तुझे_नी _माझे _व्हावे _मिलन… अंतिम भाग




तुझे_नी _माझे _व्हावे _मिलन  अंतिम भाग ©उर्मिला देवेन

ई वडिलांच्या ओढा ओढीत ओढले जात होते ते दोघं बहिण भाऊ.

आठवडा झाला आणि मोहन अगदी घरीच आला, घरी राधिका होती, तिने तातडीने रंजितला बोलावून घेतलं.

मोहनने साखापुडा करायचा विचार ठेवला, त्याने घरी सर्वांना सांगितलं होतं कि लग्न त्याला राधीकाशीच करायचं म्हणून. मग कुणी काही बोलत नव्हतेच. गोष्ट पुढे वाढवायला तो स्वतः आलेला. रंजित आणि राधिका काहीच बोलत नव्हते.

रंजितने तेवढ्या वेळेत रसिका आईला मेसेज टाकला होता आणि बाबांचा कॉल आला, ते म्हणाले, रंजित, सांग मोहनला तारीख ठरवायला, बघूया आपण, अरे मिया बीबी राजी तो काय करेगा कोई. आईला सांभाळू आपण. मी बघतो. शेवटच बोलून तिच्याशी.”

रंजित ने फोन ठेवला आणि मोहनला निर्णय सांगितला. राधिका काहीच बोलली नाही. पण आई मात्र चिडचिड करायला लागली होती आतल्या खोलीत. मोहनला जरा भनक लागली होती. तोही लवकर निघाला.

त्या दिवशी घरात भयाण शांती होती. रंजित आणि राधिका बाबांची वाट बघत होते. आणि आज बाबांसोबत रसिका आईही आल्या होत्या.

रसिकाने आज पूर्ण तीस वर्षा नंतर ह्या वाड्याच्या पायऱ्या ओलांडल्या होत्या, पहिल्यांदा ओलांडल्या होत्या तेव्हा सासर्यांनी तिथूनच परत जायला भाग पाडलं होतं. पण आज तिने परत हिंमत केली होती. बाबांनी तिचा हात धरून तिला घरातल्या बैठकीत आणलं होतं. रत्नाला माहित झालं आणि ती बाहेर आली, रसिका हात जोडून उभी होती.

रत्ना तिला बघतातच बेभाण झाली होती, आज पर्यंत जे घडलं ती शब्द नी शब्द बोलायला लागली, पण रसिका जागीच उभी होती, तोंडून एकही शब्द तिने काढला नाही.

रत्ना तिच्या ह्या चुप्पीचा पुरेपूर फायदा घेत तिला नको नको ते बोलत राहिली, आणि म्हणाली, “काय ग सगळं करून इथे ह्या पवित्र वस्तुत तू उभी कशी झाली? आत काय हवंय तुला? माझं सुखं चैन सर्च तर तुझ्या सोबत आहे.” आणि तिने हात उचलला, तोच तो हात थांबवायला बाबा आणि रंजित दोघही धावले.

आईचा हात रंजितने पकडला होता तर बाबा रसिकाच्या पुढे उभे झाले होते. हे बघून आई पार कोसळली होती.

खूप रडली, शांत झाली, परत म्हणाली, “हो ग तुझी काहीच चूक नसतांना तू हे सगळं ऐकून घेतलंस...मी जेवढ बोलले ना त्यात तू कुठेच चुकीची नाहीस, आणि कदाचित तुझा चांगुलपणा कि आज माझे मुलही तुला मनातून मानतात. पण माझी काय चुकी ह्याच उत्तर आहे का तुझ्याकडे.”

रसिका म्हणाली, “नाही, तुझी चुकी काहीच नाही, चुकी ह्या समाजाची आहे, मी गरीब आणि तुझ्या सारख्या प्रशस्त समजातून नाही ना, मला काय किंमत असणारं, माझं प्रेम, प्रेम नव्हतं ना, ती तर लीला होती असं बोलून काढून दिलं होतं मला ह्या उंबरठ्यावर पाय ठेवल्या नंतर. मी तर कधीच राजेशला माझ्याकडे यावं म्हणून बोलले नाही, माझीं मी खुश होते, पण ज्या सामजिक वादळाने मला ह्या उंबरठ्या वरून हाकलल त्याच वादळाने तुला ह्याच उंबरठ्यावरून आत घेतलं. कदाचित तुझ्या आईवडीलांना हे सांर माहित होतं तरही त्यांनी तुला ह्याच उंबरठ्यावर सोडलं ना... मग आता सांग चुकी कुणाची. माझी असेल तर मी आत्ताच निघून जाते. आणि तुझी आहे हे मी कधीच म्हणाले नाही आणि म्हणणारही नाही. तू तर पत्नी आहेस राजेशची आणि मी आजही तुळस आहे तुझ्या अंगणातली.... आजही आठवतं मला, राजेशच्या आईने माझ्या नावाची तुळस माझ्या समोर लावली होती. असो, मी सांर विसरले. पण माझी जागा नाही विसरले. निघते मी! हे तुझं साम्राज्य आहे, इथे मला काहीही नको.

रत्ना शांत होती, रसिकाने वळली, तोच रत्ना ने आवाज दिला, थांब प्रत्येक वेळेस तू कशी ग जिंकणार...

रसिका थांबली, पलटली, परत हात जोडून उभी होती, तू नेहमी जिंकावीस हेच मी म्हणेल. निघते मी. पण

नको करूस ती चुकी जी ह्या घरात झाली आहे, मुलांच्या आवडीला आपली आवड म्हणून स्वीकार बसं!

रसिका निघून गेली, बाबाही मागेच निघाले, रंजित आणि राधीकाही मागेच मोठ्या दारापर्यंत आले. रसिकाने राधिकाला आशीर्वाद दिला, पोरी, तुझी आई जे म्हणाले ना ते कर... शेवटी लग्न तेव्हाच सफल होतं जेव्हा मन आनंदी असतात. बाकी तू समजदार आहेस.

आणि आज दोन महिन्या नंतर, राधिका आणि मोहनच लग्न होतं, घरात खूप धामधून होती. शेवटी राधिकाला तिचा मोहन मिळाला होता, साऱ्या रिती भाती राजेशने रत्ना सोबत केल्या होत्या. रंजितचा प्रयास आज सफल झाला होता त्याच्या जिवलग बहिणीला तिचा जिवलग मिळाला होता.

सारे भ्रम तुटले होते पण सल अजूनही सर्वांच्या मनात होती, रसिकाची वाट रत्नाने खूप पहिली पण ती आलीच नाही. त्या उंबरठ्यावरची लक्ष्मण रेषा तिने एकदाचं राधिका साठी ओलांडली होती.

 

संसारचा नवीन प्रवास सुरु करतांना पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. त्यांची एक चुकी समोरच्या पिढीला सहन करावी लागते. आपण मुलांना तळहाताच्या फोडा प्रमाणे जपतो पण वेळ आली कि कठोर होतो. पालकत्वाची कसोटी ही प्रत्येक क्षणाला असते.

कथा, कशी वाटली नक्की कळवा.

कथेचे सर्व भाग इथे आहेत. नक्की वाचा!

भाग ३ https://www.manatalyatalyat.com/2021/08/3_13.html

भाग २ https://www.manatalyatalyat.com/2021/08/blog-post_28.html

भाग १ https://www.manatalyatalyat.com/2021/08/blog-post.html

कथेच्या पुढच्या भागासाठी पेजला लाईक करा !

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

Post a Comment

0 Comments