मी माझी ना राहिले... भाग २

 

पहिला भा इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/07/blog-post.html

काव्याच करण्यात जणू दोघांची ओढ लागली असायची मग बोलणं आवर्जून होत होतं, तिचा शाळेचा डब्बा आसावरी करून द्यायची आणि तो शाळेच्या बॅग मध्ये अमित ठेवायचा. अमितला सुट्टी असली कि घरात गोंधळ असायचा. आणि त्या गोंधळात प्रत्येक नात गद गदायचं. नजरेवर नजरा पडायच्या, ओठ बोलण्यासाठी सरसायची आणि मग कावू मध्ये यायची... असचं सुरु होतं.

रविवार होता, सासू सासरे सारेच घरी होती. बाहेर पावसाची सर पडून गेली होती. मातीचा सुंगंध पसरला होता. सकाळच आवरून आसावरी बाल्कनीत उभी होती. हळूच वाऱ्याची झुळूक आली आणि तिला रजित जवळपास असल्याचा भास झाला. ती त्या मातीच्या सुवासात गुंग झाली आणि डोळे उघडले तेव्हा समोर अमित कावू ला घेवून उभा होता. दोघेही हातात पावसाच पाणी घेत होते. सरीही परत सुरु झाल्या होत्या. आसावरी गडबडली आणि अलगत अमितच्या मिठीत पडली. अमितने तिला गच्च धरलं, तशी कावूही त्याच्या खुशीत होतीच. नजरा एकमेकांवर पडल्या होत्या. नजर चुकवून आसावरी मिठीतून निघाली आणि म्हणाली, “मस्त पाऊस आहे ना कावू...”

अमित तो मातीचा सुगंध मनात घेत म्हणाला, “भजी खायला आवडतील मला... मस्त झणझणीत...काय ग कावू?”

आणि मग सर्वांनी त्या अमितच्या फर्माईशला दुजोरा दिला. आसावरी स्वयंपाक घरात शिरली, कावूने तिच्या बाबालाही ओढत तिकडे आणलं. बाबा आज भजी करणार होते. कावूला बाबांच्या हातची खायची होती भजी.

“मम्मा तू नको करू, आज माझा बाबा करणार आहे भजी. हो ना रे बाबा?”

अमित जरा स्वयंपाक खोलीत येवून गोंधळला, पहिल्या बायकोच्या निधनानंतर तो स्वयंपाक घरात फारसा आलाच नव्हता, लग्नाच्या नवीन दिवसात त्याचा प्रत्येक रविवार स्वयंपाक खोलीत असायचा. नयनाला फारस स्वयपाकातल कळायचं नाही मग दोघेही काही ना काही नवीन प्रयोग करत स्वयंपाक खोलीत प्रेम करत असायचे. पण आज कावूने अमितला स्वयंपाक घरात आणलं आणि अमित त्या आठवणीत शिरला होता.

कावूच्या जीद्दीसमोर त्याने होकार दिला पण आज त्याला स्वयंपाक खोलीत कुठ काय असतं हे माहित नव्हतं. स्वयंपाक घर असावरीने तिच्या नुसार लावलं होतं.

भजी करतांना दोघंमध्ये हलकासा सवांद झाला. सामानाच्या देवान घेवानात हळूच स्पर्श झाला. एकमेकांकडे बघतांना हास्य अलगत चेह्र्याबर आलं. त्याने ती काढईत टाकली तिने ती झाऱ्याने काढली आणि बघता बघता भजी तयार झाली.

आज खूप दिवसांनी अमितने स्वयंपाक घरात जावून काहीतरी केलं होतं तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. घर हसत होतं. कावू जाम खुश होती. हुश ... करत अमित सोफ्यावर बसला आणि अलगत म्हणाला, “नयना तू ना क्लास लाव स्वयंपाक करण्याचे...” सांर क्षणात थांबलं, आईने अमितला धक्का दिला, आणि अमित बोलला, “आई... खूप दिवसांनी स्वयंपाक खोलीत पाय ठेवला ग... आज नयना आठवली मला...” डोळ्यात पाणी साठलं त्याच्या पण समोर आसावरी उभी होती. तिलाही सार काही कळून चुकलं होतं, ज्या भावना तिच्या रंजित साठी होत्या त्याच अमितच्या नयना साठी पण अमित पुढे येवू पाहत होता हे तिला जाणवलं होतं. घरातलं वातावरण सांभाळत आसावरी म्हणाली, “हो ना, तुम्ही द्या मला क्लास, शिकेल मी तुमच्या कडून.” अमितने कावूला मांडीवर घेतलं, तिच्यासाठी कमी तिखटाची केलेली भजी त्याने घेतली आणि भरवत होता. आई बाबा अमितला हसतांना बघून खुश होते पण अजूनही तो त्यांना त्यांचा अमित गवसला नव्हता.

आई तिची प्लेट घेवून स्वयंपाक खोलीत शिरली आणि तिने आसवारीचा हात पकडला, “आसावरी तू खुश आहेस ना ...”

आसावरी दचकली, “आई हो हो म्हणजे!”

“नाही... अमित खुश दिसतोय ग पण तू अजून नाहीना खुललीस, बघ बाळा, घाई नाहीच पण उशीर पण नको ग... काही गोष्ठी वेळेत घडवून आणाव्या लागतात... बघता बघता अमित उत्तम बाप होईलच... पण उत्तम नवराही हवाच ना... पिलांसाठी जवळ असणं आणि एकमेकांसाठी असणं अंतर आहे आसावरी... तू समजदार आहेसच... मला माझा अमित हवाय ग पण तुही हवी आहेस ह्या घरात राणी म्हणून... नुसती आई म्हणून नाही बाळा... परकेपणा जाणवतो ग... वाईट मानून घेवू नकोस बसं! तू हवी आहेस आम्हाला, पण अमितची बायको म्हणून आणि कावूच्या आईला तर आता कुणीच अमान्य करूच शकत नाही.”

त्या दिवशी सासूबाईचे शब्द असवारीच्या मनात बसले होते. पण मनातून रंजित निघत नव्हता. चुकल्याचा भास तिला छळत होताच पण ते छळनं ती वळवत नव्हती.

हळू हळू आता दोघंमध्ये काहीसा संवाद वाढला होता. अमित कावूच सर्व करायचा. आणि घर बाप लेकांच्या मस्तीत मस्त असायचं.

सहा महिने होतं आले होते पण अजूनही अमित आणि आसावरी एक झाले नव्हते, आसवारीच्या भावाने तिला त्या दिवशी फोनवर समजावलं, “आसू, अमित समोरून कावूच सर्व करतोय मग तू का मागे राहतेस, मला तू आधीसारखी हवी आहेस ग, तू त्याची होशील तर बघ सगळं कसं अजून मजेत होईल. त्याची आई बाबा त्याच्या चेहऱ्यावर आधीसारखा आनंद बघावा म्हणून वाट बघत आहेत. आणि मी तुला अधिसाराखा बघण्यासाठी आतुर झालोय. आम्ही सारे वाट बघत आहोत ग, त्याने कधीच तुला स्वीकारलं मग तू का ग मागे आहेस अशी, रंजित आता नाही ग, आणि जिथे असेल ना तिथे तो खूप दुखी असेल बघ, तुला असं बघून.”

“दादा, मी माझीच राहिले नाही तर त्याची कशी ...”

“हो ग, तू तुझी नाहीस पण विचार कर ना? ठीक आहे, निर्णय तुझा ग... आयुष्यभर आई म्हणून राहायचं आहे का तुला... कि पत्नी पण होशील?  नवीन वळण पडलंय आसू तुझ्या आयुष्याला, तू वळली नाहीस तर काय होईल... तिथेच राहशील ना... आज अमित कावूत गुंतलाय पण उद्या कावू मोठी होणार, मग ग काय... संसार दोघांचा असतो ग नुसता मुलासाठी तो ओढल्या जात नाहीच. मुलं नात्याला बांधून ठेवतात पण खरी गाठ ही दोघांची असते.”

भावाचं म्हणणं तिला पटलं होतच पण पटत नव्हतं ना! आसवारीने खूप विचार केला, पण तिचं मन काही वळत नव्हतं नवीन वळणावर.

ती रुळायला लागली होती घरात आणि घरातल्यांच्या मनातही पण अजूनही परकेपणा होताच नात्यात. अमितच्या आईने अमितच्या कामातून काढता पाय घेतला होता, अमित काहीही विचारायला आला कि तिचं उत्तर तयार असायचं, “आसूला माहित आहे, तिला विचार.”

आणि हेही आता अमितला कळून चुकलं होतं की आई हे मुद्दाम करते म्हणून, पण त्याने तर सगळं आसवारीवर टाकलं होतं. सारखं आसावरीला विचरण्यात आता तोही कसातरी व्ह्यायचा मग आसावरीने ते ओळखलं आणि ती करायची त्याचं.

अमितची प्रत्येक लहान मोठी गोष्ट आता आसावरी बघायची. खूप मनातून सांर काही करायची ती त्याच पण मनातून रंजित काही जात नव्हता.

शॉपिंगला गेली होती, अमितच्या आवडीची आणि त्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तिच्या शॉपिंग लिस्ट मध्ये होती. शॉपिंग संपली आणि त्याच वाटेने आसावरी भावाच्या घरी आली होती.

वहिनी घरी एकटीच होती, आसावरीला ती ओढत होती, आणि आसावरी अमितच सांगण्यात गुंग होती. बोलता बोलता वाहिनी म्हणाली, "कर्तव्याने तू प्रत्येक ठिकाणी अमितमध्ये शिरली आहेस आसू मग तुझ्यात तो का नाही ग...? कर्तव्य कुठेतरी संपतात आसू.... प्रेम नाही... रंजित नाही आहे आता आणि अमित सोबत आहे तुझ्या हे विसरू नकोस.  अमित तुझ्या मनाच्या दारात उभा आहे आणि तू दार बंद करून बसली आहेस. आणि तो जोवर दारात उभा आहे तोवर सगळं ठीक आहे पण परत गेला तर....तू तुझी तरी राहशील का?"

आसावरी उठली, म्हणली, "वाहिनी अमित ऑफिस मधून येण्याची वेळ झाली, त्यांना माझ्या हातचा चहा हवा असतो, थकवा जात नाही त्यांचा तो घेतल्या शिवाय, निघते मी... काहीतरी अचानक सापडल्या सारखं आसावरीला मिळालं होतं, तिने झपाझप पावलं वाढवली.

पुढे आसावरीला अमितच प्रेम मिळतं  की नाही ...बहुया अंतिम भागात... अंतिम भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/07/blog-post_6.html


अनित्म भाग मनातल्या तळ्यात पेजवर मंगळवारी दुपारी प्रकाशित होईल... तेव्हा पेजला लाईक करायला विसरू नका   https://www.facebook.com/manatlyatalyat

-उर्मिला देवेन




Post a Comment

0 Comments