गुण्या भाईला सारखा भावनाचा चेहरा दिसत होता. तिचे झाडू उचलतांना त्याला अलगत दिसलेले स्तन त्याला बैचेन करत होते, तिचं ते नाजूक कोवळं रूप त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हतं. चेहऱ्यावरची कोवळी लाली त्याला ललसावत होती, विचाराने तो मनातून आक्रमक होतं होता, राहावलंच नाही त्याला स्वतःची मानेला झटका देत त्याने बटाटा भाईला बोलावलं,
“अबे, बटाट्या इकडं ये बे.”
“हो जी भाई..” बटाटा भाई रमची बॉटल खिश्यात भरत आत मध्ये आला.
त्याला बघून गुण्या भाई बोलला, “अबे साल्या हेच करा तुमी. काय बिन कामाचे नाय तुमी.”
“भाई लास्ट होती हे. बोल ना, हुकुम द्या.”
“अबे सून, आता येत होतो तर ऐक चिकणी पोरगी पायली बे, तू कायीबिन कर साल्या, आज मले ते पायजे. म्हणजे पायजे बे.”
“भाई, मुश्किल आहे ,... आज राडा नाय ना! पोलिसांचा करफींव हाय समोरच्या गावात. फालतू लफडा झाला तर लय वंगाळ होयल भाई. आपुन इकडे कायले आलो, शांत रावा साठी ना.”
“चूप बे साल्या ... लय पायले मी पोलीस बिलिस ... हरामखोर साले... देना एक खोका भेज...नही बोलेगा तो दो भेज... पण आपून को ओच पोरगी मागता आज. राणी.. राणी बनता उसको मै! काय दिखती बे...साल्या अस्सल माल असते बे इकडे गावात...”
“भाई सुनो ना, मै काय बोलता....!”
“अबे चल देईन एक ढुंगणावर, निग साल्या, मले सांगू नको....त्या मोठ्या तुटल्या विहिरी जवळची पोरं होती ते .. नवीनच कोवळा माल हाय ... जा घेऊन ये .., लाव पत्ता .. अन ह्या भावान्यायले हाकल ... निवड एखादी ह्याच्यातली अन सजव तुझीबीन रात, भाई की तरफ से इनाम तुले.”
असं म्हणताच बटाटा भाई जाम खुश झाला होता, जीभीतून लाळ टपकायला लागली होत त्याच्या, क्षणभर कुठली बाला निवडावी हा विचार त्याच्या मनात त्याला गुलाबी गुलाबी करत होता.
गुण्या भाईने त्याला असं बघून त्याच्या ढुंगनावर मागून लात मारली आणि बटाटा भाई भानावर आला, बाहेर पळाला, त्याने लगेच गाडी काढली. गाडी जोरात येऊन अरुणच्या फाटका सामोरं थांबली. बटाटा भाई सह अजून चार बंदूक धारी फाटक तोडून आत शिरले. भानू काका आताच काही वेळेआधी बायकोने जेवणासाठी आवाज दिल्याने परतले होते तर भावना घरात अभ्यास करत होती. अरुणला आज वेळ झालं होता.
गुंड घरात शिरत आहे हे भानू काका त्याच्या ओसरीतून जेवता जेवता बघत होते आणि धावून आले. आणि त्यांनी गुंडांना थांबावंन्याचा निर्थक प्रयत्न केला. शेवटी बटाटा भाईने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते काका खाली कोसळले. सोबत असणारया एका गुंडाने जोरात बघणाऱ्यांना धमकी दिली, “जिसको जान प्यारी है ओ बाहर ना रहे, नाहीतर हाल ह्या काका सारखे होतील.”
सर्वांचे दरवाजे आणि खिडक्या पटापट लागल्या, अरुण आणि भावना तर आधीच अनाथ होते. कसतरी वस्ती वाल्यांच्या मदतीने जगत इथवर आले होते त्यात भानू दुकानदाराचे त्यांच्यावर भारी उपकार होते. आज वस्तीतल्या प्रत्येक मनात भावनासाठी खंत निर्माण झाली होती पण कुणीही समोर येत नव्हतं. राहावलं नाही म्हणून तिच्या शेजारच्या मैत्रिणीने तिच्या घरच्या फोनने पोलिसांना कळवलं. पण उशीर झाला होता. वस्तीतल प्रत्येक घर हळ हळ होतं. सगळे मनातच अरुणची वाट बघत होते.
भावनाला गुण्या भाऊचे माणस ओढत गाडीत कोंबत होते. जरासा जीवं होता भानू काकात तर त्यांनी बटाटा भाईची पाय ओढला. तर त्याला लातीने चेंदत त्याने भावनाला गाडीत टाकलं. ती ओरडत राहिली आणि भानुकाका त्या गाडीकडे बघत केव्हांच यमसदनी गेले होते. दुरून अरुण ठेला घेवूनच घरी येत होता. आणि आनंदात होता. पण....
गाड्या धूळ उडवत निघून गेल्या आणि भावना आणि अरुणला देरू करून गेल्या.
वीस वर्षा नंतर....
निवडणुकीचे वारे वाहत होते. प्रसिद्ध उद्योगपती गुणवंत रावांच्या बंगल्यावर आज राजकीय बैठक होती. सर्व शहराची नजर त्याच्या बंगल्यावर होती. आज ते कोणत्या पार्टीला पाठींबा देणार हे ठरणार होतं. गुणवंत रावांचे पोस्टर सर्व शहरात लागले होते. गुणवंतरावांची सत्ता सर्व राज्यात पसरली होती. जगभरातल्या मोठं मोठ्या डॉनशी त्याचे संबंध होते. ड्रग्सचा आणि हत्यारांच्या तस्करीचा व्यापार भारतात त्याच्या मार्फत पसरत होता.
अंडरवर्ल्ड मध्ये त्याची भारी वचक पसरत होती आणि तो भारतातला द्र्ग्सचा मोठा व्यापारी होता. पण समाजात त्याची छबी एक समाजसुधारक आणि एक उदयोगपती म्हणून होती. जागोजागी त्यांचे नशा मुक्ती केंद्र होते. कॉलेज होते, सामाजिक संस्था होत्या. पण त्याचा काळा कारभार अतिशय चतुर पद्धशीर सुरु होता. सुपारी घेण्यात तो अतिशय माहीर होता.
ज्याची सुपारी त्याच्या कडे आली त्याचं यमसदनीच बुकिंग पक्कं होतं. मोठं मोठे बार आणि हॉटेल मध्ये त्याचा काळा बाजार हमखास चालत असे. राजकीय पक्ष त्याच्या देणगीवर चालत असतं मग कुणाची दातखिळी उलत नव्हती आणि जीवाच्या भीतीपोटी कुणी बोलत नव्हतं. पोलीस बांधली होती आणि आतून आताचे सत्ताधारी त्याच्या हातचे पुतळे होते.
गुणवंत रावांचे शत्रूही अगणित होते. जे त्याला मारण्यासाठी नेहमी तत्पर होते. पण चिकनी बाला त्याची कमजोरी होती. जिच्यावर नजर पडली ती त्याला हवी असायची. त्याने वापरलेली स्त्री पुढे त्याच्या मनासारखी वागली तर तो तिला त्याच्या काळ्या धंद्यात समावेश करून घेत असे आणि नाहीच एकली तर मारून कुठेतरी गाडत असे किंवा त्याच्या वेशालयात सोडून देत असे.
मागच्या दोन वर्षापासून दुबईचा डॉन साहेबजी ह्याच्याशी गुणवंत रावाची मैत्री झाली. तेव्हापासून तो स्वतःला राज्याचा सत्ताधारीच समजत होता. डॉन साहेबांची पर्सनल सेक्रेटरी त्यांच्याशी नेहमी वार्तालाप करत असे आणि आज ते तिच्याच फोनची वाट बघत होते आणि फोन वाजला, गुणवंतरावानी कोपऱ्यात जाऊन फोन वर संवाद साधला,
“मॅडमजी, आपल्याच फोनची वाट होती आम्हाला.” गुणवंत रावं माठ्या आदराने म्हणाले.
“गुणवंत, काय ती निस्तरा, साहेबजी आपल्या पाठीशी आहेत ..आणि आम्ही त्यांना कॅव्हेन्स केलंय ...” समोरून दुबईचा डॉन साहेबजी ह्यांची पर्सनल सेक्रेटरी बोलत होती. जिला सर्व मॅडमजी बोलायचे. दुबईचा डॉन फक्त तिचच ऐकायचा.
“थँक्स मॅडमजी.... आपली अशीच कृपा असू द्या ... “
“हू ह.. चार खोके पाठवा ... साहेबजी म्हणत आहेत.”
तोच मोठयाने कुणीतरी टेबलवर भिंगरी फिरवत होतं. गुणवंत रावांना आवाज ऐकू येत नव्हता. कान किर्रर्र झाले होते. तरीही ते फोन कानाला लावून होते. आणि फोन कट झाला. नंतर गुणवंत रवांनी घोषणा केली आणि सभा संपली.
तोचं टीवीवर बातमी आली, गुणवंतरावाने स्वतःचा स्वतंत्र पक्ष जाहीर करत निवडनुकीच्या रिंगणात उभे राहणार होते. ह्या त्याच्या एका निर्णयामुळे राजकीय प्रांतात खळबळ माजली होती. त्याची हाजी हाजी करणारे त्याला मारण्यासाठी मार्ग शोधात होते. कारण समोर त्याला कुणीच काही बोलू शकत नव्हतं. मग लाचरीत बऱ्याच राजनेत्यांना निवडकनुकीतून आवेदन पत्र मागे घ्यावे लागणार होते. सर्वाना धक्का बसला होता गुणवंत रावांच्या निर्णयाने. राजनेते सुन्न झाले होते तर मिडिया बोलती झाली होती.
गुणवंत रावांचा बंगला आज फुलांनी आणि बुकेनी भरला होता. गुणवंत रावं त्यांच्या ताफ्यासह विमानतळाकडे रवाना झाले होते. त्या दिवशी गुणवंत रावांची मुलगी अमेरिकेतून मायदेशी परतणार होती. सगळीकडे कडेकोट बंदोबस्त होता. पण सोनाला किडन्याप करण्याची तयारी विमानातच झाली होती, विमानात असणाऱ्या एयर होस्टसने तिच्या जेवणात औषध मिळवलं होतं, ज्याने तिला काही वेळानंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि विमानातल्या पायलेटने इमर्जन्सी लँडिंग नेपाळ मध्ये केली. लँडिंग होताच तिला हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं. तिच्यावर उपचार करणं सुरु झाले आणि विमान परत मुबंईतकडे निघाल.
इकडे गुणवंतराव आणि त्यांची पूर्ण फोज वाट बघून कंटाळले आणि शेवटी अनाउन्समेंट झाली की फ्लाईट नेपाळ मध्ये इमर्जन्सी थांबून मुंबईसाठी रवाना झाली म्हणून. गुणवंतरावाना त्याच्या मुलीबद्दल त्याच्या सूत्रांकडून कळालं आणि त्यांनी लगेच नेपाळ मध्ये जमवा जमाव सुरु केली. पण वेळ निघून गेली होती.
गुणवंतरावांची एकुलती एक मुलगी जिला त्याने लोकांच्या नजरेतून दूर सुखरूप ठेवलं होतं ती किडन्याप झाली होती. कीडन्याप करणाऱ्यांनी मोठ्या फितुरीने सोनाला हॉस्पिटल मधून बाहेर काढून गुप्त मार्गाने भारतात आणलं होतं. आणि गुणवंत रावणाची माणसं तिला नेपाळच्या कोपरया कोपऱ्यात शोधत होती.
प्रिय वाचक तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर पुढल्या सर्व भागात असणारा आहे, भावना आणि अरुणच काय झालं.... आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय कसा मिळतो हे सगळ पुढे येणारच. भिंगरी ही एक रिव्हेंज कथा आहे... झालेल्या अन्यायाने पेटून उठलेल्या मनाची..... भेटूया पुढल्या भागात.
कथेच्या अपडेट साठी तुम्ही माझ्या पेजालाही like करू शकता. आधीचे सर्व भाग तुम्ही पेजवर वाचू शकता, किंवा ह्या वेबसाईटवरही पहिल्या
भागापासून वाचू शकता http://www.urpanorama.com/13995/ दुसऱ्या भागची लिंक इथेच सापडेल
https://www.facebook.com/manatlyatalyat
कथेच्या प्रकाशाने आणि वितरणाने सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
0 Comments