हक्क तिलाही आहे विचारण्याचा... क्रॉस करण्याचा!

 हक्क तिलाही आहे विचारण्याचा... क्रॉस करण्याचा!



“Are you virgin?”

काय?

मी विचारतोय तू virgin आहे का?

शशांक हळूच शालिनीला विचारात होता, आज ते दोघेच साखरपुड्या आधी भेटले होते ते एकमेकांना ओळखण्यासाठी, आवडी निवडी जाणून घेण्यासाठी. आणि बोलता बोलता शशांकने शालिनीला  हळूच प्रश्न केला.

शालिनी MBA झालेली, नौकरी करणारी, शाशंकसाठी हवं तसं स्थळ त्याच्या घरच्यांनी शोधलं होतं. पण शाशंकच्या हाय प्रश्नाने शालिनी रागाने लाल झाली होती.

ती ताडकन उठली, “ये समजतोय काय रे स्वतःला, मला काय इथे हे विचारायला बोलावलंस.”

शाशंक तिला शांत करत म्हणाला, “म्हणजे विचारायला नको का? तू नौकरी करतेस. बाहेरगावी visit ला जातेस. मित्रही खूप असतील तुला, मी बसं चौकशी करतोय. अजून काय!”

“हो का! तुलाही मैत्रिणी असतील ना? ड्रिंक्स घेतोस, पार्ट्या करतोस. आताच बोललास तुझं प्रेम होतं म्हणून एका मुलीवर. तू दे ना पुरावा तुझ्या virginity चा?.”

“शालिनी!! हिंमत कशी झाली तुझी!! तो माझा व्यक्तीक प्रश्न आहे.”

“असं!”

आता शालिनीने स्वतः ची bag उचलली, पाचशे रुपये टेबलवर ठेवले. आणि ती ओरडत म्हणाली,

“मला तुझ्यात काहीच इंटेररेस्ट नाही. लग्न मोडलं. तू virgin नाहीस मग मला का विचरतो. कॉफीचे चार्जेस दिलेत मी बाकी ठेव तू. तुला कामी येतील, मुली फिरवतांना, नाहीतर...”

तो जरा भडकला, सर्वांनसमोर शालीनिने असं त्याच्यावर ओरडून बोललेलं त्याला अजिबात आवडलं नव्हतं, त्याने तिचा हात पकडला,

“ये, मर्यादा सोडून बोलू नकोस. समजतेस काय ग स्वतः ला! तुझ्या सारख्या छप्पन भेटतील मला. मला विचारतेस.“

मग जा ना त्या छप्पन जानिनंकडे, माझा का हात धरलास? सोड. तू मर्यादा ओलांडू नकोस, तुझी काय बायको नाही झाले मी. ना प्रियासी आहे...”

म्हणत तिने तिचा हात झटकून मोकळा केला. आणि ती निघून गेली. शशांक रागात बघत राहिला, त्याने लगेच आईला फोन करून शालिनीसोबत जुड्लेल लग्न मोडलं, आईने कारण विचरलं तर तो म्हणाला,

“ती माझ्या type ची नाही. उद्धट वाटली.”

त्याच्या आईलाही खूप कळाल नाही, खोदून विचारत होती तर शशांक चिडला, तर तिचं म्हणाली,

“जावूदे, मुलींची काय कमी आहे. ह्या वर्षी लग्न करायचंच आहे.”

शालिनी घरी येईपर्यंत लग्न मोडल्याची वार्ता घरी आली होती, घरच्यांनी विचरलं तर, तिने शांत पाने उत्तर दिलं,

“बाबा शाशंकच्या खूप अपेक्षा आहेत. मला नाही जमणार. तुम्ही दुसरं स्थळ बघा.”

शालिनीने मनातून शाशंकचा विचार काढून टाकला. तिचा विश्वास होताच कि सारेच पुरुष शाशंक सारखे नसतात. तिलाही तिचा जोडीदार नक्कीच मिळेल. पण शशांक तिला पहिल्या नजरेत आवडला होता तिला पण त्याचं असं तिच्यावर प्रश्न करणं अजिबात आवडलं नव्हतं.

शशांक मात्र मनातून शालिनीच्या प्रश्नाने चिडला होता. त्याच मन त्याला खात होतं. दोन दिवस तो सतत विचारत होता, खर तर नंतर त्याला तिचा तो प्रश्न योग्य वाटत होता, तिलाही अधिकार होताच ना विचारण्याचा. शालिनी सारखी मुलगी त्याला मिळणे कठीण होतं, बघायला सुंदर, शिकलेली, नौकरी करणारी पण... तो एक प्रश्न...आणि तिचं त्याला क्रॉस करणं....झोंबल होतं. आणि आरसा दाखवून गेलं होतं.

दोन दिवसांनी अचानक त्याला शालिनी त्याला रेस्टोरेंट मध्ये दिसली. तिच्या कलाइन्ट सोबत ती होती. शाशंक तिला बघताच आधी लपला पण नंतर तो समोर आला, प्याला होता. त्यातच तो तिच्या समोर येवून म्हणाला,

शालिनी बोलायचं आहे मला.

शालिनीला नको तो तमाशा हवाच नव्हता मग तिने कलाइन्टशी हसत निरोप घेतला आणि शाशंकला बसायला सांगितलं. शशांक बसला, आणि बोलायला लागला, त्याचे सर्व प्रेम प्रकरण त्याने बोलून दाखवले, आणि तो virgin कसा नाही हे ही तो बोलला, शेवटी म्हणाला,

तुझ्या त्या प्रश्नाने मी आतून बाहेरून हादरलोय. मी हा प्रश्न आतापर्यंत बघायला गेलेल्या मुलींना विचाराला आणि त्यांनी नकार दिला. पण असा उलट प्रश्न मला कुणीच केला नाही, तू मला क्रॉस केलंस, तुझ्या हिम्म्तीची दाद देतो मी पण तुझ्या प्रश्नाने आरसा दिसला मला. हो मी नाही आहे virgin मग तुला का विचारतोय ह्या प्रश्नाने मी पुरता माझ्या मनात पडलो. पण आज मान्य करतोय मी नाही virgin आता तू म्हणशील तसं.”

“मी काय म्हणू, नकार तर तू कळवलाय.”

“म्हणजे तू काहीच बोलली नाहीस घरी.”

“बोलले ना, तुझ्या अपेक्षा जास्त आहेत म्हणून.”

“बसं!”
मग काय हे सांगायला हवं होतं. आणि त्याने काही प्रश्न सुटला नसता ना, मुद्दा तुझ्या माझ्या विचारांचा होता, त्यांनी मधात पडून काय.? आणि त्यांनी माझा दाखला का द्यावा, मी समर्थ आहे उत्तर द्यायला. तसा तुही हवा, काय? लग्न आपल्याला करायचं होतं. ते तर मध्यस्ती नुसते.”

तोच शशांकचा फोन वाजला, त्याच्या आईने मुलीचा फोटो आणि पत्ता पाठवला होता. आणि ती फोनवर त्याला सूचना देत होती. शालिनी निघते म्हणून बाय करत होतीच तर शाशंकने तिचा हात पकडला, शालिनी थांब ना, अजून आपण बोललो नाहीत.”

तोच आई म्हणाली, शाशंक तू शालिनी सोबत आहेत? अरे तू तर बोलला होता ना ती उद्धट आहे म्हणून, तुला लग्न करायचं नाही तिच्याशी. मग हे काय?”

“आई ते मी नंतर सांगतो, आधी मला तिच्याशी बोलायचं आहे.”

शाशंकने फोन ठेवला आणि तो शालिनीला बसायला सांगत होता, तोच शालिनी म्हणाली, “तू प्यायला आहेस. जेव्हा शुद्धीवर असशील ना तेव्हा बोलू आपण. आणि ती निघून गेली.”

शाशंक परत गप्पच झाला, हसला, मनात म्हणाला, “मी लग्न हिच्याशीच करणार, काय मुलगी आहे यार, मला नाक्कीच सांभाळेल ही... आणि क्रॉस करण्याचा अधिकार बायकोला असावाच, तेव्हाच समोरची बाजू दिसते, मार्ग उघडतात. यस! मला हिच्याशीच लग्न करायचं आहे.”

पुढचे दोन दिवस शाशंक शालिनीला फोन करत राहिला. पण शालिनी कामात बिझी होती. शेवटी त्याने तिचं ऑफिस गाठलं, स्वतःची चूक कबूल केली, म्हणाला, “तुझा प्रश्न चुकीचा नव्हता, मानसिकता माझी नव्हती ती स्वीकारण्याची. पण आता आहे. तुलाही हक्क आहे तो प्रश्न करण्याचा. मी माझं उत्तर दिलं आहे. आणि तुझ्या उत्तराची वाट बघतोय. लग्न करशील माझ्याशी.”

शालिनी हसली, म्हणाली, “विचार करते. कळवते तुला निर्णय.”

शशांक, “मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची.”

नंतर शालिनीने शाशंकची सहन शीलता बघण्यासाठी काही दिवस काहीच उत्तर दिलं नाही पण बोलणं होतं असायचं. आणि एक दिवस शाशंकच्या आईने शाशंकला बातमी दिली, येत्या रविवारी त्याचा शालीनिशी साखरपुडा ठरल्याची.

काय बरोबर ना, आपली मानसिकताच नसते हे समजून घेण्याची कि तिलाही हक्क आहे हा प्रश्न विचारण्याचा... नाहीका? मुळात हा प्रश्नच नको, पण आला तर तिलाही हक्क आहे क्रॉस करण्याचा.


कथा कशी वाटली नक्की कळवा. आणि पुढच्या कथेसाठी पेजला नक्की लाईक करा  https://www.facebook.com/manatlyatalyat

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन


Post a Comment

0 Comments