...आता मी "नाही" म्हणायला शिकले!

 



दिवाळीचा सण जवळ होता, मला खूप काम होती, कामाचं लोड खुप होत, सगळं मलाच करायचं होत. दिवाळीचा फराळ, खरेदी, घर सजावट सगळं प्रत्येकाच्या आवडी निवडी जपून मॅनेज करणं सोपं नव्हतंच. सगळंच नीट व्हायला पाहिजे असच वाटत होत. सासरे म्हणाले मला खुशखुशीत चकल्या हव्यात. सासू म्हणाली शुगर फ्री काहीतरी बनव. मुलांचा धिंगाणा घरात चालूच होता.

मी स्वतःच आवरून, लगेच कामाला लागली, प्रत्येकाची फर्माईश पूर्ण करता करता मला दुपारचे ३ वाजले. सासूबाईंच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या, सासूबाईशी गप्पा करायला. त्यानी चहा आणि नाश्त्याचं बनवायला सांगितलं. मी ते घेऊन बाहेर आली, सगळे मला पाहून जरा दचकलेच, सासूबाई कानात येऊन म्हणाल्या "तुझी ओढणी कुठे आहे आणि जरा आवरून यायचं ना बाहेर".

मला माझीच लाज वाटली मी लगेच आत निघून गेली. संध्याकाळी मला ह्यांच्या सोबत शॉपिंग साठी जायचं होत. हे आल्या आल्या ओरडू लागले "किती वेळ लागणार आहे तुला, माझ्याकडे वेळ नाही", मी कशीबशी तयार झाली आणि बाहेर आली तर कळलं कि ते शॉपिंगसाठी त्यांच्या आईला घेऊन गेले. मला वाईट वाटलंच पण स्वतःला घर आवरण्यात बिझी करून घेतलं. लक्ष्मी पूजनाचा दिवस उजळला, माझा फराळ तयार होता, सगळं घर चकचकीत होत. मुलंही आनंदात होते. सगळे पूजेच्या तयारीला लागले होते. मीही तयार व्हायला गेले, माझी साडी काढली, तर आठवलं कि मी तिला फॉल पिकोला टाकलीस नव्हती, जुनीच साडी नेसायला घेतली, 

दागिने बघितले तर मंगळसुत्रचा एक पदर तुटलेला होता, गडबडीत सोनाराकडे न्यायला विसरली होती. माझी कुठलीच वस्तू जागेवर नव्हती. कशीबशी तयार होऊन, पूजेसाठी बसायला आले तर नणंद आणि जावई आधीच पूजेत बसलेले. 

मी सारखी किचन मध्ये ये-जा करत होती, कुणी काही मागत होत, तर कुणी काही. धड बसायलाही भेटलं नाही. फार थकली होती, जरा बसली तर पतीदेव ओरडले, 

 "जा, आईला मदत कर दिवे घरात लावायला, तुला कळत नाही का घरच्या लक्ष्मीचं काम आहे ते"

दोन दिवसांनी भाऊ आणि वाहिनी भेटायला आले, वहिनीला मिठी मारली, ती कानात हळूच बोलली, 

"हे काय करून ठेवलंय स्वतःच, भर दिवाळीत तू का अशी दिसतंय?. सगळं ठीक आहे ना?"

दोन आपुलकीचे शब्द एकल्याबरोबर मी ढसाढसा रडायला लागली ... आणि रडतच झोपीतून उठली, बघते तर काय मी माझ्या बेडवर होते. ते एक स्वप्न होत...

 पण बरच काही बोलून गेलं, मला झोप तर लागलीच नाही, पण ठरवलं कि आत्ता प्रत्येक गोष्टीला 'हो' म्हणायचं नाही, हो म्हणून स्वतःची फरफड करून घ्याची नाही, ह्या दिवाळीने मला माझ्यातल्या मीचि जाणीव करून दिली,  मीच का करू सर्व काम, घर काय माझं एकटीच आहे? 'नाही' म्हणण्यात काय वाईट आहे. फार फार तर काय, हिला काही येत नाही असच म्हणतील ना, म्हणू देत, मला कुठे सासरचे कितीही मेहनत घेतली तरी उत्तम म्हणणार आहेत.

सकाळी उठली तेव्हा, मी स्वतःलाच बदलेली वाटली. स्वप्नातल्या सारखंच सर्वांचं डिमांड ढेवणं सुरु झालं, सासू म्हणाली एखादा शुगर फ्री पदार्थ बनव.

मी म्हटलं "तुम्हाला नाही खायचं तर नका खाऊ, मला साधेच गोड पदार्थ बनवता येतात, आणि नवीन काही एक्सपेरिमेंट करून, तुम्हाला मला आजारी करायचं नाही." 

त्याही हसल्या आणि मीच काहीतरी मार्केट मधून घेऊन येईल असं बोलल्या. सासऱ्यांना चकलीची भारी आवड, मला आधीच माहित होत कि ते चकली बनविण्यात नेहमीच सासूची मदत करायचे. 

मी म्हटलं, "तुम्ही शिकवणार असाल तर आपल्या चकल्या खुशखुशीत होतील."

 हे एकल्यावर सासऱ्यांना खुपच बरं वाटलं त्यानीं लगेच होकार दिला आणि सामान आणण्यासाठी हौशीने निघून गेले. मुलांनाच आकाश दिवा बनवायला सांगितला, उलट बजावलं घर घाणेरडं केलं तर काहीही घेऊन देणार नाही.

माझ्यातला बदल नवऱ्याला जाणवला होता. ते घरातून बाहेर जात होते, तेव्हाच मी त्यांच्या हातात माझी नवीन साडी दिली आणि म्हटलं, "त्या कॉर्नरच्या पिको फॉलच्या दुकानात देऊन या."

दुपारी सासू बाहेर निघाली होती, मी त्यांना म्हटलं 

"माझे दागिने जरा सोनाराकडे द्या ना, तुमच्या ओळखीचा आहे ना तो सोनार. मला त्यातलं काहीच समजत नाही".

 सगळे आपल्या आपल्या मार्गी लागले होते. मी आनंदात किचन मध्ये पाय ठेवला. स्वतःच्या आवडीचे बेसनाचे लाडू बनवले आणि खमंग चिवडा. चकली सासऱ्यांनसोबत करायची म्हणून सामान बाजूला काढून ठेवलं. कामवाल्या बाईने घरगुती फराळाचा छोटासा उद्योक सुरु केला होता, तिला थोडी माझ्याकडून मदत म्हणून करंज्या आणि अनारसे बनवायला सांगितले, जे बनवंतांनी मला फार वेळ लागतो. आता माझ्याकडे भरपूर वेळ होता. रूम मध्ये गेले निवांत बसून मोबाईल मधून सर्वाना दिवाळीच्या शुभेच्या दिल्या. मन फ्रेश झालं.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी भारी भक्कम स्वयंपाकाचा बेत हि केला नाही, वेळ लागणारे पदार्थ टाळत अगदीच सोपा स्वयंपाक केला. सासूने खटकलं मला, पण मीही म्हटलं, 

"काय आई, फराळाचे पदार्थ खाऊन पोट खराब होईल आपलं म्हणून साधाच केलाय. आणि आपण काय कधीही आवडल ते बनवतोच ना". 

मला तयारीला भरपूर वेळ भेटला, छान तयार झाले आणि खाली पूजेच्या ठिकाणी आले. मला सगळे बघतच राहिले, चला घरची लक्ष्मी आली आता, सगळे पूजेला बसा असं म्हणतच सासऱ्यांनी सर्वाना पूजेला बसायला सांगितलं. मीही माझा मान सोडला नाही, ह्यांचा हात धरून पूजेत बसली. पूजा संपली आणि सगळे आपल्या आपल्या कामाला निघाले, मुलं आजोबांनं सोबत फटाके फोडायला गेले. सासूबाई पणत्या सगळीकडे ठेवायला गेल्या. आम्ही दोघंच हॉल मध्ये होतो. ह्यांनी काही म्हणायच्या आताच मी म्हटलं, 

 "तुच्या आईला मस्त जमत ना पणत्या सजवणं", 

 तेही हसले आणि आम्ही दोघेही आमच्या खोलीत निघून आलो.

दुसऱ्या दिवशी, सगळे फराळ खात असतांनाच मी माझी छोटीशी बॅग घेऊन खाली आले आणि ह्यांना म्हटलं 

"तुम्ही माहेरी सोडून देता, कि मी टॅक्सी बोलवू. मी जरा आई कडे जावून येते, रात्री पर्यंत येईल." 

सासू ने काही बोलण्याआधी मीच म्हटलं 

"तुम्ही तुमच्या लेकीसोबत दिवस घालवा, माझी लुडबुड कशाला, मी जावून येते." 

तिनेही हसतच हो जावून ये म्हटलं, तेवढ्यात सासरे ह्यांना म्हणाले, 

"घरी गाडी असतांना सुनबाई टॅक्सिने माहेरी जाणार का? तू पण जा सोबत, अंधार होण्याआधी घरी परत या." 

मला अजून काय हवं होत मी कितीही म्हटलं असत तरी हे तयार झाले नसतेच माझ्यासोबत यायला पण आत्ता वडिलांचा शब्द नाही मोडू शकले.

एवढ्या वर्षानंतर मला चक्क लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्याच दिवशी माहेरी जोडीने बघून आईला आनंदही झाला आणि आश्चर्यहि. वाहिनी मला म्हणाली, "हा एवढा मोठा चमत्कार झाला कसा? "

मी मनातल्या मनात हसत म्हटलं "तो चमत्कार माझ्यात झालाय "

मी आता मुळीच टेन्शन घेत नाही आणि मुख्य म्हणजे मी "नाही" बोलायला शिकली आहे, हो म्हणून फसण्यापेक्षा नाही म्हणून मोकळं व्हायचं. नको त्या गोष्टीच टेन्शन घेऊन स्वतःलाच त्रास करून घेण्यात काय अर्थ. हि दिवाळी माझ्यासाठी लखलकीत आणि मला प्रकाशमय करणारी होती.

स्वतःच अस्तित्व कसं जपायचं, हे आपल्याच हातात असतं. मग तुम्हीही नाही म्हणायला सुरवात कराच, वेडे बनून पेढे खाण्यात मज्जा असते.


लेख आवडला असेल तर माझ्या नवीन लेखासाठी माझ्या पेजला like किंवा फॉलो करा
तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोसाहन देतील. https://www.facebook.com/manatlyatalyat

पेजला लाईक करा आणि tele group ला जॉईन व्हा...

tele group लिंक- https://t.me/manatalyatalyat


©️उर्मिला देवेन

धन्यवाद! 🙏🙏

फोटो साभार गुगल

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

जोडीदार तू माझा कथेच दुसरं पर्व सुरु झालं आहे तेव्हा नक्की वाचा -https://www.manatalyatalyat.com/2021/11/blog-post.html


मधुचंद्राची रात्र चा तिसरा भाग प्रकाशित झाला आहे नक्की बघा ... कथा अंतिम चरणात लवकरच येत आहे 




Post a Comment

0 Comments