मी प्रेम दिवाना, तू रूपाची राणी...#फ्रेंडशिप डे स्पेशल




अमित लतिकाला आवाज देत खोलीत शिरला आणि स्तब्ध राहिला.  सुंदर सोनेरी काठाची साडी, त्यावर पिढीजात दागिण्याची चढण, आणि केसांचा तो मराठमोळा जुडा बांधत लतिका अमितला म्हणाली, "गजरा आणला असणारच ना?  बांधा! आज तुम्हाला गजरा मळण्यासाठी पस्तीस वर्ष पूर्ण होतील, आणलाय ना... अहो कुठे आहात... सर्व येतीलच एवढ्यात, आणि सर्व आले कि मला वेळ मिळणार नाही मुलाचं आणि नातवाचं कौतुक बघण्यात. मग मी आताच तयार झाले... गजरा मळा आधी जुळ्यात, की विसरलात आजही?"
अमित लतिकाच्या ओरडून बोलण्याने भानावर आला आणि म्हणाला, "लतु, आजही मला तसंच घायाळ केलंस ग, भारी जादू माहित आहे ग तुला. मी प्रेम दिवाना आणि तू माझी रूपाची राणी, मी आत्ता घेवून येतो. कालच आणून ठेवला होता फ्रिजमध्ये.. विसरायला नको म्हणून."
लतिका आणि अमितच्या लग्नाचा आज पस्तीसावा वाढदिवस होता, त्यांची दोन्ही मुलं दुपारपर्यंत घरी पोहचणार होती. मुलगी अमेरिकेतून मुलं आणि  नवऱ्यासोबत येणार होती आणि मुलगा रशियावरून सुनेला घेवून. लतिका आणि अमित लग्न आईवडिलांनी देवाब्राम्हनाच्या साक्षीने लावून दिलेले. अमितने पहिल्या रात्रीच लतिकाला माझी मैत्रीण होशील का ..? असं विचारलं. लग्न होतं पण त्या नात्यावर जबरदस्ती नको होती अमितला. त्याच्यासाठी मैत्री बायकोसोबत असावी हे महत्वाचं होतं. एकदाचा बायकोच्या नात्यावर अधिकार येवू शकतो पण मैत्रीचं नातं निस्वार्थ असतं हे जाणून होता तो. मैत्रीचं नातं बहरवतांना पुढाकारहि त्यानेच घेतला होता. रोजच्या लहानसहान गोष्टी बायकोला सांगायचं तो, अगदीच ज्या संगु नये त्याही, सोबत काम करणाऱ्या इतर बायकांचीही तो स्तुती करायचा तिच्या समोर पण... तिला जाणवू देत नव्हता.
अमितने हळूच गुणगुणत गजरा लतिकाच्या जुळ्यात मळला आणि म्हणाला, "पस्तीस वर्ष झालीत ना सोबत आपल्याला, तरीही मी तुझा दिवाना.. ओ मेरी जोहर जबी ..." तोच खालून आवाज आला, "आई बाबा ..."

अहो पोरं आली वाटतंय... असं म्हणत लतिका गजरा सावरत खाली निघाली आणि अमितने तिला सावरलं, मग दोघेही सोबत पायऱ्या उतरले, तोच मुलांनी घरात आल्या आल्या, शुभेच्छांचा वर्षाव केला, मुलीने मुलांनी मिठी मारली, जावयाने वाकून नमस्कार केला, सुनेने मोठंच गिफ्ट दिलं.. आणि मुलाने इशारा करतच दोघांचेही चरण स्पर्श केले. नातवं घरात शिरताच आजी आजही गोडच दिसते असं ओरडायला लागली. क्षणात आनंदीआनंद घरात पसरला होता. पण त्या सर्व आनंदातही सून आणि मुलात काहीतरी बिनसलंय ह्याची जाणीव लतिकाला अलगत झाली होती. मुलीच्या वागण्यात नवऱ्यावर प्रेमापेक्षा हक्क जास्त दिसत होता.
संध्याकाळी पार्टीपर्यंत घरात सर्व नातेवाईक जमा झालीत, आणि घरातच पार्टीला सुरुवात झाली, घरचीच लोक होती मग नाचणं, गाणं, गेम्स  सर्वच सुरु होतं. प्रत्येक पाहुणा अमित आणि लतिकाच्या जोडीला सलाम ठोकत होता. आजही त्या दोघान्ची एकमेकांना समजून घेण्याची पद्धत सर्वाना प्रेरणादायक होती. घरात एवढं मॉर्डन वातावरण कि चक्क जेवणाआधी रीतसर त्या दोघानबद्दल बोलण्याचा कार्यक्रम होता.
सर्वानी दोघांच्या पती पत्नीच्या नात्याचं सुंदर वर्णन केलं. मुलगा त्याच्या बायकोकडे बघून म्हणाला, "माझी आई एक आदर्श पत्नी आहे, तिने मातृत्वासोबत पत्नीपणही खूप जपलं,आणि अस्सल रूपाची राणी आहे .. कारण तीच रूप तिच्या गुणांमुळे आहे, म्हणूनच माझे  बाबा नेहमी म्हणता, मी प्रेम दिवाना, तू रूपाची राणी .. ..खऱ्या रूपाचा राणीला असं हजार वेळा म्हणायला आवडेल... नाही बाबा! "
आणि मग बाबांनी मुलाला टाळी दिली.  मुलगी म्हणाली, "माझ्या आईला मी आमचं करतांनाही स्वतःसाठीही जगतांना बघतीलं, खूप शिकले मी तिच्याकडून, त्यांच्या नात्यातल्या गोडव्याने आम्ही गोड गोष्टी शिकलो. माझ्या वडिलांना मी कधीच आईच्या शब्दा बाहेर जातांना बघतील नाहीच. जोरूचे गुलाम आहेत माझे बाबा .. हो ना बाबा?"
बाबा तिचा शब्द उचलत म्हणाले, "मग वाईट काय त्यात? दिवाना आहोच मी तिचा... अस्सल गुणांची खान आहे माझी रूपाची राणी ....आणि तू म्हणतेस तर जोरूचा गुलामही."  आणि सगळे हसायला लागले.
लतिका सर्वांचं म्हणणं गुमान टिपत होती. सगळे आपल्या जोडीदाराला आपली बाजू स्पष्ट करतांना तिची आणि अमितची स्तृती करत होते. सर्वांचं बोलणं झाल्यावर आता अंतिम टर्न  दोघावर आला. अमितने सहज इशारा केला आणि लतिका बोलायला लागली, "पस्तीस वर्ष काढलीत सोबत, नातं पती पत्नीचं होतं जगासाठी, पण खरं नातं तर आमचं मैत्रीचं होतं. कुठलाही नातं एकतर्फी असू शकतच पण मैत्री एकतर्फी कधीच नसते. अपेक्षा आणि हक्कामुळे पती पत्नीचं नातं गुंतल्या जातं आणि मग असं नातं निभवायला फार कसोटी लागते. पण मैत्रीने ते नातंच सैल केले तर एक मोकळेपणा निर्माण होतो. आणि मला अभिमान  आहे की माझं ह्यांच्याशी नातं मोकळेपणाचं मैत्रीचं आहे. ह्यांनी कधी मला तू माझी बायको आहेस हे तू कर असं म्हटलंच नाही, त्यांच्या आई वडिलांची सेवाही ते स्वतः वेळ काढून करायचे, मला नाही काही बोलले ते सासूवरून कधी, आईनं काय हवं काय नको ते स्वतः जातीने बघत. अर्थात त्याच्या सोबत  मीहि हातभार लावायचीच ना त्याची अर्धन्गिनी म्हणून! मग  नात्यात कधी भीती होतीच नाही. हे आले कि मला रागावतील हा धाक कधीच नव्हता. हा पण ह्यांना आल्यावर आपणही काही सांगावं म्हणून वाट मी बघाचेच. आमच्या दोघांच्या प्रेमावर तुम्ही खूप बोललात पण प्रेम अधिक घट्ट करण्याचं काम आमच्यातल्या मैत्रीने केलेय. हे नेहिमी एक डॉयलॉग म्हणतात, मी प्रेम दिवाना  .. तू रूपाची राणी .. पण मी म्हणाले, हि तुझ्या माझ्या मैत्रीची कहाणी."
अमितने लतिकाला अलगत बसायला हात दिला आणि म्हणाला, "मैत्री हीच प्रेमाची पहिली पायरी असते, कधीच हक्काच्या आणि अधिकाराच्या गोष्टी लतिकाने माझ्यासोबत केल्याचं नाही, जेथे हक्क आणि माझेपणाचा तडका लागतो तिथे प्रेमाचा धुव्वा उडतो. आमची मैत्री आमच्या नात्यातलं गुपित आहे. मी आजही तिचा दिवाणा आहे आणि ती माझ्यासाठी रूपाची राणी आहे कारण हि आमच्या मैत्रीची कहाणी आहे."
मुलांना अलगत त्यांच्या संसारातली इवलीशी चूक कळली होती. मुलाने  दोन दिवस राहूनही बायकोला आई बाबांना ताट वाढ, त्यांना असं कर, तसं कर असाही आग्रह केला नव्हता आणि कोपऱ्यात येवून तिला रागावलाही नव्हता. सून सासरी येवूनही आनंदात होती आणि जातांना अलगत तिचे हात सासू सासऱ्यांच्या पायाला लागले. आणि मन भरून सासूला तिने मिठी मारली.
मुलीने दोन दिवस परतीचं  तिकीट वाढवलं आणि सासरीहि दोन दिवस काढावे म्हूणन तिकडे नवऱ्यासोबत आनंदात गेली. दोघानांही कळलं होतं पती पत्नीचं नातं नुसतं प्रेमाने चालत नाही त्या नात्यात मैत्रीही असावी लागते आणि आपला जोडीदार आधी मित्र बनवावा लागतो. त्याच्याही भावना निस्वार्थपने समजून घ्यावी लागते. मैत्री आणि प्रेम एकमेकांचे पूरक असतात. ज्या नात्याला मैत्रीचा गंध असतो तेच नातं सुगंधी असतं. 
 मैत्री दिनाच्या  शुभेच्छा
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
कथेच्या अपडेट साठी खाली दिलेल्या फेसबुक बटणला लाईक करा. म्हणजे पेज लाईक होईल आणि अपडेट आपल्यापर्यंत पोहचेल किंवा ब्लॉगला फॉलो करा.

Post a Comment

0 Comments