माझी मी मजेत जगते

 





काल अचानक मला माझ्या वहिनीचा कॉल आला, तशी ती करत नाही बरका ! पण काल आला, मी माझी मिटिंग मध्ये, हल्ली कसं फोन आला, कि धस्कन होतं, कोरोना किती वाढलाय. आणि माहेरचा फोन म्हटल तर एका रिंग मध्ये उचलायचा नाही का ?
असो, मी जसा उचलला तशी म्हणायला लागली, “काय हो ताई तुम्हाला तर आठवणच येत नाही

मी जरा दचकली, वाटलं बोलावं, तुला आली ना माझी. मी तर रोज फोन करते आईला, तुझ्या साठी विचारते, तुचं बहाणे करत बोलत नाहीस.

पण मी तिला जाणून होते, ही कॉल करणं म्हणजे काहीतरी कामच असणार

इकडली तिकडली चौकशी झाली, आणि माझी वाहिनी आली मुद्यावर

“काय हो ताई तुम्ही आल्या नाही आईला बघायला, अग बाई ह्याच्या लग्नात नाही, त्याच्या लग्नात नाही, शोभतं काय हो तुम्हाला.”

“शोभत तर नाहीच ग, पण येवून तरी काय होतं, लग्न करणाऱ्याच लग्न होतं आणि आपला हेलपाटा ना. आणि आता तर नकोच ग बाई,”

“असं नाही म्हणायचं, तुमच्या लग्नात होतेच ना लोकं! यायचं आपण.”

“हो ग, पण हल्ली लोकं चमचे गिरी करणाऱ्याचे आव भगत जास्त करतात, आपलं तसं नाही बाई, जे खर ते खर. आणि होडून ताडून मी काही येनारयातली नाही बाबा. ज्याला जे म्हणायचं ते बोला म्हणावं.”

“अहो...”

“तू आधी फोन कश्यासाठी केला ते सांग.”

वाहिनी जरा गडबडली, “ताई ते माधव काका आहेत ना, ते बोलत होते तुम्हाला स्वार्थी आहे म्हणून, खूप काही काही बोलले हो तुम्हाला, आई नव्हत्या तिथे , मला बाई खूप वाईट वाटलं.”

 

आता मला मुद्दा कळाला होता, मला कुणीतरी वाईट बोललं ह्याचा जास्त आनंद झाला होता वहिनीला, म्हणून मला असा आठवण करून तो फोन होता. म्हणजे मलाही वाईट वाटावं आणि मी मनात दुखी व्हावी... माझ्या आयुष्यात त्रास व्हावा आणि मी  गडबडावी.

 

मी म्हणाले, “असुदे ग, मला काही फरक पडत नाही, हल्ली जिथे माझा मान नाही तेथे मी अपमान करून घेण्यासाठीही येत नाही. काय आहे ना लोकांना उगाच वाटतं मी स्वार्थी आहे.. आणि असली तरी काय ग. बोलूदे  मी हसून उडवते  आणि मजेत जगते”

“अहो, पण मला खूपच वाईट वाटलं हो, तुम्ही कश्या सध्या सुध्या, सर्वाना मदत करता आणि हे असं लोकं बोलतात हा..”

सारा आनंद व्यक्त करून  वाहिनीने फोन ठेवला, मी माझी मिटिंग मध्ये परत बीजी झाले.

दुपारीवर सोशल मिडिया बघत whats अप बघत होते, मैत्रिणीच्या ग्रुप वर online पार्टीचा मेसेज होता.

मी गुमान वाचत होते, एक म्हणाली, मला सांगायचं म्हणून म्हणाली, तर लगेच दुसरी म्हणाली, तिला नको सांगू, आता मी टाइपनारच होते की मी पण in आहे. तर विषय बदलला त्यांनी, कळाल होतं मला बोलवायचं नाही म्हणून. लगेच दुसरा ग्रुप तयार करून त्यांच्या गप्पा आता तिथे रंगणार हे आलं होतं लक्षात.

मी त्याचं सदा कदा गुण गान गात नाही ना ग्रुप वर, मग मला का बोलावतील.  अकडू, घमेंडी, जास्त शायनी म्हणून काय काय ते बोलतील आणि त्याचं काय ते  चालू राहिलं. का कुणास ठावून, लोकांना ना त्याच्या मनासारखं कुणी वागतांना बोलतांना दिसलं नाही कि आपल्याला टाळणं सुरु होते. काय आहे ना आपुलकी दाखवणारे आवडतात, आपलेपणाने बोलणारे पटत नाही ना रावं.

फोन ठेवून दिला, कामाला लागले. एक मात्र कळून चुकलं होतं, आपण आपल्या मस्तीत राहायचं, जिथे आपली गरज तिथे नक्की हजर असायचं. बाकीच्यांचं काय ते आपल्या बद्दल बोलणारच .. अरे मनात राहण्यासाठी गोड गोड बोलावं लागत असेल तर मी तर रोखं टोकं बोलून दिमाकात राहते....

जावू द्यायचं  आपण मात्र मजेत जगायचं. निवांत बसून एक स्लेफी काढला, सहज ग्रुप वर अपलोड केला, फेमीली ग्रुप मध्येही टाकला, खाली लिहिलं, म्हणून मी खुश दिसते आणि माझी मी मजेत जगते !

काय मग मित्र मात्रीनिनो, तुम्ही जगताय ना मजेत, कुणाचा विचार करायचं नाही, लोकं स्वार्थी म्हणोत की अजून काय, आनंदी राहायचं आणि मजेत जगायचं.

 कथा कशी वाटली नक्की कळवा ...  आणि comment आणि लाईक नक्की करा, मनातल्या तळ्यात पेजला मदत करा, कुणीतरी उगाच पेजची चुकीच account असल्याची तक्रार FB ला केली आहे. तेव्हा मदत करा, तुमची एक कथेवर comment त्या तक्रारीला मागे करण्यास मदत करेल. 

मनातल्या तळ्यात पेजसाठी इथे क्लिक करा

 

लवकरच मनातल्या तळ्यात घेवून येत आहे मराठी वेब सिरीज तेव्हा  इथे मनातल्या तळ्यात channel ला subscribe करा तुम्ही पेजलाही लाईक करू शकता 


©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव!]

 



Post a Comment

1 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)