जेव्हा ex परत येतो...भाग 2

 

भाग पहिला इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/09/ex.html

जेव्हा ex परत येतो...भाग 2

माधवच्या नजरेतून ते डॉ, अरुंधती राणे हे जात नव्हतं, त्या नर्स वारंवार केलेला तो डॉ राणे हा उच्चार त्याला छळत होता. त्याच्या जवळ पडलेली त्याची हॉस्पिटलची फाइल आणि त्यावर तिचं ते नावं त्याला कोरत होतं, हॉस्पिटलच्या भिंती, परदे आणि कोपरा नी कोपरा तेच नावं बोलत होतं... तो गंभीर हसला,

“डॉ राणे, अरु, तू शेवटी तुझं शिक्षण पूर्ण केलसं. तुझं स्वप्न पूर्ण केलसं ग, पण राणे....?”

मग मनातच म्हणाला, “मी कुठे येवढे वर्ष तुझी खबर ठेवली, ती कोर्टातली शेवटची भेट होती आपली...पण मला तुचं हवी आहेस आता. आता नाही जावू देणार मी तुला, नाही... मी नाही निघून जाणार तुझ्या पासून अरु तुझा मधु अधुरा आहे ग....मी तुझ्या शिवाय अधुरा आहे. तुझ्यापासून दूर राहून हे कळालं मला...”

मनाने विचलित झालेला, आणि शरीरावर पडलेल्या जखमेने दुखावलेला कासावीस झाला होता. समोर त्याचा फोन ठेवला होता, फोनही चार्ज झाला होता, त्याच्या फुटलेल्या स्क्रीन मधून कसतरी त्याने इंटरनेट सुरू केलं, स्वतःच सलाईन सांभाळत, बॅग मधून लॅपटॉप काढला मग गुगल वर पूर्ण पत्ता काढला... नंतर त्याने त्या हॉस्पिटलची सर्व तपासणी केली. त्यालाही कळालं होतं कि आता मिस्टर राणे जगात नाहीत म्हणून... दुखं होतं पण तेवढाच आनंद होता कि तो योग्य वेळी अरुंधतीच्या आयुष्यात परत समोर आला म्हणून.... आता त्याच्या मनात खूप काही सुरु होतं....त्याला कॉलेजचे दिवस आठवले.

अरुंधती आणि माधव, बारावीत सोबत होते, त्या दिवशी निकाल लागला होता, अरुंधतीला बोर्डात ९०% मिळाले होते आणि माधव फर्स्ट क्लास पास झाला होता. अरुंधतीला डॉक्टर व्हयाच होतं, पण माधव वडिलोपार्जित बिजनेस सांभाळणार होता. त्याला शिक्षणात रस नव्हताच, नावापुरती त्याला डिग्री हवी होती. त्याने पदवीला दाखला घेतला आणि अरुंधतीने मेडिकल मध्ये प्रवेश मिळाला. पण प्रेम कुठे काही बघत असतं,

वेगवेगळ्या मार्गाने जावूनही मन गुंतली होती. भेटी सुरु होत्या, मनाच्या गाठी पडत होत्या. माधव गुंतला होता अरुंधतीत आणि अरुंधती माधवमय झाली होती.

दिवस होता वाढदिवसाचा, मस्तीत, प्रेमाच्या धुंदीत, माधव आणि अरुंधतीने सर्व सीमा पार करत एकत्र आले. आणि मग अवघ्या काही दिवसात अरुंधतीला दिवस गेलेत, तिच्या करियर समोर ते बाळ तिला नकोच होतं पण माधव तसा नव्हता. उलट त्याला अरुंधतीला त्याच्या पासून दूर ठेवायचं नव्हतं. तिचं असं करियरसाठी तळतळ करणं त्याला मनात पटत नसायचं पण तरही तिच्या प्रेमापोटी तो सगळं जावूदे म्हणून सोडून द्यायचा पण आता त्याला अरुंधतीला थांबवण्यासाठी कारण मिळालं होतं.

“अरु, ऐक ना ग, मला हवंय हे बाळ.”

“अरे पण, माझं कॉलेज, आणि तुझा अजून ठिकाणा नाही.”

“म्हणजे? मला काय गरज आहे ग ...? माझ्या वडिलांचा बिजनेस आहे. मी तोच सांभाळणार ग, काय कमी आहे आपल्याला. बाबांनाही तू पसंत आहेस, माझी आई खूप खुश आहेच आपल्या नात्यासाठी, अजून काय हवं ग आयुष्यात. आणि काय तू मेडिकलं शिकून नौकरी करणार ना? अरे आपल्या कडे लोकं कामाला आहेत आणि तू काय बाहेर नौकरी करणार काय? ते काही नाही, मी उद्या माझ्या बाबांना सांगतो तुझ्या घरी बोलायला.”

“मधु, नको ना रे, माझं लहानपणा पासूनच स्वप्न आहे रे हे. आपण, आपण बाळ ...”

“काय? माझं बाळ आहे ते, मला हवंय... आपल्या प्रेमाची निशाणी आहे ती. आणि काय ग माझीही स्वप्न आता तुझी आहेत ना... मला बाबांचा बिजनेस खूप वाढवायचा तोही तुझ्या सोबत.”

“अरे हो पण ... माझं अंतिम वर्ष आहे हे. आणि लोकं काय म्हणतील”

“असुदे ग, घे ब्रेक, नंतर पूर्ण कर, पण ही वेळ नाकोना जावूदेत. आणि कोण कुठले लोकं ग, माझं बाळ हवं आहे मला, आणि लग्न कारतोय मी. मग काय कुणाच्या बापाचं काय म्हणणं असेल.”

नंतर त्याने तिला जवळ घेतलं, त्या श्वासांच्या गर्मीत, आणि प्रेमाच्या गुर्मीत, हळुवार विरघळली अरुंधती. त्याच्या बाहुपाशात ती स्वतःला सुरक्षित भासवत होती. माधवने अलगत अरुंधतीच्या पोटावर हात ठेवला आणि मग दोघांही ती बाळाची चाहूल सोबत अनुभवली, माधव अलगत तिच्या कानात म्हणाला, “काय मिसेस पंडित, छोटे माधवराव येणारं आता, मग काय म्हणणं आहे आपलं.”

“छोट्या माधवरावांचे होणारे बाबा, आधी तुमच्या बाबांना सांगा, माझ्या बाबांशी बोलायला. मगच ऐकणार ही मम्मा ह्या बाबांचं, नाही कारे बाळा...”

हळुवार संवादात हरवली अरुंधती आणि मग लग्नाचा तो भव्य सोहळा. सगळं कसं आनंदात, ना रुसवे ना फुगवे. दोन कुटुंब एकत्र आले होते. माधव अरुंधतीला खूप जपत होता. सारच कसं आनंदमय होतं. दोन्हीकडले त्या आनंदात सुखावत होते.

काही महिने वाऱ्याचे पंख लेवून उडून गेले. त्या दिवशी अरुंधतीला तिच्या मैत्रिणी भेटायला आलेल्या, आणि अरुंधती जरा वाहावली. सगळ्या परीक्षेच्या गोष्टी करत होत्या. तिलाही वाटून गेलं, जावूया कॉलेजमध्ये, काय होतं, गरोदर तर... गरोदर, लग्न केलंय... मैत्रिणी गेल्या आणि तिने सासूकडे गोष्ट काढली, त्यांनाही काही वाटलं नाही, म्हणाल्या, “गाडी तुला सोडायला आणि घ्यायला येत जाणार, काही हरकत नाही मला.” सासऱ्याना पटलं नव्हतं पण बायकोसमोर ते काहीच बोलू शकले नाही. शेवटी नको म्हणत म्हणत.... माधव तयार झाला. अरुंधतीला सहावा महिना सुरु होता. ती अंतिम वर्षाचा फोर्म भरत होती. माधव मागून आला आणि तिला बिलगला, त्याच्या त्या श्वासांच्या गर्मीत परत अरुंधती उठली, मिठी मारतांना फोर्म टेबलवरून खाली पडला.

“अहो, माधव साहेब, हा फोर्म भरून देताय ना....” माधवच्या कानावर शब्द पडत होते, “फोर्म भरून देताय ना.” नर्स ओरडत होती. शेवटी तिने हात लावला, “साहेब, ठीक आहात ना... काय होतंय तुम्हाला” तिने सलाईन चेक केली. औषधी हातात घेतल्या, “अहो तुम्ही घेतल्या नाहीत अजून, आधी घ्या ह्या.”

नर्सने औषधी काढून माधवच्या हातात दिल्या. माधव भूतकाळातून परत आला. काहीही न बोलता त्याने औषधी घेतल्या. पण मन उद्याची वाट बघत होतं... आता हृदय अरुसाठी धड धडत होतं.

इकडे, अरुंधतीने तिच्या मुलाला पिक अप केलं, आजचा दिवस तिच्यासाठी तसाही मनाला त्रास देवून जाणारा होता आणि माधवमुळे तिच्या मनातल्या जखमांवरची खपटी कुरडल्या गेली होती. जखमा उघड्या पडल्या होत्या पण घराच्या आवारात शिरली आणि ती आता राणे होती. गप्पशी ती घरात शिरली, शिरताच अवनी तिची चार वर्षाची लहान मुलगी तिला येवून बिलगली, “मम्मा आज आज्जीने खीर केली आहे. आणि तुला सांगू, आजी ना रडत होती तिच्या खोलीत.”

अरुंधतीने तिला लागलीच उचललं, “असं, मग तू काय केलंस ग.?”

“मी तिला पाणी दिलं, अश्रू पुसले. आणि मग आम्ही दोघींनी बागेतली फुलं तोडली, हार तयार केला, बाबांच्या फोटोसाठी. तुला माहित आहे आज्जीने बाबांना खीर पण दिली... आधी !! ”

“बऱ,  बाबांना आवडते ना ... “

“हुम्म... मस्त झाली आहे, मी खाल्ली.

“ असं... अग आजोबा कुठे आहेत?”

“अज्जू बाबा ना, त्याच्या कविता ऑनलाईन बोलून दाखवत आहेत. आजी मला जावूच देत नाही त्याच्याकडे. मम्मा, तुला सांगू, अज्जू बाबा पण रडला...” आणि ती हसायला लागली. अरुंधती आधी सासऱ्यांच्या खोलीकडे निघाली, तिचे सासरे, त्याच्या कविता म्हणण्यात गुंग होते. शो सुरु होता त्याचा मुलाच्या आठवणीमध्ये. अरुंधतीने हळूच त्याच्या खोलीत जावून बसली. कवितेंना दाद देत तीही काहीशी रमली. शो संपला आणि सर्वांनी मिळून घरात पूजा केली. अमितच्या आठवणीत घर अमितमय झालं होतं. सासू सासऱ्याना औषधी देवून, शांत करून, अरुंधतीने मुलानाही झोपवलं. आता तिला निवांत मिळाला होता, बॅग मधल्या वस्तू शोधतांना तो तिचा जुना फोटो तिच्या हातात आला, “अरे, हा आता माझा नाही, माधवला परत करायला हवा. उद्या देववूया... मी कुठे अरु आहे आता...अमित मला अरुंधती म्हणायचा... त्याला माझं पूर्ण नावं घ्यायला आवडायचं... रुबाब वाटतो म्हणण्यात असा म्हणायचा, मी त्याची आहे. माधव तर कधीच मागे सुटला.”

नंतर तिने तिच्या आणि अमितच्या लग्नाचा अल्बम काढला, दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं अगदीच घरच्यानमध्ये. त्या अल्बम मध्ये अमितला बघून ती परत त्याच्या प्रेमात पडली. नकळत डोळ्यात आसवांनी गर्दी केली, पण अमितचे शब्द कानावर पडले, “अरुंधती तुझ्या डोळ्यात अश्रुना जागा नाही, आणि जमलेत तर माझ्या डोळ्यातून गळतील....” जणू अमित जवळपास राहून बोलत आहे असाच अरुंधतीला भास झाला आणि अश्रू कुठे गेले कळालही नाही, बाहेर अचानक ढगांनी गर्दी केली, आणि पावसांच्या सरी बरसायला लागल्या, वाऱ्याच्या वेगाने परदे हलत होते, अरुंधती मनातच म्हणाली,”अश्रू वाह्लेत रे, आता बघ कसं निर्मळ वाटत आहे, खिडकीतून नभाकडे बघत ती मनात हळुवार अमितमय झाली होती.

कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका ... मंगळवारी, पेजवर... ह्याचवेळी.... भेटूया परत अरुंधती सोबत....

पुढचा भाग पेजवर लवकरच..... तेव्हा स्टे connect टू मनातल्या तळ्यात. कथा कशी वाटली नक्की कळवा. माझ्या कथा वाचण्यासाठी माझ्या पेजलाही लाईक करू शकता.

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

©उर्मिला देवेन

धन्यवाद!!

फोटो साभार in.pinterest.


जोडीदार कथेचा पुढचा भाग प्रकाशित झाला आहे नक्की बघा 


 


Post a Comment

0 Comments