जेव्हा ex परत येतो...भाग ६

 


जेव्हा ex परत येतो...भाग ५ इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/10/ex.html

गाडी वळवताच अरुंधती समोर वेगाने चित्र धावू लागलं. त्या रात्री माधव अरुंधतीला भेटायला आलेला होता. गाडी अरुंधतीच्या माहेरी येवून थांबली, आणि माधव जोशात अरुंधतीच्या खोलीकडे वळला,

“अरु, आहेस कुठे,? इथे माझ्या आयुष्याची माती करून गुमान आरामात आहेस इथे. तुला माहित आहे का समाधान निवासात आता नुसता कोलाहल माजला आहे. आई राहिली नाही, बाबा कुणाशीच बोलत नाही आहेत. तू तू, तुझ्या मुळे झालं हे सांर... स्वतःवर लक्ष देता येत नव्हतं का...? आता काय तुझी डॉक्टरी कामात यायला नको होती?”

“माधव ऐकून तर घे. मी येत घरी, मी सांभाळते ना सर्व. मलाही वाईट वाटत आहे रे, आई..आई तर ...”

“असं, तुला वाईट वाटत आहे, अरे तुला तर नकोच होतं ना बाळ... जा आता कर खुशाल तुझं ते मेडीकल... माझ्या बाळाला तर वाचवू शकली नाही... लोकांना वाचवणार म्हणे...”

“माधव आपण बोलू ना नंतर.. तू आधी शांत हो, आपल्या घरी चल”.

“आपल्या... तू येणारं नाही आहेस. मला तू इथे नकोस, तू शिरलीस आणि सांर सांर समाधान निघून गेलं समाधान निवासातून...आता तुझा पायही नको तिथे...” आणि त्याने सोडचिठ्ठीचे कागद अरुंधतीवर फेकले.

“माझ्या घरात तू अजिबात पाहिजे नाही आता... आणि हे बघ तुझ्या डॉक्टरनेहे रिपोर्ट्स दिलेत, तू तू ... आता कधीच आई होवू शकणार नाहीस... आणि आणि ... माझा आणि तुझा संबंध तुटला आता.

“माधव काय बोलत आहेस तू... माझं प्रेम आहे तुझ्यावर... आणि... तू राहू शकतोस माझ्याशिवाय?

“प्रेम... कळतंय का तुला...अरे प्रेमात समोरच्याची इच्छा आपली असते. नाही म्हणलो होतो मी तुला ...पण तुला तर जिद्द चढली होती.”

“माधव मग... तुझी इच्छा स्वीकारली होती ना मी....अरे तू रिपोर्ट्स पूर्ण बघ ना... ते बाळच नाजूक होतं रे... नाही राहिलं आता. म्हणून काय नातं तोडायचं, माझ्या आत्ये बहिनिचही पाहिलं बाळ नव्हतं राहिलं.”

“हे कुणी सांगितलं तुला ?”

“आss... आई सांगत होती.”

“हे असले कारण देवू नकोस, तुला ठेवायचंच नव्हतं ते... तू तू मारलंस माझ्या बाळाला आणि माझ्या आईलाही...अरे किती किती जीवं होता तिचा तुझ्यावर....”

“अरे निदान आईसाठी तरी असा बोलू नकोस....माझं खूप प्रेम होतं त्यांच्यावर....त्या तर मला म्हणायच्या बाळ झालं कि तुझ्याशी बोलतो म्हणून...”

“मग तू ठेवलंस का तिला जिवंत... तू तसं मोडकं तोंड घेवून भरल्या घरात फिरायची ना... नाही गुमान डांबून बसायचीस ना...आता बसं आयुष्यभर...”

“माधव शांत हो ना तू, चल मी आताच येते तुझ्यासोबत.”

“खबरदार... ह्या कागदांवर सह्या कर आणि तुझा माझा संबंध संपला, तुला काय हवं ते सांग, देईल मी, समजेल माझी हौस भागली....फेकेन मागशील तेवढे...”माधव जोशात निघून गेला. अरुंधती इथेच खाली पडून बसून राहिली. प्रेमाची बोली लावली हे तिला मनात लागलं होतं.

तीन महिने झाले होते, पण माधव फिरकला नव्हता. अरुंधती दोनदा समाधान निवासात जावून आली होती पण तिला गेटवरुन आत मध्ये जावू दिलं नव्हतं. तशी सक्त ताकीद दिली होती माधवने वाचमनला.

तिने वेगळेपणासाठी नकार दिला होता मग कायदेशीर रित्या वेगळे होणं अवघड झालं होतं माधव साठी, मग त्याने नको नको आरोप करून अरुंधतीला भाग पाडलं होतं. शेवटी दोन वर्षाच्या लढाई नंतर अरुंधती आणि माधव वेगळे झाले होते. पण अरुंधतीची आस अजूनही कायम होती, तिला मनातून आशा होती कि माधव नक्की परत येईल, “तो जरा तापट आहे, अजून राग गेला नाही त्याचा, आईला गमावलंय त्याने. माझा माधव माझ्याशिवाय राहणं शक्यचं नाही....” असं म्हणत ती तिच्या आईला, बाबांना समजवायची. पण पाच वर्ष झालीत माधव काही परताला नव्हता. नंतर समजलं कि तो अमेरिकेत कायमचा गेलेला म्हणून. तरही अरुंधती मनातल्या मनात स्वतः ला खुडत असायची. तिच्या अश्या शांत आणि खुडत राहाल्यामुळे बाबांना हृदय विकाराचा तीव्र झटका बसला, त्यांची प्रकृती तर सुधारली पण होतं नव्हतं ते सांर काही लागलं होतं आणि मग आणि शेवटी उपचार वेळीच न मिळाल्याने ते वारले.

अरुंधती आणि तिच्या घरात कोलाहाल होता, बाबांचं पेन्शन येत असायचं, पण आता तेही अर्ध होणारं होता, लहान भवाच शिक्षण आता कुठे संपल होतं नी तो नौकरीसाठी फिरत असायचा. सांर कसं अर्ध्यावर सुटलं होतं. घरात पैश्याची चनचन भासत होती. होतं नव्हतं सारं काही आईने बाबांच्या उपचारासाठी लावलं होतं.

आणि लहान भावाने अरुंधती समोर मेडिकलचा फोर्म ठेवला, “तायडे,... आता काही माधव येणारं नाही”

“बाबू... येईल तो... माझा विश्वास आहे. त्याला आवडणार नाही हे.” तिने तो फोर्म परत बाजूला केला.

“तायडे.... तो गेलाय अमेरिकेत कायमचा... लग्न केलंय त्याने... सोड ही आस...तुझं स्वप्न जग... तुझं विश्व उभं राहिलं ग... आणि कदाचित आपलं ही.”

म्हणत त्याने माधवचा प्रोफाईल तिला दाखवला. आणि अरुंधती जोरात रडायला लागली... कधीची आसवं थांबवून ठेवली होती तिने... भावाने संभाळल तिला. पण कॉलेजच्या अंतिम वर्षा साठी फीसचे पैसे नव्हते. मनात जिद्द असूनही ती करणार काय होती, घरात मोठं अजून कुणीच नव्हतं, काम शोधावं आणि मग कॉलेज परत सुरु करावं हा निर्णय तिने भावासाठी आणि आईसाठी घेतला होता.

मुंबईपासून दूर नाशिककडे गावात एका हॉस्पिटल मध्ये रीसेप्शनिस्ट तिला नौकरी मिळाली होती. भावासोबत सर्व कुटुंब तिकडे राहायला गेलं. अरुंधती काम करून काही शिल्लक ठेवत होती आणि तिचा अभ्यासही करत होती. भाऊही नौकरी शोधात होताच. त्याचही इंजिनएअरिंग झालेलं होतं. आणि त्याला काही महिन्याच्या अथक प्रयत्नांने राणे कन्स्ट्रकशन मध्ये नौकरी लागली होती. `

अरुंधतीची गाडी राणे सदनच्या आवारात आली, आणि गेटमधून आत शिरली, बाहेर तिचे सासरे तिची वाट बघत शतपावली करत होते. गाडीचा आवाज येताच सासूही बाहेर आली. अरुंधतीने गाडी पार्क केली. बाबांच्या जवळ आली, बाबा, चला आतमध्ये, किती वेळ झालंय, झोपा लवकर, मग ती आईकडे बघत म्हणाली, अरे आई तुम्ही अजून जाग्याच का? उद्या पासून जॉगिंग सुरु करायची आहे. चला चला झोपा.”

अरुंधती तुला वाढून देते ना ग, मग जाते मी, झोपते. म्हणत आई स्वयंपाक खोलीकडे सरसावली. बाबाही परदे आवरत खिडक्या बंद करत होते. अरुंधतीने गाडीच्या चाब्या टांगल्या आणि तिचा बॅग डाइनिगवर ठेवून ती वाशरूम कडे निघून गेली.

बाबांना बाहेरून होर्नचा आवाज आला, कुणीतरी गेटवर आलं होतं. सारे नोकर निघून गेले होतेच मग त्यांनी चाबी घेतली आणि निघाले गेटकडे. गेटवर माधव उभा होता, म्हणाला, अहो मी माधव पंडित, मला अरुंधतीशी आजचं महत्वाच बोलायचं आहे.

बाबा भांबावले, हो हो या म्हणत त्यांनी गेट उघडलं, धुक धुक वाढली होती, माधवने गाडी पार्क केली, अहो मी माधव पंडित, डॉ राणेचा पेशंट आहे. अगदीच महत्वाच बोलायचं आहे त्यांच्याशी...

हो हो... बोला तुम्ही, काय ते सपष्ट करा

म्हणजे

लपवू नका, तुम्ही कोण आहत हे माहित आहे आम्हांला

माधव दचकला, काहीच बोलला नाही, बाबा त्याला घेवून बाहेरून घराकडे निघाले होते, अहो, आमची सुनबाई काहीच लपवत नाही... अर्थात तिचा चेहरा आता वाचता येतो आम्हांला. काय ते बोला तुम्ही.”

माधव हॉल मध्ये पोहचला, भव्य हॉल आणि खूप समाधान होतं वस्तू त्या, समोर अमित आणि अरुंधतीचा सोबत मोठा फोटो लागला होता. घरात सर्व गोष्टी नीटनेटक्या होत्या. खाली एका बाजूला अनवीची खेळणी पडून होती जणू ती आताच तिथून निघून गेली असावी अशी. त्याच्याच बाजूला स्टडी टेबलवर पुस्तक, आणि शाळेच सामान होतं. जे आताच आजीने अगदीच नेटनेटकं केलं होतं. सोफ्यावर बाबांची कवितेची वही आणि पेन पडून होता. तिथे तुळशी माळ आणि मेथीच्या भाजीची जुडी पडून होती. सांर काही कसं आनंदात होतं.

माधव मनातून त्या वस्तुत शिरताच भारावून गेला होता. अरुंधती आईला आवाज देत स्वयंपाक खोलीकडे वळली, आई राहूद्या तुम्ही, मी घेते माझं वाढून... आणि तिची नजर माधववर पडली, तू इथे कशाला आलास?

“अरु तुझ्यासाठी, बोलायचं आहे ग मला... आलोच ना मी शेवटी...तू माझी वाट बघत होतीस मला माहित आहे ते.”

अरुंधती त्याच न ऐकता, बाबांकडे आली, “बाबा, तुम्ही...”

अरुंधती, शांत हो जरा, तो आलाय ना, अथिती देवं भव! बोल त्याच्याशी, काय ते स्पष्ट कर. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तुझा निर्णय अतिम असेल आम्हाला.”

माधव परत बाबांकडे आला, राणे साहेब, आभार तुमचे. मी करेल ना सर्व अरुसाठी...मी.. मी सांभाळेल सर्व. तुम्ही काहीच काळजी करू नका, बसं अरुंधतीला समजवा तुम्ही. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर...पण...”

बाबांनी त्याला हात जोडून मध्येच थांबवलं, माधवराव, मी माझ्या सुनेशी बोलतोय. आणि मी बोललोय आधीच, तिचा निर्णय अंतिम... मी कुठेही मध्ये नाही. आणि आम्ही सक्षम आहोत... आधाराची गरज नाही आम्हांला.” बोलत ते अमितच्या फोटोसमोर येवून उभे राहिले. डोळ्यात अश्रुनी गर्दी केली होती. पण वाहणार नव्हतेच ना... ताठ मान ठेवून ते अरुंधतीकडे वळले, तिच्या डोक्यावर हात ठेवला. स्मित हसले,

“मी आणि सुमन आहोत आमच्या खोलीत, काही लागलं तर सांग, मुलं कधीचीच झोपली आहेत. बाई आज घरी गेली आहे. काळजी नको करू. हा बाबा अजूनही खंबीर आहे.”

ते हॉल मधून निघून गेले. मागेच आईही निघून गेल्या.

अरुंधती माधवला समोर बघून बावरली होती. मनात खूप भावना भरून येत होत्या. आज किती तरी वर्षाने ती त्याच्यासमोर होती. मधून गेलेला सारा काळ कुठेतरी हरवला असचं वाटत होतं. माधव आज परत तिच्या पायशी बसून होता. तसाच जसा तो कॉलेजमध्ये असतांना बसायचा. अरु समोर निघाली आणि माधव ने तिचे पाय पकडले, “माधव हे काय करतोस.”

“मी हेच करू शकतो आता....आधी तू बोलायला तयार होती तेव्हा मी तयार नव्हतो...”

“वेळ कायम नसते रे... ती तुझी वेळ होती...पण तू तयार नव्हतास...”

“अरु, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, खूप थकलोय आता... स्वतः पासून खूप दूर धावत निघलो होतो... मनात कितीदा येवूनही तुझ्याकडे नाही आलो.... आई मला बोलली होती, तुझी चूक नाही म्हणून पण...मी...अरु तुला तर माहित आहे ना मी असाच आहे म्हणून..पण आता मी सुधरेल ग, तू जे म्हणशील ते... नियतीने मला तुझ्या समोर उभ केलंय... अमित पण ह्या जगात नाहीच ना...आणि मी तयार आहे सर्व स्वीकारायला... आपण मुलांना उत्तम शाळेत टाकू.... मी मी तुझ्या आई बाबांची काळजी घेईल...पण तू नको ना ग दूर जावू आता....मलाच कळाल नाही, समाधान निवासात त्याची साम्राध्नी नव्हती मग कसं समाधानी असेल ते.... तू त्या  वस्तूची मालकीण आहेस. बाबाही जातांना बोलून गेले... अरुला परत आण म्हणून....”

अरुंधती हळवी झाली, “बाबा?”

“बाबा नाही राहिले ग, वर्षा आधी तेही आईकडे निघून गेले. आता ती भव्य वस्तू मला खायला उठते. आपण आपलं साम्राज्य परत उभं करूया.... देशील ना मला साथ....?”

अरुंधतीचा निर्णय काय असेल. ती देईल का माधवला साथ...बघूया पुढच्या अंतिम भागात. मंगळवारी. ह्याच वेळवर.

कथा अंतिम चरणात लवकरच...पुढचा भाग पेजवर लवकरच..... तेव्हा स्टे connect टू मनातल्या तळ्यात. माझ्या सर्व पुढच्या कथा आधी मनातल्या तळ्यात पेजवर प्रकशित होतील तेव्हा पेजला लाईक करा आणि कथा वाचत राहा...

https://www.facebook.com/manatlyatalyat

कथा कशी वाटली नक्की कळवा. माझ्या कथा वाचण्यासाठी माझ्या पेजलाही लाईक करू शकता.

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

©उर्मिला देवेन

धन्यवाद!!

फोटो साभार in.pinterest.

    जोडीदार कथेचा पुढचा भाग इथे प्रकाशित झाला आहे.. नक्की बघा ..आणि लवकरच जोडीदार तू माझा वाचकांसाठी वेबसाईट पहिल्या आणि दुसऱ्या पर्वासोबत येत आहे.






Post a Comment

0 Comments