जेव्हा सुनबाई मनात नांदते- अंतिम भाग

 


आज आरतीच्या सासूला जरा चालता येत होत मग आरतीने त्यांना बैठकीत आणून बसवलं आणि त्यांच्या साठी सूप बनवायला निघून गेलेली. आरतीची आई तिच्या सासू जवळ जावून बसली आणि म्हणाली, "खूप जमत ना तुमच आरतीसोबत, बर आहे, बघून खूप आनंद झाला. मी आता निघावं म्हणते. "

"अहो, थांबा कि, दीड महिना झाला फक्त, तुमच्या लेकीच घर आहे"

"हो, पण ती इथे सासरी नांदते ना मग माझ एवढे दिवस राहणं चांगल नाही वाटत"

"अरे, माझी सून घरात नांद्तच नाही. ती ह्या घरातल्या प्रत्येकाच्या मनात नांदते, खर तर माझ्या सुनेला मी मनापासून स्वीकारलंय... मुलापासून नाही, तो तर माझा आहेच. पण सून माझी आहे हे म्हणायला मला खूप बर वाटते. म्हणूनच माझी सून माझ्या मनात नांदते. अहो, सुरवातीला जर मी तिला नवऱ्याची बायको अस समजून वागले असते ना तर आज माझ्या सुनेने माझ्यासाठी पाच दिवसाच्या सुट्या घेतल्या नसत्या आणि तिचे ह्यासाठी पैसे पण काटल्या जातील.  स्वतच्या अश्या दिवसांसाठी आधी सुनेच्या गरजेच्या दिवसांमध्ये सोबत असाव लागतं. तीच ती करूनच घेत, आपण केल नाही तर तसच तर राहणार नाही ना. मग आपणच केलं तर काय हरकत आहे. आता दोन मुली आहेत मला, आली का एकतरी धावत. त्याही सुखी आहेत त्यांच्या संसारात. सुनेला घरात नांद्वाव लागत नाही तिला मनात नांद्वावी लागते. मी खूप आनंदी आहे, माझी सून जसं म्हणेल मी तसं करते. माझ्या मनावर राज्य करते ती. मग घरावरहि तिचंच असणार ना! मी किती दिवस सोबत असणार तिच्या पण मी नसतानाही तिच्या मनात राहील हे किती सुंदर असेल.

"खूप मोठ मन आहे तुमच, खरच आरती म्हणते तेच खर, खूप शिकण्यासारखा आहे तुमच्याकडून, मुलीला अस सासर मिळाल धन्य झाले मी. नशीब माझं, माझी मुलगी ५ तासाच्या अंतरावर राहते, मी येवू शकले. तुमच्या सारख्या सासू मुळे एवढे दिवस राहू शकले."

"नाही हो, आरती आहेच तशी. आणि असं कसं यायलाच हवं, मीपण म्हणणार आहे आरतीला कि माझी अमेरिकेची तिकीट काढ म्हणून. मुलींकडे अधून मधून जायलाच हवं"

"आरतीला? "

"हो, दोन वर्षाआधी लहानीकडे मला तिनेच पाठवल होतं, गुजरातला, चांगली दोन महिने राहून आली, मुलाला म्हटल तर तो उडवा उडवीचे उत्तर देतो, सुनेला मन कळतं माझं"

"उत्तम, खूप मोकळेपणा आहे तुमच्या नात्यात, आज ह्या वयातही हे शिकायला मिळाल मला, कि नात्यात सैल मोठ्या माणसांकडून असावी तेव्हाच लहान माणस प्रेमाने जवळ येतात. हक्क आणि अधिकाराने कुणीच जवळ येत नाही, मोठ्या माणसाने मोठेपणाचा मोठेपणा दाखवला कि मान मिळत नाही मोठेपणाला ग्रहण लागते"

"अगदी बरोबर बोललात, सुरुवातीला आरतीही मला काहीच स्वतः हून सांगत नव्हती, सर्व मुलाकडून माझ्या पर्यंत येत होतं, बरोबरच होत ना. नवीन पोर, नवऱ्याला नाही सांगणार तर कुणाला? मुलगा जसं सांगायचा तसं मी वागत गेले आणि मग तो दिवस आला जेव्हा माझ्या सुनेने मुलाला न सांगता मला गोष्टी सांगितल्या"

आरतीच्या आईला स्वतच वागणं खटकायला लागलं होतं, मुलाने काही सुनेबद्दल सांगितल तर ह्या म्हणायच्या, बायको तुलाच आहे का? येतो मोठा वकीलपत्र घेवून. पण आज त्यांना हे पटलं होतं. दोघीही खूप गप्पा करत एकमेकिंचे जुने दिवस आठवत होत्या.

आरतीची सासू जरा भावूक झाली, म्हणाली, "मला माझ्या सासूने खूप त्रास दिला. ह्यांनी मला मारलं कि त्यांना मन शांती लाभायची, घरात सत्ता अजूनही त्यांचीच आहे हा भाव वाचायची मी त्यांच्या तोंडावर. मुलाने दोन शब्द मला जोराने बोलले कि ताबोडतोब मुलाचा पुळका येत होता त्यांना. आणि जरा माझ्या काळजीचा भास झाला कि घरात भांडण झालच समजा. कुठे जाणार होते मी, आजकालच्या मुली तर विचारी आहेत, घरातून निघूनही गेल्या तरी भक्कम उभ्या राहतील. माझे दिवस आठवले कि पाणी सहज डोळ्यात येतं. 

शेवटच्या दिवसांमध्ये सहा महिने पलंगावर होत्या सासूबाई. सगळं केलं मी, सु, शी, जेवण भरवण, माझ कर्तव्य होतं ते, नाही केलं असतं तर लोकांनी शेन घातलं असतं तोंडात, मीच वाईट ठरली असती, शेवटी सूनच कामी पडली होती ना, असं फटफट चालणार तोंड बंद पडलं होतं. जवाबदारी होती माझी, सासू बरी व्हावी म्हणून कधी देवाला साखळं घातल नाही पण औषधी आणि सेवा पूर्ण जावाब्दारीने केली. त्याचं करतांना मनात प्रेम मुळीच नव्हत. कधी मनात शब्द आला नाही कि त्या बऱ्या व्हावे म्हणून. त्यांनी अधिकार आणि हक्क दाखवला, मी कर्तव्य केल. 

त्यांची अशी परिस्थिती बघूनहि माझं मन जराही प्रेमाने काही करत नव्ह्त, माझ्या मनांतल्या भावना मला टोचत होत्या. मन खात होतं पण आपले पणासाठी  धड्सवात नव्हत. वाटत होतं माझ्या सुनेला ह्याच भावना यायला नको माझ्या अंतिम दिवसात. तेव्हाच मी ठरवलं, माझ्या सुनेला माझ्या मनात जागा देणार, घरातला एक कोपरा घेण्यासाठी भाग पडणार नाही. अधिकाराने अधिकार गाजवणार नाही तर अधिकाराने आपलस करेल. आरती घरात आली आणि मी सासू झाले पण सासुगिरी दाखवली असती तर तिच्या तोंडून माझ्या साठी आई हा अनमोल शब्द वारंवार निघाला नसता. तिची आई व्हायला आवडलं मला. आज मला तीन मुली आहेत. आणि हा जेव्हा सुनबाई मनात नांदते ना, तेव्हा घर आनंदाने डोलतं, आणि जेव्हा ती घरात नांदते तेव्हा नुसता आनंदाचा पोकळ आवाज असतो"

नंतर सासर्यांनी आरतीला आवाज दिला आणि ती स्वयपाक घरातून थेट निघून त्यांच्याकडे हातात बेलन घेवूनच निघाली.

आई तिला म्हणाली, "अग वाईट वाटायचं त्यांना, आरती ते बेलन दे माझ्याकडे."

पण आरतीला आधी बाबांकडे जायचं होत मग तिने आईकडे लक्ष दिल नाही.

सासू म्हणाली, "मुळीच नाही.. मुलीच्या हातात बेलन असतं तर वाईट वाटलं असतं का? तिला इथे कुठलीच भीती नाही. म्हणून ती ज्या स्थितीत होती तशीच बाबांच्या आवाजावर गेली. काहीतरी हवं असेल त्यांना आणि ते आरतीच शोधून देवू शकते. तसही ह्यांना आता तीच सांभाळू शकते. माझं ऐकत नाहीत ते, आरतीचा शब्द न शब्द ऐकतात, त्यांची ओषध आणि सगळ दावाख्याच तीच नीट ठेवते. डॉक्टर कडे जातांना आरतीच हवी असते त्यांना. मी आपली मागे मागे फिरते दोघांच्या" आणि मग दोघ्याही हसायला लागल्या.

दीड महिना राहून आरतीची आई मुलाकडे जायला निघाली होती. आरतीच्या सासूने त्यांच्या सुनेसाठी खूप गोष्टी दिल्या होत्या. उलट त्याही येवून जातील मधात असही बोलल्या. आरतीच्या आईला अश्रू आवरले नव्हते. मुलीला घरातल्या प्रत्येकाच्या मनात नांद्तांना बघून सुखावली होती ती. जावयाने गाडी काढली स्टेशनवर सोडायल तर स्वतची लाज वाटली होती कारण आरतीच्या सासूने मुलाला सांगितल होतं तसं करायला आणि जावयाने स्वतः अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती. त्यांनी केलेल्या चुकीच काय प्राश्चीत राहू शकते ह्या विचारात अश्रू दाटले होते, आठवलं होतं सुनेच्या आईला स्टेशनवर सोडायला जायच्या वेळेस त्यांनी मुलाला अर्जंट ओषधी आणायला पाठवलं होतं आणि सुनेची सासू ऑटो घेवून निघून गेली होती.

आरतीची आई निघतांना म्हणाली, "आरती आज मी माझ्या सुनेकडे निघाली आहे, मुलाकडे नाही. तुझ्याकडे एवढे दिवस राहूनही मी फक्त तुझी आई म्हणून राहिले. पण सुनेसोबत राहिले असते तर दोन मुलांची आई असते. अजून वेळ गेलेली नाही. माझ्या म्हतारपणासाठी माझ्या सुनबाईला मनात नान्द्वेल मी. खर बोलतात तुझ्या सासूबाई... सुनबाई मनात नांदायला हवी, तेव्हांच ती घरात आनंदाने नांदते"

त्या दिवशी स्टेशन वरून सासू घरी परत येतांना त्यांच्याच मैत्रिणीने त्यांना थांबून सांगितल, "सानिका फार जपते स्वतः ला, पण तू आलीस ना आता, घे बरका काळजी तिची, हेच दिवस असतात ग सुनेला आपलस करण्याचे नाहीतर सुनेशी वाईट तर होतच मुलगाही दुरावतो, अहो त्या सानेबाई वृध्श्रमात गेल्या ना राहायला"

मैत्रिणीकडून मिळालेला डोस सासूला अगदीच लागला, सानेबाई वृध्श्रमात गेल्या ह्याची दुसरी बाजू हि असू शकते हे त्यांनी कधी विचारातच घेतली नव्हती. सुनेला धाकात ठेवण्याच्या नादात मुलगा दुरावतोय हे त्यांना कळून चुकल होतं. घर माझं असलं तरी संसार आता सुनेचा आणि तिचा संसार उभा करायला आपण वाटेल ती मदत करायची हा विचार करत ती घराजवळ पोहचली.

सासू घरी पोहचली तेव्हा सानिका आजही कॉम्पुटरवर काम करत होती. सासूला दुरूनच बघून जरा दचकली. पटकन कॉम्पुटर बंद केला तिने आणि लगबगीने पाणी देण्यासाठी निघाली. सासूने पाण्याचा ग्लास घेतला आणि आरतीकडून आणलेल्या सर्व वस्तू तिच्या तिच्याकडे दिल्या. सानिकालाही आश्चर्य वाटलं कारण कधीच सासूबाई तिला काहीच स्वतः हून देत नसत. सानिकाला त्या दिवशी त्यांनी स्वयपाकात मदत केली, तिच्या बाळाची पूर्ण चौकशी केली. जेमतेम चौथा महिना लागला होता, सानिकाही जरा सावरली होती आणि तिलाही आता कामाची सवय झाली होती. सगळ करत होती आणि सासूने तिला जराही हटकलं नव्हत. जरा काही दिवस करूदेत तिच्या मनाच असं म्हणत तिलाच साद देत होत्या.

आई स्वतः हून सानिकाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आई हे सर्व सुरेश बैठकीत बसून बघत होता. मनोमन आनंदी झाला होता आणि आरतीच्या सासूला धन्यवाद देत होता.  

आता हळूहळू सानिका सासूशी मोकळी वाहयला लागली होती. सानिकाच्या मनातली भीती कमी होत होती. सानिकाच्या सासूकडे कुणाशी गप्पा करायलाही वेळ राहत नव्हता, कळलं होतं त्यांना कि ते फक्त चार दिवस सुनेचे सुनेला जगायला दिले कि उलेले सर्व दिवस ती आपल्या सोबत असते. घरी आलेला एका दिवसाचा पाहुणा असतो तरी आपण सर्व त्याच्या मनाप्रमाणे करतो, त्याला घरात कुठलीच कमतरता भासू देत नाही मग आयुष्यभर स्वतःच घर सोडून आलेल्या सुनेला काही दिवस आपण मुबा देवू शकत नाही. ह्याची जाणीव त्यांना झाली होती आणि आता त्यांची सुनबाई मनात नांदायला लागली होती. 

सुरेश आता आई सोबत वेळ घालवत होता आणि सानिकाला मुळीच वाईट वाटत नव्हत कारण ती आत्ता घराच्या मनात नांदत होती.

कथा कशी वाटली नक्की कळवा! माझ्या नवीन कथा वाचण्या साठी माझ्या पेजला लाईक नक्की करा https://www.facebook.com/manatlyatalyat


उर्मिला देवेन


जोडीदार तू माझा ह्या कथेचा पुढचा भाग प्रकाशित झालं आहे नक्की बघा 





Post a Comment

0 Comments