलगाही मस्त दिसला. कुंदा ताई तर खूप आनंदी वाटत होत्या.”

काय उत्तर मिळालं, मी तर कधी विचारही करू शकत नाही,

“काय तर, सून असावी तर अशी. कुंदा मामीने खूप पुण्य केलं असेल म्हणून त्यांना अशी सून मिळाली. सानिका अगदीच गुणी मुलगी आहे. कुंदाला तर मुलगी मिळाली सुनेच्या रुपात.”

माझी तर बोलतीच बंद झाली होती. काय बोलणार होते. सार काही करून, म्हणजे नियमित सासूला फोन करते. चौकशी करते. नवरा मुलं खूप  खुश आहेत आणि अजून काय असतं हे तर मला कळलचं नाही.

मीही उत्तर दिलं, “आई, मामीपण किती गोड स्वभावाच्या आहेत. मग सानिका असणारच ना.?”

समोरून मोठासा हुस्कारा आला, आणि पटकन विषय बदलल्या गेला, “काय करते माझी नातं.”

“अभ्यास करते, सांगते तिला बोलायला नंतर.” म्हणत मी फोन ठेवला.

नंतर बऱ्याच दिवसांनी सहज चुलत सासूला भेटले, तिथेही तसचं होतं,  भेटताच त्यांनी सुरु केलं,

“कुंदा मामीची सून म्हणजे अगदीच लाखात एक सुनबाई ग. सून असावी तर अशी. तिच्यात आणि कुंदा मामित आजपर्यंत कधीच साध भांडण झालं नाही. आणि माझ्या नशिबी, सुनेला हे बोला तर ती ते करणार, नुसती फिरत असते. म्हणे सर्व मॅनेज करावं लागते. काही सांगतहि नाही.”

“अहो काकू खूप कामं असतात आणि तुम्हाला जमणार काय सर्व मुलांचं करायला? खूप मनमिळावू आहे तुमची सून. काहीही अगदीच न किरकिर करता करते ती.”

“हुम्म, येतेच काय तिला, सून कशी घरात सुनबाई म्हणून राहायला हवी. ती कुठे घरीच राहत नाही. काही म्हटलं तर समजावत बसते आणि मग माझा मुलगाही तिची बाजू घेतो. वाईट तर बाई मीचं ठरते.”

“अहो काकू पण तुमच्या मुलाला काही त्रास आहे का? आणि ती कधीच बोलली नाही कुणाला तुमच्याबद्दलंहि, तुमची तर फार काळजी करते ती.”

“हो ग, नुसता कोरडेपणा तिचा, हुम्म, माझ्या कुठे नशिबात कुंदा ताई सारखं सूख. तिची सून एक शब्द मोठ्याने बोलत नाही तिच्यासमोर. स्वयपाक, घर, कसं आवरून असते तिचं, आणि हिचा नुसता पसारा, आम्ही काय सून, बायको, आई होतोच नाही. तुला सांगू कधी सासूच्या पुढे जावून काहीच केलं नाही.”

मी उत्तर दिलं नाही तर मलाच टोमणा मारला, “कुणाशी बोलते मी. तुही त्यातलीच.”

मी न ऐकल्या सारखं केलं आणि निघाले.

आता मात्र मनात राहून राहून सानिका भेटायचं होतं. लग्नात भेटले होते तेवढच. सुंदर, मनमिळावू, शांत  वाटली होती. मध्ये एक दोन लग्नात जरा दिसली होती पण खूप काही बोलण्याचा योग आला नव्हता.

नंतर कळालच कि नात्यात बारसं आहे म्हणून, हायसं झालं, सानिकाच्या चुलत जाऊबाईच्या मुलीचं होतं, मग सानिका येणार हे नक्कीच होतं ना, चला भेटून, भेद घेवूया ह्या विचारात मी होते.

सह कुटुंब गेलेलो, पण माझी नजर सानिकाला शोधत होती, खूप वेळा झाला, नावं हि ठेवल्या गेलं पण सानिका काही दिसली नाही, शेवटी राहवलं नाही मी कुंदा मामीला विचारलं,

“मामी सानिका आली नाही काय हो.

तिने पटकन उत्तर दिलं,

“तीला घरचे कामं आहेत ग, आणि तिला असं आवडतं नाही यायला. घरचे मोठे आले ना, तिला समाधान आहे बघ त्यात.”

माझ्या तर डोक्याला मुग्या लागल्या होत्या. असं कुणी असणारं काय कि भेटण्यासाठीहि येणार नाही, मला तर तीच पागल वाटली होती. कार्यक्रम जरा आवरत आला होता, मी बायकांच्या घोळक्यात येवून बसले,

सहज शालिनीला म्हणाले, “काय ग तुझी जाऊ सानिका नाही आली. तिला काय वेगळ आमंत्रण लागतं.”

ती माझ्या जवळ येवून बसली, “अहो ताई, येवूच दिलं नसणार, आणि तिच्या तोंडात तर आवाजच नाही. काहीच बोलत नाही. मला तर किव येते तिची.”

“अग पण मी तर ऐकलं आहे कि ती खूपच उत्तम सुनबाई आहे. आणि परफेक्ट आहे सुनबाईच्या चौकटीत, काय गुणगान एकले आहे म्हणून सांगू.”

“काय तुम्ही, कुणी सांगितले. जरा एकदा भेटा तिला. कळेल, परफेक्ट सुनबाई म्हणजे काय असते ते. “

“माझी सासू, तुझी सासू तर सतत गुणगान गात असेत तिचं. म्हणजे काय ग, ती कुठेच जात बित नाही का?

“जाते ना, जिथे सासू नेईल तिथे, आणि गुमान गप्प असते. कुणाशी मनमोकळे पणाने बोलत नाही, नुसती स्मित हसते आणि गुमान जे सांगाल ते कामं करत असते, जराही नकार देत नाही. बघ ना आज सकाळी तिला बोलावलं होतं मी मदतीला पण नाही पाठवलं असणारं ना कुंदा काकीने. सकाळपासून आली असती तर बायकांमध्ये राहिली असती ना मग ह्याच सांग त्याचं सांग झालं असतं....नाही पाठवलं असणारं.

म्हणे परफेक्ट सुनबाई, काय ग उत्तम स्वयपाक करते, घर नीट आवरते, सर्वांची काळजी घेते आणि सदा घरात राहते ती, कुंदा काकीचे तर पाय वैगेरे पण चेपून देते ती, त्यांना झोप येईपर्यंत, म्हणजे गरज पडली तर करावं ग, आपणही करतोच कि पण नियामनुसार सांर कसं जमायचं, कधी आपलाही वेळ असतो ना, बिचारी फक्त ती स्वतः जगत नाही. अजून काय बोलू मी. तिच्याशी बोलायला जाशील तर कुंदा काकी तुला बोलूही द्यायची नाही. आणि सानिकाच गुणगान गात राहिलं, माझी सून लाखात ऐक आहे म्हणतात त्या पण काय फायदा.?”

आता माझ्या डोक्यातल्या मुंग्या चावायला लागल्या होत्या, नवऱ्याचा विचार आला,

“पण नवरा काहीच बोलत नाही काय ग?”

“काय बोलणार त्याला जे हव ते मिळतं, आणि आई जसं म्हणेल तसं... “

“अरे देवा... नको रे बाबा! आपण तर बसतच नाही ह्या परफेक्ट सुनबाईच्या चौकटीत, अशीच सून हवी असते साऱ्यांना, म्हणूनच परफेक्ट सुनबाई लाखात ऐकच असते.”

सर्व हसायला लागल्या होत्या. पण मनात सर्वांच्या खंत होती सानिकासाठी.... ती बोलणार नाही तर तिच्या साठी कोण काय करू शकणार होतं, सुनबाईच्या साच्यात फीट बसतात बसता ती जगणं विसरली होती. आणि स्वतःसाठी जराही न जगणारी सुनबाई हवीच असते की.”

माझ्या मनातून मात्र कुंदा मामी उतरली होती. मनाला खूप बऱ वाटलं होतं, आपण परफेक्ट सुनबाई नाहीच पण काहीच सल नव्हती, सर्वांनांच सुनबाई त्यांच्या चौकटीत हवी असते, हे आपल्यावर आहे कि कधी आणि कशी ती चौकट मोडायची.... वेळ पडली तर सासू सासऱ्यांची सेवा करावीच, त्याचं ऐकावंहि पण नंदीबैल होणं मला नाही जमणार. माझं म्हणालं तर मी परफेक्ट सुनबाई तर नाहीच आणि त्याची मला ग्लानी नाही...

काय मैत्रिणिनो तुम्हाला ह्या परफेक्ट सुनबाईच्या चौकटीत बसायचं असेल तर खुशाल बसा पण तोडाही त्या चौकटीला वेळोवेळी.... परफेक्ट सुनबाईची चौकात कधीच जराही फाकत त्याला स्वतःच जोर लावून तडा द्यावा लागतो.... मी तो केव्हांच दिलाय... आणि आता मी परफेक्ट सुनबाई तर नाहीच पण माझ्या सासूची सून मात्र अखंड असेल....

 

कथा कशी वाटली नक्की कळवा!

नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!

 https://www.facebook.com/manatlyatalyat


जोडीदार कथेचे भाग सर्व भाग इथे आहेत - कादंबरी कथा- जोडीदार... प्रवास तुझा माझा 

https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE?&max-results=8

पेजला लाईक करा 

कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

Urmiladev@gmail.com


 

 

Post a Comment

0 Comments