तुझे नी माझे व्हावे मिलन… भाग २

 


राधिका स्वतःच तिची ती तयार होतं होती, रंजीतची घरात धावपळ सुरु होती. तो राधिकाच्या खोलीत शिरला,

राधिका, किती मोठी झालीस ग,

“दादा... खर तर ह्या शब्दाची वाट मी आईकडून बघत होते, आई कहीदा माझ्या खोलीत येवून गेली पण ...”

“अरे....  जावूदे ना... मी म्हणतोय ना, आधी ते डोळे पूस... तुझं ते मेकअप विस्कटून जाईल ग...”

“मी बाबांना फोन करतो, कुठे राहिले ते कळत नाही आहे...”आणि तो हळूच म्हणाला, “मी रसिकाला आईला फोन केला होता.”

“अरे मग..”

“त्या बाबांना पाठवतो म्हणाल्या.”

“मग येतील कि बाबा, त्याचं ऐकतात बाबा...”

“हो ग, पण अजून आले नाही ना?”

आणि बाबांच्या गाडीचा आवाज आला, “बाबा आले वाटते, अग मी बिझी आहे, रसिका आईला मेसेज टाक ना, बाबा पोहचले म्हणून. “

“हो टाकते, तू आधी बाबांचा मूड बघ.”

आई स्वयंपाक खोलीतून ओरडलीच, “आला, हा आयता, मिरवायला, आम्ही इकडे मेहनत करणार आणि हा बाप म्हणून बैठकीत बसणार, अरे मी मी अर्धी मालकीण आहे ह्या साऱ्या वैभवाची, माझ्या सासर्यांनी तिशी मालकी दिली आहे मला... हा कशाला हवा इथे.”

बाबा जेमतेम हॉल मध्ये शिरले होते, “हो म्हणूनच मी येत नव्हतो, ही ही अशी माझा पणा उतारा करते ना म्हणून.. नकोय मला इथे ह्या घरात येणं.”

“आई तू जरा गप्प राहतेस का? निदान आज तरी त्यांना वडिलांचा मान दे पाहुण्या समोर... तुम्ही काय कधी सरळ बोलणारे नाही... आई, मला तुझ्याकडून एकही शब्द बैठकीत ऐकायचा नाही... असं वागत राहिलात ना तर आपली राधिका अशीच राहिलं...”

“आणि बाबा तुम्हाला का हो हा मुलगा पसंत नाही.”

आई परत म्हणाली, “मला आहे ना, त्यांना कोण विचारतं.”

“आई, तू गप्प ग, तुला काय माहित आहे त्या मुलाबद्दल.”

“बाबा, सांगताय ना?”

“अरे रंजित, आपल्या राधिकाला अजून मोठं स्थळ मिळेल रे, घाई कशाला? मुलाची आई जरा वेडी आहे म्हणे, उगाच माझ्या राधिकाला त्रास रे.”

बाबा पण.... आणि पाहुणे येवून पोहचले, घरासमोर गाड्या उभ्या राहिल्या होत्या. रंजित बाहेर आला, आणि स्वागतासाठी उभा होता. बाबाही बाहेर आले. आई मात्र घरात कुर कुर करत राहिली.

पाहुणे मंडळी बैठकीत बसली, रीतसर आई राधिकाला पाहुण्यासानोर घेवून आली, रंजित ने मोहन ला राधिकाशी एकांतात बोलायला लावलं आणि नंतर तिचा होकार कळताच त्याने बाबांना इशारा केला. तर आई मध्येच म्हणाली, आम्ही कळवतो मग निर्णय

बाबा परत बोलणार होते तर... आई परत म्हणाली, “हे बघा जरा आमच्या मुलीशी बोलून आम्ही सांगतो.”

बाबा म्हणले, “हो अग मी बोलतोय ना, थांब.”

मोहन चे बाबा म्हणाले, “मोहन उद्या USA साठी निघतोय, जरा निर्णय आधी कळाला तर ...म्हणजे आम्हाला मान्य आहेच की, पसंत आहेच आम्हांला राधिका... जरा उघड पणे बोलूया.. आम्हाला तशी लग्नाची घाई नाही. पण ...”

 

रा”धिकाला पसंत आहे म्हटल्यावर आम्हाला काहीच हरकत नाही.” बाबा शांतपणे म्हणाले.

“अहो मी म्हणाले ना आपण नंतर कळवू म्हणून.. मध्ये का बोलता तुम्ही.” आई पटकन हॉल सोडून निघून गेली. पाहुणेही उठले, मोहन रंजितला म्हणाला, “हरकत नाही, मी वाट बघतो, निघतो आम्ही. मी उद्या संध्याकाळी निघणार आहे. कळवा तोवर. तसा महिन्या भरात परत येईल मी ....”

पाहुणे निघाले आणि, “बाबा ओरडले, ये बाई, निदान काही वेळ तुला गप्प राहायला काय होतं ग.”

“हो मी आता बाई ना, लग्न केलं तेव्हा बाई नव्हते आता मी बाई, ती ती काय मग महाराणी आहे का, आणि मी बाई हो मी बाई...” आणि ती जोर जोरात रडायला लागली.

अग तसं नाही, हे असं करते ना म्हणून, म्हणून मला इथे यायला आवडत नाही....

“हो मी असं करते ना, ती काय आरती ओवाळते तुमची.”

“आई बाबा, आम्हाला आता हे तुमचं ऐकण्याचा कंटाळा आला आहे, हा मुदा तुमचा दोघांचा नाही आहे, माझ्या बहिणीचा आहे, तिला मोहन पसंत आहे आणि म्हणून मला, तुम्ही दोघ सहमती देत असाल तर सांगा... नाहीतर ...”

“नहीतर काय रे... जा मला मंजूर नाही तो मुलगा... आहे काय त्याच्या कडे. “ आई परत जोरात म्हणाली.

“अग पण तुला मंजूर होता ना तो, मग आता काय झालं...रं”जित म्हणाला.

“आता मी होकार देतोय ना.. म्हणून कदाचित !” बाबा घरातून निघत होते.

“अहो बाबा, काय सांगायचं मोहनला मी, आणि थांबा तुम्ही, आई बोलते म्हणून लगेच काय निघता, आम्ही आहोत अजूनही तुमची मुल... तुमचं आणि आईच नातं अजूनही मला कळत नाही... एकदा तोडा किंवा अड्जस्ट तरी करा.”

“हे बघ रंजित मी तुला आधीही म्हणालो, मला ते स्थळ फारसं मान्य नाहीच पण आपल्या राधिकाची संमती असेल तर मला काहीच हरकत नाही. मी तिच्या आनंदात आनंदी आहे. निघतो मी.”

“हो हो निघा, पळकुटे कुठले, आले मोठे...” आईने जावून दारही लावलं.

घरात गोंधळ झाला होता, रंजित राधिकाच्या खोलीत आला, ती रडत होती, म्हणाला, “राधिका मी आहे ना, काळजी नको करू, तुला मोहन आवडला ना.... मग हे मिलन होणारच.. मी पाठवतो तसा मेसेज मोहनला.“

काही वेळाने मोहनचा मेसेज आला, “बाबा नाही म्हणत आहेत ह्या नात्याला, सॉरी.”

मोहन गुमान शांत झाला होता आणि राधिका गप्पच, कुणाला सांगणार होते दोघ. तरही रंजित राधिकाला म्हणाला, “मी बोलतो मोहनशी,  त्याला पसंत आहेस तू... मग नकार का आला माहित नाही. तू काळजी नको करू. आई आणि बाबा ना! मी काय बोलू त्यांना आता.”

पालकत्व प्रत्येक वयात म्हत्वाच असतं, कुठे ना कुठे पालकांच्या चुका मुलांना भोगाव्या लागतात नाहीका! कुठेतरी काहीतरी थांबव हे नेहमीच सर्वाना वाटतं पण पुढाकार कुणीच घेत नाही... आपल्या कथेचही तसच झालंय. पुढे राधिका आणि मोहनच मिलन होतं कि नाही हे वाचूया पुढल्या भागात.

कथा कशी वाटली नक्की कळवा... कथेच्या पुढच्या भागासाठी  पेजला नक्की लाईक करा...https://www.facebook.com/manatlyatalyat

 ©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

 


Post a Comment

0 Comments